हिमालयातील कांगडा पर्वतराजीमध्ये ज्यालामुखी' नावाचे एक दिव्य स्थान आहे. पृथ्वीच्या गर्भात नेहमी प्रकाशत असणारी एक महान ज्योत त्या ठिकाणी उन्नत होत आहे. त्या दिव्य ज्योतीच्या रूपात साक्षात भगवान शंकर परमेश्वर शुभंकर तेथे प्रगट झालेले आहेत. त्या पवित्र ज्योतीच्या दर्शनासाठी नेहमी तेथे भक्तांची गर्दी असते. स्थान :- हा ज्योतीचा चमत्कार अनेक ठिकाणी दिसून येतो त्या सर्व ठिकाणी दर्शनासाठी यात्रा भरत असतात व भक्तांची अफाट गर्दी होत असते. महादेव अर्थात भगवान शंकराच्या या बारा ज्योतिर्लिंगाच्या तेजोमय व पवित्र स्थानांचे महत्त्व फार मोठे आहे. सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी वर्षभर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात फार पुर्वी, पुरातन काळी ही सर्व स्थाने बहुधा त्या 'ज्लावामुखी' प्रमाणेच असावीत, पण आता या सर्व स्थानावर भव्य शिवालये उभी आहेत...
समुद्रकिनारी दोन, नदिच्या किनाऱ्यावर तीन उंच पर्वत शिखरांवर चार आणि मैदानी प्रदेशात नागरी वस्ती जवळ तीन अशा पद्धतीने ही द्वादश ज्योति विखुरलेली दिसतात या पैकी प्रत्येक ठिकाणचे वर्णन भाविकांनी आपल्या आलेल्या अनुभव व साक्षात्कारांसह केले आहे. त्या सर्व शुभंकर शंकर ज्योतिरूप शिवस्थानांच्या - दर्शनाने आपले मनुष्यजीवन सुखी, समादानी, पुण्यमय व कृतार्थ होते. ही श्रध्दा आहे. अनुभव आहे.
या जगाच्या पाठीवर आज लक्षावधी शिवलिंग आहेत, पण या सर्वात बारा ज्योतिर्लिंग मुख्य आहेत, ती म्हणजे सौराष्ट्रातील सोमनाथ , श्री शैल येथील मल्लिकार्जुन, उज्जैन मध्ये महाकाल, विध्य प्रदेशात ओंकारेश्वर, हिमालयात पर्यंत शिखरावर केदारनाथ, पुण्याजवळ डाकिनीमध्ये भीमाशंकर, काशी क्षेत्रात भगवान विश्वेश्वर, गोमती (गोदावरी) च्या किनाऱ्यावर त्र्यंबकेश्वर, चिंताभुमीमध्ये परशीत वैद्यनाथ, औंढा येथे दारूक बनात नागनाथ , सेतुबंध स्थानी रामेश्वर आणि देवसरोवर येथे (औरंगाबादजवळ ) घृष्णेश्वर सकाळी उठल्यानंतर या द्वातश ज्योर्तिलिंगाचे स्मरण वाचन केल्याने जन्म- मृत्युच्या फेन्यातून मुक्ती मिळते. या शिवलिंगाच्या पुजनाने सर्व वर्णाच्या लोकांची दुःखे नष्ट होतात. तसेच येथे अर्पण केलेला प्रसाद भक्षण केल्याने सर्व पापांचे परिमार्जन होते. तसे पाहिले तर आपण दररोजच नित्यनेमाने ज्योतिर्लिंगाचे दर्शन करत असतो. सूर्य, अग्नी, दिव्याची ज्योत ही सर्व त्या ज्योतीचीच रूपे आहेत. त्यांच्या दर्शनाचा आनंद आपण दररोज मिळवीत असतो.
'ओम तत्सवितः वरेण्या' या गायत्री मंत्रात बुद्धीला प्रेरणा देणान्या भगवान: सुर्यनारायणाच्या सर्वश्रेष्ठ तेजरूपी ध्यानाच्या विषयी माहिती दिली आहे या मंत्राच्या जप सामथ्र्याने माणसाच्या प्राणज्योती अर्थात आत्मज्योतीला दिव्य शक्ती प्राप्त होत असते. सूर्यशक्तीचे तेज व त्यापासून मिळणान्या उष्मतेचे फायदे सांगता येणार नाहीत इतके अगणित आहेत त्या अतिभव्य दिव्य ज्योतीच्या सामर्थ्यानिच या विश्वाचे सर्व कार्य संचालन होत आहे. त्या भासकरूपी ज्योतीला आपण नमस्कार करतो सुर्योपासना करतो सुर्याला अर्घ्य दान करतो सुर्यज्योती हेच एकमेव सत्य आहे तीच एक नित्य असून बाकी सर्व मिथ्या होय.
"अग्नी" ही देखील एक महान ज्योतीच आहे. पृथ्वीतलावरील सगळे धर्म त्या अग्नीज्योतीसमोर नतमस्तक आहेत त्या ज्योतीची नित्य उपासना करत आहेत अग्रीच उपयोग, त्याचे महत्त्व, त्याचे उपकार याबाबत जेवढे सांगावे तेवढे कमीच. दिव्याची ज्योत है सूर्य व अग्नी यांचे लघु रूप आहे "सा आज्मेन वर्तिसंयुक्त वनिनायोजित मया। दीप गहाण दैवेश त्रैलोक्य तिमिराह' अशा प्रकारे आपण या महान ज्योतीला प्रणाम करत असतो दीप ज्योतीचे महत्व आपण चांगल्या प्रकारे जाणतो तिची आपण पुजा करतो दिवाळीसारखा दीपोत्सव साजरा करतो स्वागत समारोह, मंगल कार्य इ. कार्यक्रमात तर सर्वप्रथम दिव्यांचीच पुजा करतात.
"शुभं करोति कल्याणं आरोग्यम् धनसंपदा ।
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते ।।
या ज्योतीमुळे आपला सर्वांचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो. स्वधर्म सूर्याचे दर्शन होऊन मनोकामना पुर्ण होतात. याच प्रमाणे बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने तेथील पावन वायुमंडळ आणि पवित्र यात्रेने सर्वांना सुख, शांती आणि समाधान प्राप्त होत असते.
भगवान शंकराच्या या बारा ज्योतिर्लिंगाच्या तेजोमय व पवित्र स्थान
(१) सोमनाथ – सौराष्ट्रात वेरावळजवळ
(२) मल्लिकार्जुन – आंध्र प्रदेशात श्रीशैलम् पर्वतावर
(३) महाकालेश्वर – उज्जैन
(४) ओंकार वा अमलेश्वर-नर्मदातटाकी ओंकारमांधाता
(५) केदारनाथ – हिमालयात केदारपुरी
(६) भीमाशंकर – डाकिनी क्षेत्र, खेड तालुका, पुणे जिल्हा
(७) विश्वेश्वर-काशी
(८) त्र्यंबकेश्वर – नासिकजवळ त्र्यंबकेश्वर
(९) वैद्यनाथ वा वैजनाथ – परळी, बीड जिल्हा
(१०) नागनाथ – औंढा, परभणी जिल्हा
(११) रामेश्वर – सेतुबंधाजवळ रामेश्वर
(१२) घृष्णेश्वर – वेरूळ, औरंगाबाद जिल्हा