देवावर विश्वास ठेवा पण स्वतःचे भले करा

देव असाच आपल्याकडे स्वतः हून येईल, आणि आपल्याला कधीतरी वाचवेल, अशी अपेक्षा करणंच फार चुकीचं आहे. ते काम आपण आपल्याकडे घ्यायला हवं आणि आपण आपला जीव वाचवायला हवा.

देवावर विश्वास ठेवा पण स्वतःचे भले करा

एक धर्मगुरू टेबलाजवळ बसून आपल्या पुढच्या प्रवचनाची तयारी करीत होते. अचानक त्यांना कशाचा तरी स्फोट झाला आहे, असा आवाज आला. काही क्षणांतच घाबरलेलं लोक रस्त्याने इकडून तिकडे पळताना दिसू लागले. गावातले धरण फुटले होते आणि नदीचं पाणी गावामध्ये वेगाने शिरत होतं. अर्थात गावातल्या लोकांना तिथून हलवणं चालू होतं. धर्मगुरुने पाहिलं की पाणी रस्त्यावरही जमा होऊ लागलेले आहे. सरतेशेवटी, तो ही एक माणूस होता आणि त्यालाही आतून एक भयाची लहर कापून गेली. पण त्याने जरा विचार केला, "मी इथं बसून पुढच्या प्रवचनाची तयारी करतोय. कदाचित देवाला माझा त्याच्यावर किती विश्वास आहे, हे तपासून पाहायचे असावे. मी जे काही व्याख्यानामध्ये सांगतो, तेच मी व्यवहारातही आणावे, याचीच संधी त्याने मला कदाचित दिली असावी. मी काही इतर माणसांसारखा पळून जाणार नाही, पण इथंच बसून राहील आणि देव मला वाचवेल, असा विश्वास ठेवेन."

या क्षणापर्यंत पाणी पार खिडकीपर्यंत पोहचलं होतं. माणसांनी भरलेली नाव ही नजरेच्या समोर आली. "फादर उडी मारा", ते ओरडले.

"नाही माझ्या बाळांनो", फादर आत्मविश्वासाने म्हणाले, "देव माझी काळजी घेणार, यावर माझा ठाम विश्वास आहे." त्या धर्मगुरुंनी वेड्यासारखी घराच्या छपरावर उडी मारली. पाणी तिथं पोहचायलाही काही फारसा वेळ लागला नाही. पुन्हा एक मोठी नाव त्या छताजवळून चाललेली होती. त्यातल्या लोकांनीही त्यांना विनंती केली. पण त्यांनी नकार दिला.

पाणी गुडघ्यापर्यंत आले. तेव्हा एका अधिकाऱ्याला त्यांच्या सुटकेसाठी मोटारबोट घेऊन पाठवण्यात आले, "नको, आभारी आहे" फादर त्याला म्हणाले, "माझा देवावर विश्वास आहे. तुम्ही पाहाल, तो मला कधी मरु देणार नाही." अर्थातच फादर बुडून मरण पावले आणि स्वर्गात गेले. त्यांनी सर्वप्रथम काम कोणतं केलं तर ते देवाकडे गेले आणि तक्रार करू लागले "मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तू मला वाचवण्यासाठी काहीच क केले नाही ?" "सांगतो", देव म्हणाला..

मी तुला वाचवण्यासाठी तीन नावा पाठवल्या होत्या, आठवलं?"

देव असाच आपल्याकडे स्वतः हून येईल, आणि आपल्याला कधीतरी वाचवेल, अशी अपेक्षा करणंच फार चुकीचं आहे. ते काम आपण आपल्याकडे घ्यायला हवं आणि आपण आपला जीव वाचवायला हवा. मग देव बाकीची मदत करेलच. आपण कारण आणि त्याचे परिणाम यावर विश्वास ठेवायला हवा, देवावर विश्वास ठेवा आणि त्याने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलंय, त्यामध्येच जास्तीतजास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्नही करा. ती म्हण आहे ना, "देव त्यांनाच मदत करतो, जी माणसे स्वतःला मदत करतात.