भांडण.... वाद.

अविचारी प्रवर्ती आणि स्वार्थी स्वभाव माणसाला पतनाकडे घेऊन चाललाय. यामुळे माणूस स्वतःसह इतरांच्या जीवनात देखील विष कालवतोय.

भांडण.... वाद.

कमेकांबद्दल आपुलकी एकीची भावना, आपला परका हा मतभेद बाजूला सारून एकमेकांत सहकार्य सहयोग जेव्हा नांदतो,म्हणजे त्यावर कळत नकळत प्रेम करतो. जिथे आत्म्यात प्रेम विराजते तिथे निष्कलंकित प्रेमाचे नाते बहरते. आपण जसे इतरांना वेळोवेळी (मार्गदर्शन)  उपदेश देत असतो खरोखरच आपलं आचरणं तसं असतं का?आणि ते नसेल तर याला शहाणपनाचे लक्षण कसे म्हणावे?परमेश्वराने आपल्या शरीरात मेंदू नावाची एक मशीन बसवली आहे, तिला गंज न लागू देता तिचा योग्य वापर केल्यास योग्य अयोग्य,बरोबर चूक,चांगलं या सगळ्याची उकल होईल, एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदललेल,आणि ख-या अर्थाने  परमेश्वराला हवा असलेल्या बुद्धिमान मानवाचा धरतीवर वावर वाढेल.

जनावरे बरी म्हणावे, इतके आपण विकोपाला जावून वाद घालतो हिस्र प्राण्यांसारखे एकमेकांचे लचके तोडतो.कधीतरी समोरच्याचा विचार करून त्याच्या मनाचा आढावा घेण्याचा पर्यत करू? पहा पटतंय का? एक अन्नाची पत्रावळी दोघाचौघात वाटून खाल्ली तर सर्वांची पोटं भरतील. पण त्याच पत्रावळीवरील अन्न कुत्र्यासारखं झोंबडून खायाचे म्हटलं तर मात्र, वाट्याला येणारे चार घास सुद्धा मातीमोल होतील. अविचारी प्रवर्ती आणि स्वार्थी स्वभाव माणसाला पतनाकडे घेऊन चाललाय. यामुळे माणूस स्वतःसह इतरांच्या जीवनात देखील विष कालवतोय.

बदलूया का आपण सारे...वाद विवाद भांडण तंटे यांना कायमची मुठमाती देऊन,देवाने दिलेल्या अनमोल मेदूंचा सदउपयोग करू आणि माणसासारखे वागू.

atul-vishnu-gaikwad