इतिहास प्रसिद्ध राजा : महान योद्धा महाराणा प्रतापसिंह

भारतीय इतिहासातील मातृभूमीसाठी देशप्रेम, धैर्य, संघर्ष, दृढनिश्चय आणि अमर बलिदानाचा पर्याय म्हणजेच मेवाड राजा महाराणा प्रताप...

इतिहास प्रसिद्ध राजा : महान योद्धा महाराणा प्रतापसिंह

अकबराच्या जुल्मी सत्तेला शेवटच्या श्वासापर्यंत कडवी झुंज देणारा इतिहास प्रसिद्ध राजा : महाराणा प्रतापसिंह

प्रभू रामचंद्रच्या पवित्र कुळात म्हणजेच रघुकूळात बाप्पा रावळांचा जन्म झाला. बाप्पा रावळांचा काळ म्हणजे सन आठव्या शतकाच्या प्रारंभीचा आठव्या शतकात हिंदुस्थानावर नेटकेच अरबाचे अक्रमणे सुरू झाली होती. सन ७४० च्या सुमारास महमंद बिन कासीम याने आक्रमण करून हिंदुस्थानचे काळीज समजल्या जाणाऱ्या राजस्थानच्या पवित्र भुमीकडे आपला मोर्चा वळविला. परंतू कासीम पूर्णपणे अयशस्वी झाला. कारण राजस्थानच्या चित्तोड या किल्ल्यावर बाप्पा रावळ या शूर राजपूत राजाचे राज्य होते. बाप्पा रावळांच्या पराक्रमाने महमंद बिन कासीमला पळता भुई थोडी झाली आणि त्याने लगेच हिंदुस्थानच्या बाहेर पळ काढला. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अरबांची मनुष्यहानी झाली. महंमद बिन कासीमचे हे हिंदुस्थानवरचे हे पहिले आणि शेवटचे आक्रमण ठरले. ज्योपर्यंत चित्तोडवर बाप्पा रावळांचे राज्य होते. तोपर्यंत एकाही अरबाने किंवा परकीय सत्तेने हिंदुस्थानकडे वर नजर करण्याची हिंमत केली नाही. बाप्पा रावळांच्या वंशजांनी सन ८०० ते सन १८१८ पर्यंत म्हणजे १०१८ वर्ष परकीयांचे मांडलिकत्व पत्करले नाही.
           
भगवान श्रीराम व बाप्पा रावळांच्या पविञ रघुकूळात शुरवीर राणा उदयसिंह व राजमाता जयवंती देवी यांच्या पोटी ९ मे १५४० रोजी महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म झाला. महाराणा प्रतापसिंह यांनी हिंदवी स्वराज्यासाठी मोलाचा वाटा उचलला. महाराणा प्रतापसिंह यांच्या समकालीन असलेला दिल्लीचा सम्राट अकबर बादशहा हा हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात क्रूर बादशहा म्हणून ओळखले जाते. अकबराने ३०,००० राजपूतांची एकाच वेळी हत्या करून खरा दहशतवाद काय असतो हे हिंदुस्थानला दाखवून दिले. एवढी मोठी मनुष्य हानी होऊन देखील चित्तोडवर केसरी ध्वज मानाने डोलत होता. तो ध्वज अकबराला सांगत होता की, स्वाभीमानी राजपूत मृत्यूला कवटाळतील पण परकीय सत्तेपूढे कधी झुकणार नाही. राजपूत झुकतो तो फक्त भगवान श्रीराम, भगवान एकलिंगी, आई-वडील व मातृभुमी पुढेच आणि या व्यतिरिक्त जो सत्तेसाठी कुठेही झुकतो तो भगवान श्रीरामांचा वंशज नसतोच.

दहशतवाद पसरवणाऱ्या अकबराचे स्वप्न होते की, अखंड हिंदुस्थान आपल्या अधिपत्याखाली आला पाहीजेत. त्याकरिता त्याने व्युवरचना रचून हिंदुस्थानचे बहुसंख्य राज्ये आपल्या साम्राज्यात विलीन केले तसेच अनेक राजांना अमिषे दाखवून आपल्या दावणीला बांधले.परंतू 'मेवाड' राज्य आपल्या साम्राज्यात विलीन करण्यासाठी अकबर उताविळ झालेला होता.

