शांत रहा, शांतता राखा

राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. कारण शब्द येत असतात हृदयातून पण अर्थ काढले जातात ते डोक्यातून

शांत रहा, शांतता राखा

असे म्हणतात की, राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. कारण शब्द येत असतात हृदयातून पण अर्थ काढले जातात ते डोक्यातून. या प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कित्येकदा किंवा मी तर म्हणेण की, प्रत्येक दिवसातून एकदातरी आपण इतरांवर रागवत असतो. परंतु थोडा वेळ गेल्यानंतर आपण त्या व्यक्तीवर उगाचच रागावल्याची खंत आपल्या मनामध्ये जागी होते नंतर तुम्ही पचाताप करून घेता अशी वेळ जर तुमच्या वर येऊ द्यायची नसेल तर शांत रहा आणि शांतता राखा तुमच्या ब-याच समस्या आपोआप सुटल्याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल

एकदा कर्ण, कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते. अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला, है सगळे सोने गावक-यांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस. लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावक-याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता पण टेकडी थोडी देखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जुन अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास, आता यापुढे मी काम करू शकत नाही.

मग कृष्णाने कर्णाला बोलायले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या. लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही, या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.

कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला, अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास. तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास. कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने शांत पद्धतीने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातय. है पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे लक्षण आहे. देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे , शुभेच्छा द्याव्यात , धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा न ठेवून शात राहून केलेल्या कर्माने माणूस यशस्वी होतो.