"हक्क मिळवण्या स्वातंत्र्याचे
दिले शूरवीरांनी प्राण
मराठमोळी माती आमची
मराठवाडा आमची शान...!!"
15 ऑगस्ट 1947 संपूर्ण देशाला स्वतंत्र मिळाले तरी देखील मराठवाडा हा हैदराबाद या संस्थानाच्या निजामशाही अत्याचारातून मुक्त झाला नव्हता, हैदराबाद संस्थानातून मुक्त होऊन महाराष्ट्रामध्ये विलीन होण्यासाठी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील नागरिकांना 13 महिने संघर्ष करावा लागला.. या संघर्षासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली होती, मात्र हैदराबादचे निजाम यासाठी तयार होत नव्हते या उलट निजामांचा सेनापती काशीम रझवी जो अत्यंत क्रूर व अन्यायी होता याची रझाकार ही संघटना सामान्य जनतेवर खूप अन्याय अत्याचार करत होती. या सर्वांचा विरोध करण्यासाठी शेवटी अनेक शूरवीर मैदानात उतरले, मराठवाडा हा हैदराबाद संस्थानातून मुक्त होऊन महाराष्ट्रामध्ये विलीन होण्यासाठी जो लढा केला गेला त्यामध्ये भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानावरती ऑपरेशन पोलो लष्करी कारवाई केली आणि शेवटी ह्या कारवाईमध्ये निजामशाहीला आपली हार पत्करावी लागली 17 सप्टेंबर 1948 संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झाले आणि ह्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि त्याचबरोबर मराठवाडा देखील हैदराबाद या संस्थानांमधून मुक्त होऊन महाराष्ट्रामध्ये सामील झाला म्हणून हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी सरकारी कार्यालय तसेच शाळेच्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून ह्या लढ्यामध्ये वीरमरण आलेल्या शूरवीरांचे स्मरण केले जाते.
खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला स्वतंत्र मिळालेले दिवस म्हणजे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस या दिवसाच्या संपूर्ण भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
पुनम सुलाने-सिंगल,महाराष्ट्र