श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग माहिती

श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगात सोमनाथ हे आद्य ज्योतिर्लिंग गणले जाते. हे स्वयंभू व सदा जागृत देवस्थान त्याप्रमाणे एक जुने मंदिर भद्रकाजीचे आहे.

श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग माहिती

सौराष्ट्र सोमनाथं च श्री शैले मल्लिकार्जुनम् ।

उज्जयिन्यां महाकाल ओमकारम ममलेश्वरम् ।

परल्या वैजनाथंच डाकिन्यां भीमाशंकरम् ।

सेतुबंधे तु रामेश नागेशं दारुकावने ।।

तु वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबके गौतमी तटे ।

हिमालये तु केदारं, घृष्णेशं शिवालये ||

गुरातमधील सौराष्ट्राच्या वेरावळ बंदरतील आणि प्रभासपट्टण या गावाचा परिसर दुमदुमत असे. याचबरोबर मंदिर घाटाच्या पायऱ्यांशी येऊन धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांतून 'जय कर असा निघणारा धीर-गंभीर आवाज आणि सुवर्णाच्या विशाल घंटेतून उमटणारा 'ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय' चा जयघोष साऱ्या परिसराला भक्तिमय करून टाकत होता.

मदिरातील ती विशाल सुवर्णघंटा दोनशे मण सोन्याची होती आणि मंदिरांचे छप्पन खांब हिरे, माणिक, पाचू वैडूर्य आदि रत्नांनी मढवलेले होते, मंदिराच्या गर्भगृहात रत्नदीपांची आरास रात्रदिवस तेवत असायची आणि कनौजी अन्राने जळणारा नंदादीप अखंड प्रज्वलित असायचा, मंदिराच्या भंडारगृहात अमाप संपत्ती ठेवलेली होती भगवान सोमनाथाच्या रोजच्या पूजा व अभिषेकासाठी हरिद्वार, प्रयाग, काशी येथून रोज गंगोदक आणले जाई. काश्मिरातून पुजेसाठी फुले येत असत पूजेसाठी जवळपास एक हजार विद्वान ब्राम्हण नियुक्त केलेले होते मंदिरात चालणान्या नृत्य-गायन आदि कार्यक्रमासाठी जवळपास साडेतीनशे नर्तिका वा नृत्यांगनांची नेमणूक केलेली होती.

या धार्मिक संस्थानाल दहा हजार गावांचा महसूल इनामी होता श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगात सोमनाथ हे आद्य ज्योतिर्लिंग गणले जाते. हे स्वयंभू व सदा जागृत देवस्थान त्याप्रमाणे एक जुने मंदिर भद्रकाजीचे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला असलेल्या भिंतीवर एक्कावन्न काव्यपंक्तीचा शिलालेख आहे. या शिलालेखात राजा कुमार पालने जी मंदिरे वाचली व जो दानधर्म केला त्याचा उल्लेख केलेला आहे.

असेच एक पौराणिक ठिकाण आहे भल्लातक भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला व्याघ्राने मारलेला बाण लागला होता. त्या बाणाच्या जखमेतून जिथे रक्त गळाले, ते स्थान म्हणजेच भल्लातक तीर्थ होय. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. याच ठिकाणी अर्जुनाला सुभद्रा मिळाली. कार्तिकी पौर्णिमेला येथे फार मोठी यात्रा भरते

काठियावाडच्या कुशावर्त क्षेत्रात भगवान श्रीकृष्णाने सोन्याची द्वारका बनविली होती. पुढे कालांतराने याच कुश दर्भचे मुसळ बनले व त्याच्या प्रहाराने यादवांचा सर्वनाश झाला श्रीकृष्ण व बलाराम या घटनेमुळे फार व्यथित झाले. बलरामाने एक समुद्री गृहेत प्रवेश करून आपले अवतार कार्य संपविले. आजही ती गुहा येथे आहे.

याच भागार हिरण्या नदीवर एक विशाल घाट बांधलेला आहे. या घाटावरच भगवान श्रीकृष्णाचा अत्यसंस्कार करण्यात आला होता. आज येथे एक भव्य स्मारक व गीता मंदिर उभारण्यात आले आहे भगवा श्रीकृष्णाच्या पार्थिव देहावर जिथे अग्निसंस्कार झाला. त्या ठिकाणी आता श्रीकृष्णाची एक स्फटिक मूर्ती स्थापन केली आहे. त्या मूर्तीचे दर्शन घेताना श्रीकृष्णाच्या बाललीला, त्याचा जन्म त्याचे बालपण, त्याची रासक्रिडा, महाभारतातील प्रसंग, त्याचा गीता उपदेश व अवतार कार्याची समाप्ती हा सगळ कथाभाग आपल्या डोळ्यासोर उभा राहतो.

याच प्रभासपाहुणच्या परिसरात प्राचीन काळी अगस्ती ऋषींनी समुद्राचे प्राशन केले होते. रावण, पांडव जन्मेजय आदि अनेक पुराणप्रसिध्द व्यक्तींनी या क्षेत्राचे दर्शन केलेले आहे. माघ महिन्यात येणान्या महाशिवरात्रीला श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे फार मोठी यात्रा भरते.

भारतातील कोणत्याही ठिकाणाहू सौराष्ट्र सोमनाथला जाण्याकरीता अहमदाबादपर्यंत राष्ट्रीय महामार्गानि जावून पुढे गुजरात राज्य मार्गानि सौराष्ट्र सोमनाथला जाता येते.