जोपर्यंत मेवाडचा राजा महाराणा प्रतापसिंह यांना आपल्या पुढे झुकवत नाही तोपर्यंत मेवाड हे राज्ये अकबराच्या डोळ्यात मिरची सारखे सलत होते. त्याकरिता त्याने फोडा आणि झोडा या नितीचा उपयोग करून अनेक राजपूत राजांना आपल्या दरबारात महत्त्वाची पदे देऊन नेहमीच तो त्यांना महाराणा प्रतापसिंहांच्या विरोधात भडकवत राहीला. त्यात प्रामुख्याने मानसिंह, जगमल, राणा तोडरमल, जगन्नाथ कच्छवा, राणा भगवानदास, सागर सिंह, गजरा चौहान या राजपूतांचा समावेश होता. वरील सर्वच शुर राजपूत असून अकबराच्या संपर्कात आल्यामुळे वाया गेले. हे सर्व करूनही महाराणा आपल्यापूढे झुकत नाही. हे पाहून अकबर हताश झाला. अकबराने महाराणा प्रतापसिंह यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी दीड वर्षात चार शिष्टमंडळे पाठवले. त्यात प्रामुख्याने मानसिंह, राणा तोडरमल, यांच्यासह अनेक राजपूत राजे होते. वाटाघाटीचा प्रस्ताव जनतेच्या हितासाठी नसल्याने महाराणा प्रतापसिंहांने तो अमान्य करून स्पष्टपणे सांगितले की माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी मातृभुमीसाठी व मेवाडच्या जनतेसाठी लढत राहील. तसेच मला मृत्यू येईपर्यंत मी दिल्लीच्या जुलमी सत्तेपूढे झुकणार नाही. हे ऐकून सर्वजन दिल्लीला परत निघून गेले. तसेच दिल्लीला जाऊन त्यांनी सांगितले की महाराणा प्रतापसिंह आपली एकही अट मान्य करायला तयार नाही. हे ऐकून अकबराची अवस्था पिसाळलेल्यागत झाली. त्यानंतर अकबराने लगेच युध्दाची घोषणा केली व इतिहास प्रसिद्ध 'हळदी घाटी' युद्ध घडून आले.

हळदी घाटी युद्धानंतर महाराणा प्रतापसिंह जंगलात राहीले. कंदमुळे आणि झाडांची पानं खाऊन त्यांनी दिवस काढले. परंतू अकबराच्या जुलमी सत्तेपूढे त्यांनी मान झुकविली नाही. त्यानंतर अकबराने महाराणा प्रतापसिंह यांना एक पञ पाठवून कळविले की, राणाजी तुम्ही जर तुमचे राज्य आमच्या साम्राज्यात विलीन करत असाल तर अर्ध्या हिंदुस्थानचे तुम्हाला राजा करतो. पण महाराणा प्रतापसिंहांनी स्पष्ट नकार दिला आणि सांगितले की, ही मान कटेल परंतू तुझ्या जुलमी सत्तेपूढे कधीही झुकणार नाही.
          
८ ऑक्टोबर १५८५ ला अकबराने महाराणा प्रतापसिंहांना झुकविण्याचा शेवटचा प्रयत्न केला परंतु तो तेव्हाही पूर्णपणे अयशस्वी झाला. त्यानंतर तो कायमचाच दिल्लीला निघून गेला. संपूर्ण हिंदुस्थानचा सम्राट असलेल्या अकबराने महाराणा प्रतापसिंहांना झुकविण्यासाठी नाना प्रयत्न केले परंतु महाराणा प्रतापसिंह या एकनिष्ठ राजपूत राजाला तो कधीच झुकवू शकला नाही. त्यानंतर अकबराला झोप सुध्दा येत नसे झोपेतही त्याला महाराणा प्रतापसिंह दिसत आणि तो ताडकन झोपेतून उठून बसत.

त्यानंतर 'चांवड' नगरीमध्ये महाराणा प्रतापसिंहांनी एक छोटासा महल बांधला. महाराणा धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी आपल्या राज्यात अनेक देवदेवतांची मंदिरे बांधली. त्यांनी आपल्या कार्यकाळात संस्कृत भाषाला उत्तेजन दिले. त्यांच्याच काळात अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. आजही राजस्थानमध्ये त्या ग्रंथाची हस्तलिखिते उपलब्ध आहे.
        
महाराणा प्रतापसिंहांच्या आश्रयाला अनेक साहित्यिक, कलावंत, विचारवंत होते. राणाजी त्यांचा योग्य तो मान सन्मान करत असत. त्यात प्रामुख्याने पंडित चक्रपाणी मिश्र या साहित्यिकांकडून त्यांनी 'मुहूर्तमार्तड' व 'राज्यभिषेक पध्दती' या दोन ग्रंथाची निर्मिती करून घेतली. शास्ञ आणि ज्योतिषविद्या या विषयावरील विवेचन वरील ग्रंथांत आहे. तसेच 'विश्ववंल्लभ' या ग्रंथामध्ये कृषी विषयक माहिती, पाणी परिक्षण, माती परीक्षण, जलसंधारण, पर्यावरण तसेच फळाफुलांचा औषधी उपयोग याविषयी माहिती आढळते. यावरून महाराणा प्रतापसिंह किती दूरदृष्टी राजा होते हे आपणास लक्षात येते.

