भाट हा शब्द संस्कृत शब्दातून उत्पन झालेला असून भाट म्हणजे स्तुतीपाठक, राज दरबारात गायन करणारे, वंशवळीचा इतिहास सांगणारे असे संबोधले जाते. "भाट" हे मुळतः राजस्थानचे असून साडे बारा जात म्हणूनही ओळखले जाते. ब्राह्मणांकडून चार्तुवर्णीय व्यवस्था आखली गेलेली होती. तसेच, कामानुसार वर्ग विभागणी करण्यात आली होती. वंशवळीचा इतिहास लिहीणारा आणि राजदरबारात गायन करणारा "भाट" हा भटका समाज इतकच आकलन त्यावेळी झालेल. म्हणूनच आपल्या वंशवळीचा इतिहास जाणणाऱ्या या भाटांचा इतिहास तर बघायलाच हवा.
भाटांच्या गायन व स्तुतीपाठक कामामुळे त्यांना वैश्यवर्णिय म्हणतात. वंशावळीचा इतिहास लेखन भविष्य सांगणे तसेच जानवे घालण्याची पद्धत यामुळे त्यांना ब्राह्मणवर्गीय पण म्हणतात. परंतु ब्राह्मणांनी चार्तुवर्णीय व्यवस्थेनुसार भाटांना क्षत्रियांमध्ये स्थान दिले होते. भाटांच्या वस्तीस्थानापासून त्यांना राजपूत भाट, गुजराती भाट, मराठे भाट अशी नावे मिळाली होती. त्यांच्यात राजभाट, ब्रह्मभाट, भारोट चारण, वोखा वहीवंचे, कंकाळीभाट, राणीमंगा भाट, मारवाड़ी भाट, चंद्रसा, बूनाशासनी, तूरी, केदारी अश्या पोटजाती बघायला मिळतात.
खानदेशात परदेशी भाट, मराठे भाट, कुणबी भाट असे तीन पोटभेद आहेत. विदर्भामध्ये वऱ्हाड भागात वासुदेव, गोंधळी, कंजरभाट, गुरव हा भाट समाज आहे.
पूर्वीच्या राजे राजवटींच्या काळात प्रत्येक राजांकडे एकतरी भाट असायचाच. पृथ्वीराज चौहान राजाकडे चंद्रदाई हकावी नावाचे भाट होते. बळीराजाजवळ पिंगळा, रामाजवळ रंपाळ, पांडवांजवळ सूत, कौरवांजवळ संजय होते. भाटांचे मुख्य काम म्हणजे राजाची स्तुती गायन पद्धतीने करणे. राजाच्या वंशवळीचा इतिहास व वर्णन काव्यरूपात करणे. भाट हे बोलके होते. स्पष्टवक्ते असायचे हा गुण चांगला आणि दोषयुक्त ही संबोधू शकतो कारण, त्यामुळे राजेलोक त्यांच्याशी थोडे जपूणच असतं. त्याकाळात कोणताही राजा भाटाची हत्या करित नव्हते.
भाटांनी लिहिलेलं लेखन हे ताडाच्या पानावर असायचं. त्यांनी रचलेल्या कवनांना अष्टपदी, कुंडली, चौपाई, छप्पा, सवाई, दोहे, कबीत, छंद प्रबंध, गीत, केहेवत असं म्हणतात. भाट स्पष्टवक्ते सहीत स्वामीनिष्ठ होते. प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा यामुळे भाटांना राजदरबारात राजे खूप मान द्यायचे. अकबर बादशाहा देखील खूप मान द्यायचा. राजांच्या कुटुंबासोबत परगावी जाण्यासाठी भाटांना सोबत पाठविण्याची पद्धती होती. तेव्हा भाटांजवळ कट्यार किंवा भाला यासारखी शस्त्रे असायची.
भाटांमध्ये वेगवेगळे पंथ आहेत. कबीर पंथी, शैव, वैष्णव, रामनंदी, स्वामीनारायण इ . ब्राह्मणांप्रमाणे भाटांमध्ये उपनयनादि संस्कार करण्याची पद्धत होती.
भाटामधील "कंजरभाट" ही जात गुन्हेगार म्हणूनही प्रख्यात होती. महाराष्ट्रात भटक्यांपैकी १३ भटक्या जमाती गुन्हेगार म्हणून घोषित केल्या होत्या फासेपारधी, कंजरभाट, पेंढारी या जातींना इंग्रजही फार घाबरायचे. स्वातंत्र्यनंतर भारत सरकारने या जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना मुक्त केले.
