त्याचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. पण...

एक दिवस सागर तेजस्विनीला बोलता-बोलता बोलला माझं प्रेम आहे तुमच्यावर...

त्याचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. पण...

ही कहाणी आहे सागर नावाच्या एका कवीमनाच्या तरूणाची. सागर म्हणजे खुप चांगला आणि सुस्वभावी तरूण. कोणाचेही दुःख पाहुन नेहमीच हळहळणारा आणि त्याच्या परिस्थितीप्रमाणे तात्काळ मदत करणारा. एवढे चांगले कामं करून देखील त्याच्या वाट्याला नेहमीच दुःख पेरलेले. 

असच एक दिवस तेजस्विनी नावाच्या तरूणीसोबत एका कामानिमित्त सागरचे फोनवर बोलणे झाले. दुसऱ्या दिवशी सागरला तेजस्विनीचा सहज फोन आला. आणि दहा मिनिटांच्या बोलण्यातून दोघांचा परिचय झाला. बोलता-बोलता तेजस्विनीच्या बोलण्यातून सागरला दुःख जाणवले. सागरही स्वतःच्या जीवनात दुःखी होता. त्यामुळे तेजस्विनीविषयी सागरच्या मनात ओढ निर्माण झाली. ते रोज फोनवर बोलू लागले. सकाळी सर्वात पहिला फोन सागरचा तेजस्विनीला असायला किंवा तेजस्विनीचा सागरला असायला. खुप कमी दिवसात दोघांची खास मैत्री झाली. सागर तेजस्विनीवर मनापासून प्रेम करू लागला.

sagar talk tejaswini

एक दिवस सागर तेजस्विनीला बोलता-बोलता बोलला माझं प्रेम आहे तुमच्यावर. त्यावर तेजस्विनी बोलली, स्वारी आपण मित्र मैत्रिणी म्हणून खुप चांगले आहोत. त्यावर सागर बोलला. तुम्ही प्रेमाचा विचार तर करा. नंतर बघू आपण. त्यावर तेजस्विनी बोलली, सर... माझे प्रेम होते हो एका व्यक्तीवर, मी खुप प्रेम करायचे त्याच्यावर पण तो एक दिवस मला अचानक सोडून गेला. परत कधीच आला नाही. माझी काही चुकी झाली असेल का? तेजस्विनीकडून काही चुकी होईल अशी ती नव्हतीच. तिचा स्वभाव खुप चांगला होता. कारण तेजस्विनी ज्या भागात राहायची त्या भागातील अनेक घटना अशाच घडलेल्या असायच्या. म्हणजे मुलींना प्रेमात फसवायचे, त्यांचा फायदा घ्यायचा आणि नंतर गायब व्हायचे. हे सर्व सागरच्या लक्षात आले, तेजस्विनीसोबत प्रेमाचे राजकारण झाले. ही घटना ऐकून सागर खुप दुःखी झाला. आणि तेजस्वीनीवर जीवापाड प्रेम करू लागला. एक दिवस तेजस्विनीचाच सागरला फोन आला. माझा होकार आहे म्हणून.  सागर खुप खुश झाला. त्याच्या जीवनातील तो सर्वात मोठा आनंद होता. या आनंदाच्या भरात सागरला चार दिवस झोपच लागली नाही. दोघही एकमेकांसोबत खुप बोलू लागले मन मोकळं करू लागले. एकमेकांचे सुख-दुःख एकमेकांना सांगू लागले. पण म्हणतात ना! चांगल्या माणसाच्या आयुष्यात आनंद जास्त दिवस टिकून राहत नाही. तसेच सागरच्या आयुष्यात झाले.

त्या चार पाच दिवसात तेजस्विनीच्या आयुष्यात एक स्मार्ट दिसणारा सचीन नावाची व्यक्ती आला. सचीन हा बोलण्यात पटाईत होता. आणि दिसायला स्मार्ट होता. त्यामुळे त्याने तेजस्विनीला चार पाच दिवसात बरोबर सागरपासून बाजूला केले. आणि सातव्या दिवशी तेजस्विनी सागरला म्हणाली, सर मला माफ करा, मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. मी भावनेच्या भरात तुम्हाला हो म्हटले. हे ऐकून सागरच्या पायाखालची जमीनच सरकली. एक विषय मात्र सागरच्या तेव्हाच लक्षात आला. तो म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी चांगला व्यक्ती तेजस्विनीच्या आयुष्यात आला म्हणूनच ती मला नाही म्हटली. पण जाऊद्या ती नेहमीच आनंदी असावी असे सागर मनापासून बोलला. कारण खरं प्रेम कधीच व्देष शिकवत नाही. 

तेजस्विनीचा विषय काही केल्या सागरच्या मनातून जात नव्हता. ही घटना होऊन एक वर्ष झाले. पण अशी एकही रात्र गेली नसेल की सागरचे डोळे भरून आले नाही. तिची आठवण आली की सागर आजही एकांतात जाऊन खुप रडतो. मी सागरला अनेकदा समजावले पण तो म्हणतो. मी जर तिच्या शरीरावर प्रेम केले असते तर तिला एका क्षणात विसरलो असतो. पण मी तिच्या मनावर प्रेम केले, मी तिच्या दुःखावर प्रेम केले. त्यामुळे मी तिला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही. 

आजही सागरचे मन भरून येते. आणि तेजस्विनीजवळ ते भरलेले मन मोकळे करावे, असे त्याला मनापासून वाटते. कारण सागरचे तेजस्विनीवर जीवापाड प्रेम आहे. पण... हे प्रेम तेजस्विनीला कधी कळेल ही येणारी वेळच सांगेल. कारण सचीनने देखील तिच्यासोबत प्रेमाचे राजकारणच केलेले आहे. हे ही तितकेच खरे. तेजस्विनीला कायमस्वरूपी मनापासून जीव लावणारे दोनच व्यक्ती आहे. एक म्हणजे तिची आई. आणि दुसरी म्हणजे सागर. बाकी याव्यतिरिक्त सर्व राजकारण आहे. 

Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद