शांतता म्हणजे काय?

"शांतता म्हणजे फक्त ध्वनीचा अभाव नव्हे, तर शांतता म्हणजे 'मी'चा अभाव!'' गुरू म्हणाले.

शांतता म्हणजे काय?

एका गावाच्या बाहेर एक प्रसिद्ध असा मठ होता. त्या मठाचे मठपती हे त्यांच्या ज्ञानाच्या आणि हुशारीच्या बाबतीत अतिशय प्रसिद्ध होते. त्यांच्या प्रसिद्धीमुळे लोकांचा लोंढा आपल्या पूजनीय मठपतीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तिथं येत असे. दुर्दैवाने, या गर्दीमुळे त्या मठाची शांतता आणि एकांत यांचा भंग होत असे. शिष्यांना अतिशय त्रास होत असे, पण मठपती असलेले गुरू मात्र त्या गर्दीतही तसेच निवांत असत, जसे ते एकांतात राहात.

या गोष्टीला विरोध करणाऱ्या शिष्याला उत्तर देताना गुरू म्हणाले...

"शांतता म्हणजे फक्त ध्वनीचा अभाव नव्हे, तर शांतता म्हणजे 'मी'चा अभाव!'' गुरू म्हणाले.

 "मी" म्हणजे कुणा एकाची स्वत:च्या 'अस्तित्वाची' जाणीव होय त्यामध्ये पूर्ण आयुष्यभरामध्ये काय विचार केला आहे, काय जाणवलं आहे, आणि काय कर्म केले आहे याची नोंदच असते. एका माणसाचं पूर्णपणे असणं म्हणजे त्याचं स्वत्व होय. त्यात त्याचे प्रश्न, यातना, आनंद, दुःख वगैरे सारं काही असतंच. पण ध्यानाची अवस्था ही कुणाला अशी दुसऱ्या कशानेही प्राप्त होतच नसते, तर या स्वा बाजूला ठेवण्याच्या कलेनेच प्राप्त होते. हे म्हणजे अंगावरचे अलंकार बाजूला काढून शांत बसण्यासारखं आहे. ही अवस्था म्हणजे विचार, इच्छाआकांक्षा आणि वासनारहित मनाचं असणं आहे. अशी शांतता... अर्थात मौन म्हणजे विचाररहित अवस्था होय, फक्त जगाचेच विचार नाही तर स्वचेही विचार नसणं म्हणजे शांतता किंवा मौन !