साहित्याप्रमाणेच महाराणा प्रतापसिंहांना कवितेचीही आवड होती. ज्यावेळी राज्यभर अफवा पसरली की, महाराणा प्रतापसिंह अकबराला शरण येत आहे. त्यावेळी महाराणा प्रतापसिंह यांचा मावसभाऊ तथा प्रसिद्ध कवी पृथ्वीराज राठौर यांनी महाराणा प्रतापसिंहांना काव्यरूपात पञ पाठविले, ते असे.

पातल जो पतसाह बोले मुखहूता बयण !
मिहर पछमदिस माॅह, उगे कासप रावउत !!
पटकू मुछा पाण, के घटकू निजतण करड !
लिख दिवाण इण दोन महली बात इक !!
दीजो लिख दिवाण इण दोन महली बात इक !!

अर्थ : ( महाराणा प्रतापसिंह जर आपल्या तोंडाने अकबराला बादशहा म्हणेल, तर सुर्य पश्चिमेला उगवेल. राणा मी माझ्या मिशावर ताव देऊ की, माझ्याच तलवारीने शरीरावर घाव घालू ? या दोन्हीमधील एक गोष्ट मला कळवा.)

महाराणा प्रतापसिंह देखील उत्कृष्ट कवी होते. त्यांनीही पृथ्वीराज राठौरला काव्य स्वरूपात पञ पाठविले ते असे

तुरक कहासी मुखपतौ इण तण सूं इकलिंग !
उगै जांही उगसी, प्राची बीच पतंग !!
खुशी हूत पीतल कमध, पटको मुछा पाण !
पछटण है जेतै पतों, कलमा सिर केवाण !!

अर्थ : ( एकलिंगी महाराजांचा मी एकनिष्ठ भक्त आहे. एकलिंगी महाराज माझ्या या शरीराकडून अकबराला तुर्कच म्हणवतील व सुर्याचा उदय हा पूर्वेलाच होईल. हे राठौर पृथ्वीराज जोपर्यंत मी माझी तलवार यवनांच्या शिरावर धारण केलेली आहे तोपर्यंत तू आपल्या मिशीवर खुशीत ताव देत रहा.)

तसेच महाराणा प्रतापसिंहांना चिञकलेचीही आवड होती. सिलहाद्दीन नावाचा चिञकार महाराणांच्या पदरी होता. आजही चांवड नगरीमध्ये त्याच्या नावासहीत चित्र पाहायला मिळतात. चांवड हे शहर सन १५८५ ते १६१५ पर्यंत मेवाडची राजधानी होती. तरीही त्यापूढे हे शहर २०० वर्ष कला, साहित्य आणि संस्कृतीचे केंद्र बनून राहिले.

एके दिवशी महाराणा प्रतापसिंह शिकारीसाठी गेले असतांना त्यांनी धनुष्य बाण जास्तच ताणला आणि अंग वळवितांना पोटात दुखापत झाली. त्यानंतर राणाजी आजारी पडले, राजवैद्यांनी भरपूर प्रयत्न केले परंतू काही ही उपयोग झाला नाही. अखेर १९ जानेवारी १५९७ रोजी वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी हिंदुस्थानच्या महान सुर्याचा चांवडमध्ये अस्त झाला.

जवळजवळ २५ वर्ष त्याकाळचा सर्वात बलाढ्य सम्राट अकबर आणि हिंदू सुर्य महाराणा प्रतापसिंह हे एकमेकांसमोर उभे होते. अकबराने सर्व शक्तीनिशी महाराणा प्रतापसिंहांना झुकविण्यासाठी प्रयत्न केले परंतु शेवटपर्यंत अकबर महाराणा प्रतापसिंहांना झुकवू शकला नाही.

महाराणा प्रतापसिंहांची मृत्यूची बातमी ऐकून सम्राट अकबराच्या पदरी असलेला 'दूरसा आढा' नावाचा कवी म्हणतो की,

सुखहित स्याल समाज, हिंदू अकबर बस हुवा !
रोसीला मृगराज, पजे न राणौ प्रतापसी !!

अर्थ : ( समस्त हिंदू राजे सुखोपभोगाच्या लोलूपतेमुळे कोल्हे भासत असत. पण महाराणा प्रतापसिंह एकमात्र खराखुरा 'वनराज सिंह' होते की ज्यांनी अकबरापूढे शिर लवविण्यास नकार दिला.

त्याचप्रमाणे थोर इतिहासकार कर्नल टाॅडने लिहून ठेवले आहे की, महाराणा प्रतापसिंहांची किर्ती अमर आहे. अनेक बदल होतील, स्थित्यंतरे येतील. परंतु समाजात उच्च चरित्र, त्याग व शौर्याची कदर असेपर्यंत महाराणा प्रतापसिंहांची स्मृती सर्वांना स्फूती देत राहिल.

Baba Channe

बाबा चन्ने, वैजापूर, जि. संभाजीनगर
babachanne86gmail.com
९६६५६३६३०३.