पृथ्वीराज चौहान राजाच्या दरबारी चंद्रदाई हकावी नावाचा विश्वासू भाट होता. महम्मद गोरीने राजा पृथ्वीराज चौहानला पकडून आणून त्यांचे दोन्ही डोळे फोडले आणि त्यांना बंदी बनविले जेव्हा आपल्या राजाच्या शोधार्थ चंद्रभाट महम्मद गोरीच्या दरबारात आले तेव्हा, चंद्रभाटाला पृथ्वीराजांचे शौर्य माहीती होते. ते महम्मद गोरीला बोलले की, तुला राजांनी सोळा वेळा माफ केले. त्यांची हीच चुकी झाली. असे बोलताच, गोरीने हकावीला सुद्धा बंदी केले. गोरीनी तिरंदाजी खेळाच आयोजन केले हुशारीने त्यात चंद्रभाट आणि पृथ्वीराज चौहान यांनी प्रतियोगीतेत सहभाग घेतला. राजा पृथ्वीराज चौहानला "शब्दभेद बाण" ही धनुरविद्या कला येत होती. नियमानुसार प्रतियोगितामध्ये कुणीही भाग घेवू शकतो. याचाच फायदा चंद्रभाट आणि राजा पृथ्वीराज चौहान यांनी घेतला होता. चंद्रभाटाने खास शैलीतून काव्य गायन केले. गोरी कुठे आहे हे त्यांना दोह्याच्या माध्यमातून सांगितले.
"चार बास चौबीस गज
अंगुल अष्टप्रमाण
ता उपर सुलतान है।
मत चुके चौहान"
हा दोहा गायन करताच राजा पृथ्वीराज चौहान यांनी बाण त्या दिशेने चालविले. महम्मद गोरी जागीच मरण पावला. शेवटी शत्रुच्या हातून मरण्यापेक्षा राजाने चंद्रभाटला स्वःताची हत्या करण्यास सांगितले पण, राजाची हत्या केल्यानंतर स्वामिनिष्ठता भंग होवून विश्वासूपणा वर डाग लागणार हे चंद्रभाटला माहीती होते म्हणूण चंद्रभाटने स्वःताची हत्या राजाला करण्यास सांगितले या घटनेनंतर भाटांना राजस्थानमधून बाहेर काढण्यात आले होते. ज्याप्रकारे फाळणीमध्ये काही मुस्लिम समाज भारत देश सोडून गेले नाही. त्याचप्रकारे काही भाटांनी ही राजस्थान सोडले नाही ते आजही तेथे वास्तव करीत आहेत. उदयपुर भागात भाट समाज मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. फणसवाडी, करडवाडी, गारगोटी, सोनाली, खानापूर, कासारवाडा, मुरगुड, वाळवा, निगपे येवती चये, म्हाळुंके, बेले, बेलवले, कुरूकली, कुरूवली, कोथळी, राधानगरी, येलवडे, हसुर, सावर्डे, सदोली, हिरावडे, बचनी, बहिरेश्र्वर, आरे, बीड माठे, खांढांगळे, कोंगे, सातारडे, म्हारूल, यावलुज, साबळेवाडी, भाठवडे, बांबवडे या शहरामध्ये हा समाज वास्तव्यात आहे.
राजस्थान सोडलेल्या भाटांनी मात्र स्वःताच्या उपजिविकेसाठी साडे बारा प्रकारची कामे केली आणि त्यावरून सोनारभाट, कलारभाट, माळीभाट, राजभाट इ प्रकारची साडे बारा जाती म्हणूण ओळखली जाणारी जात म्हणजेच "भाट" आहे. आता ना राजे-राजवाडे राहीले ना त्यांच्या पदरी असलेले भाट राहीले आता भाट समाज विविध व्यवसाय करण्यात गुंतलेला आहे परंतु, त्यांच्यामुळे कितीतरी काव्यांचे प्रकार आणि शैली लोकांना माहीती झाल्या. अश्या भाटांचा इतिहास सगळ्यांना माहीती व्हायला हवा.
सौ. नूतन अशोक मुळणकर,
ता. नांदगाव, जि. नाशिक