आरोग्यदायक लिंबू व त्याचे उपयोग

आपल्या आरोग्यासाठी लिंबू खूप लाभदायक आहे. लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही.

आरोग्यदायक लिंबू व त्याचे उपयोग

लिंबू उत्तम पित्तशामक, वातानुलोमक, जठराग्निवर्धक व आमपाचक आहे. हे आम्ल रसयुक्त (आंबट) असूनही पोटात गेल्यावर मधुर (गोड) बनते. मंदाग्नी, अपचन, गॅस, पोटदुखी, उलटी, मलावरोध, पटकी इ. पोटाच्या आजारांवर हे औषधवत काम करते. हृदय, रक्तवाहिन्या व यकृताची शुध्दी करते. यात पुरेशा प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. हे जंतुनाशक आहे. सकाळी अनशापोटी लिंबाचा रस पाण्यात मिसळून घेतल्याने आतड्यांमध्ये साचलेले विषारी पदार्थ नष्ट होतात, त्याचबरोबर रक्त शुध्द झाल्याने संपूर्ण शरीराची शुध्दी होते, मांसपेशींना नवे बळ मिळते. यामुळे शरीरात स्फूर्ती व उत्साह येतो.

औषधीय प्रयोग

दंतरोग :-

१) लिंबाचा रस ताज्या पाण्यात मिसळून गुळण्या केल्याने अनेक प्रकारच्या दंतरोगांमध्ये लाभ

२) पिळलेल्या ताज्या लिंबाच्या सालीने दात घासल्यास अथवा साल सुकवून, कुटून बारीक करुन त्याचे होतो. तोंडाचा दुर्गंधही दूर होतो. मंजन केल्यास दात मजबूत, स्वच्छ व पांढरेशुभ्र होतात.

३) लिंबाचा रस, मोहरीचे तेल व बारीक मीठ मिसळून रोज मंजन केल्यास दातांचे रोग दूर होऊन दात मजबूत व चमकदार बनतात.

४) पायोरियात लिंबाच्या रसाने हिरड्या घासल्याने रक्त व पू येण्याचे थांबते.

५) लिंबाच्या एक चमचा रसात दोन चमचे मध मिसळून घेतल्यास जुन्या खोकल्यात लाभ होतो. सर्दी पडसे कोमट पाण्यात लिंबाचा रस व मध मिसळून प्यायल्याने लवकर गुण येतो.

डोकेदुखी:

लिंबाच्या दोन सारख्या फोडी करुन थोड्याशा गरम करुन डोके व कानशिलांवर लावल्याने घशाचे आजार : घशाची सूज, घसा बसणे इ. तक्रारींमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस व मीठ मिसळून डोकेदुखीत आराम मिळतो.

गुळण्या कराव्यात. ज्यांना खोकल्यात पातळ कफ निघतो त्यांनी हा प्रयोग करु नये.

केस गळणे:-

लिंबाचा रस केसांच्या मुळाशी घासून १० मिनिटांनी केस धुतल्याने अकाली केस पांढरे होणे, तुटणे किंवा उवा होणे या समस्या दूर होतात.

डोक्यातील कोंडा :

डोक्याला लिंबाचा रस व मोहरीचे तेल समप्रमाणात मिसळून लावावे. नंतर दह्याने चांगले घासून डोके धुवावे. या प्रयोगाने काही दिवसांतच डोक्यातील कोंडा दूर होतो.

पोटदुखी, मंदाग्नी:

एक ग्लास पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस, एक चमचा आल्याचा रस व साखर मिसळून प्यायल्याने पोटदुखीत आराम मिळतो. जठराग्नी प्रदीप्त होतो, सपाटून भूक लागते. दक्षता कफ, कफयुक्त खोकला, दमा तसेच नेहमी अंग ठणकणाऱ्या रुग्णांनी लिंबाचे सेवन करु नये.