देशातील जातीय राजकारण थांबणे गरजेचे

आपला देश विविधतेत एकता, समता बंधुता, न्याय, या सर्वांनी नटलेला सुजलाम् सुफलाम भारत या आपल्या स्वातंत्र्य सेनानींना व शहिद जवानांना अभिप्रेत आहेत.

देशातील जातीय राजकारण थांबणे गरजेचे

प्रिय वाचकांनो,

देश वासियांनो, स्वातंत्र्य मिळवून आपल्या देशाला ७४ वर्ष पुर्ण झाले. या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशाच्या कित्येक स्वातंत्र्य सेनानींनी रक्त सांडले, परिवारचे परिवार उध्वस्त झाले. तेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज जे काही आपल्याला आपल्या देशात दिसते आहे. आपण सुखाने शांतीने जगत आहोत, हे सगळी आपल्याला त्या परिवारांची देण आहे. 

परंतु आपण आज स्वातंत्र्य तर झालो आहोत पण आता आपण जातीयवाद, धार्मिक वाद या वळणावर जाऊन आपले हे स्वातंत्र्य अबाधित न ठेवता स्वतःच इतरांना आपल्या देशाची दुबती नस दाखवत आहोत. अरे लक्षात घ्या ना आज तुमच्या आमच्यावर इंग्रज गेले सोडुन पण आज येथील सत्ताधारी राज्य करता आहेत, स्वताच्या स्वार्थासाठी तुम्हाला आम्हाला एकमेकांची डोकी फोडायला लावता आहेत.

आपण बोलतो की भारत हा जगाला शांती, समता, बंधुता, अहिंसा एकतेचा संदेश देणारा देश आहे. परंतु आज घडीला पहाता या आपल्या देशात धार्मिक दंगली जाती जातीत वाद घराघरात वाद वाढत आहेत अन् हाच शांतीचा अहिंसेचा संदेश देणारा देश अस्थिर वाटायला लागला आहे. राजकिय स्वार्थासाठी मुलगा येथे बापाला मारायला सुद्धा घाबरत नाही अशी परिस्थिती आज या देशात आहे.  इलेक्शन जवळ आले की लगेच या देशातील जनतेला धर्म, जात, भाषा, आठवते अन येथील राजकीय मंडळी या जनतेला या धर्म, जात, भाषा, या गोष्टीत गुंडाळून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात अन् पिढ्यानपिढ्या तुमच्या आमच्यावर राज्य करत आहेत.

आपल्या देशातील राजकारणाची पातळी ही आज जगातील सगळ्यात निच पातळीच राजकारण होत आहे‌. आता तर नेमकं हे राजकारण आहे की घरगुती वाद असं झालंय. परंतु या सगळ्यात सर्व सामान्य जनतेचे नुकसान होत आहे, जनतेचे पाण्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, रस्ते, मुलभुत गरजा सोडुन नुसतं जनतेला धार्मिक दंगली जातीय, दंगली यात गुरफटुन ठेवून मुळ समस्ये पासुन दुर ठेवत देशात अराजकता माजवली जात आहे. 

आता वेळीच आपण भारतीय नागरिकांनी जर आपल्या भविष्याचा विचार नाही केला तर आपल्याला कोणीही वाचवु शकणार नाही, या राजकारणी लोकांना धार्मिक राजकारण करणाऱ्या पक्षांना आपण सत्ते पासुन दुर केले पाहिजे, आज देशातील जनतेला महागाई ने अस्थिर करुन ठेवले आहे‌. सर्वसामान्य जनतेचे दोन टाईम खाण्याचे वांधे आहेत अन् या राजकीय नेत्यांचे लक्ष निवडणुकीकडे आहे. तुम्ही फक्त मत देण्यासाठी शिल्लक आहात.

खरे देश द्रोही तर हेच आहेत, सामाजिक सलोखा रहावा म्हणून या देशाला बाबासाहेबांनी संविधान दिले, परंतु त्या संविधानाच्या विरोधात जाऊन आज राजकीय नेतेच धर्मवाद, जातीवाद वाढवत आहेत खरे देशद्रोही तर हेच आहेत. तमाम जनतेला आवाहन आहे आपण कुठल्याही राजकीय धार्मिक दंगलीला वाढवु नये यात सहभागी होऊन आपले आपल्या घराचे वाटोळे या स्वार्थी लोकांसाठी करुन घेऊ नये, आपण आपल्या करियर आणी भविष्याचा विचार करत देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा संकल्प करू.

आपला देश विविधतेत एकता, समता बंधुता, न्याय, या सर्वांनी नटलेला सुजलाम् सुफलाम भारत या आपल्या स्वातंत्र्य सेनानींना व शहिद जवानांना अभिप्रेत आहेत. 

Yog Kale

योग काळे, वाळुज, औरंगाबाद