'ती'च्या एका होकारासाठी जीव कासावीस झाला

माणसाला सुखी करण्यासाठी परमेश्वराने विश्वातील सर्वात सुंदर शब्द बनवला तो म्हणजे 'प्रेम'. प्रेमालाच 'भक्ती' असे ही म्हणतात. प्रेमा इतका पवित्र शब्द जगात दुसरा असणे शक्यच नाही. 'प्रेम' आपण जसे परमेश्वरावर करतो.

'ती'च्या एका होकारासाठी जीव कासावीस झाला

काल थोडा निवांत बसलो होतो. काय करावं सुचत नव्हतं. म्हणून केतकी माटेगावकरांच्या आवाजातील  

"विठ्ठल भक्तीत मन हे चकोर,  
मना लागली हरी दर्शनाची ओढ."

हे भजन ऐकले. भजनाचा एक एक शब्द मनात साठवला. संत कवींनी किती मनापासून विठ्ठलावर प्रेम केले. आणि जीवनाच्या शेवटी का होईना, विठ्ठल त्यांना प्राप्त झाले. संत मीराबाईंनी कृष्णाची मनापासून भक्ती केली. कृष्णाने ही संत मीराबाईची भक्ती बघून विषाचे अमृत केले, आणि विषारी सर्पाच्या पुष्पमाळा केल्या. आणि मीराबाईंना आपल्या मूर्तीत सामावून घेतले. वरील सर्व गोष्टींवरून माझ्या एक लक्षात आले. जर आपण  मनापासून भक्ती केली तर ईश्वर आपल्याला नक्कीच प्रात होतो. 
   
माणसाला सुखी करण्यासाठी परमेश्वराने विश्वातील सर्वात सुंदर शब्द बनवला तो म्हणजे 'प्रेम'. प्रेमालाच 'भक्ती' असे ही म्हणतात. प्रेमा इतका पवित्र शब्द जगात दुसरा असणे शक्यच नाही. 'प्रेम' आपण जसे परमेश्वरावर करतो. तसेच एखाद्या व्यक्तीवरही करू शकतो. 'प्रेम' झाल्यानंतर जेव्हा त्या प्रियकराला पाना-फुलांत, झाडात-वेलीत, दगड-मातीत, आकाशात-जमीनीवर, झाडा-झुडपात, पशु-पक्षात जेव्हा प्रियसी दिसू लागते ना तेच खरे प्रेम. ती रात्र-रात्र स्वप्नांत येऊन गुजगोष्टी करते ना तेच खरे प्रेम.
       
लेखक, कवी, संगीतकार, गीतकार हे मनापासून प्रेम करणारे माणसं. असे नेहमीच बोलले जाते. नजरेची भाषा ओळखणारे लेखक, कवी, संगीतकार, गीतकार आसतात.  कारण त्यांच्या प्रत्येक कृतीतून 'प्रेम' पाझरत असते. हे ही तितकेच खरे असावे. 
      
तिचे पाणीदार डोळे आणि डोळ्यातील प्रामाणिक भाव बघिल्यानंतर जेव्हा मनापासून 'प्रेम' करावं वाटतं ना. तेच शेवटपर्यंत टिकणारे 'प्रेम' असते. तिला एकदा भेटावा. अशी इच्छा जेव्हा प्रियकराच्या मनात उत्पन्न होते. आणि तीही भेटायला तयार होते. ती उद्या भेटणार म्हणून रात्री प्रियकराच्या डोळ्याला डोळा लागत नाही. रात्रभर तो जागतो. त्याच्या मनात फक्त  केव्हा तिला 'याच देही याच डोळा' बघू असे वाटू लागते. तिला प्रत्येक्षात बघण्यासाठी तिला डोळ्यात साठवून घेण्यासाठी त्याचे डोळे आतूर झालेले असतात. तो सारखं तिच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ती समोर येते. तो तिला पहिल्यांदा पाहतो. तेव्हा त्याला 'आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटते'. त्याला खुप आनंद होतो. त्यानंतर ती पूर्ण दिवस त्याच्या सहवासात घालविते. आयुष्यभर दुःख भोगत  असलेला तो. तिच्या संवादामुळे, तीच्या सहवासामुळे विश्वातील सर्वात सुखी मनुष्य आहे. असे त्याला वाटते.
         
तो तिच्यावर जीवापाड प्रेम करू लागतो. हे तिला ही माहीत असते. तिच्या डोळ्यातील भाव हे सर्व स्पष्ट करत असतात. त्याने तर त्याचा श्वास कधीच तीला अर्पण केला होता. त्याच्या श्वासातील प्रत्येक 'स्पंदन' तिचेच नाव घेत होते. त्याला रात्र-रात्र स्वप्नांत तीच दिसू लागली होती. दिवसभर जर तिचे बोलणे झाले नाही तर ती रात्री स्वप्नांत येऊन बोलायची, एखाद्या वेळी तिच्याविषयी काही वाईट स्वप्न पडले तर तो रात्रभर बेचैन व्हायचा. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तिचा आवाज कानावर पडेल तेव्हाच त्याला बरं वाटायचं. प्रत्येक क्षणाला तिचीच आठवण त्याला सतावत असायची आणि आजही तिची आठवण सतावत असते. ती कशी असेल, काय करत असेल. ती सुखी असेल का? ती काही अडचणीत तर नसेल ना. तीची तब्येत कशी असेल. असे विविध प्रश्न त्याच्या मनात घोंघावत असतात. ती नेहमीच सुखी असावी. आनंदी असावी. अशीच प्रार्थना तो रोज परमेश्वराला करत असतो.
        
त्याची फक्त आता एकच इच्छा आहे. ती इच्छा म्हणजे तीने त्याच्या प्रेमाचा स्विकार करावा. त्याच्या अतुर प्रेमाची आता फक्त श्रध्दा ही एकच आस आहे. 

Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर  
९६६५६३६३०३.