मनातील अंतरंग

माझ्या डोळ्यातील जगणं हे खूप वेगळं आहे प्रत्येकाची जीवन जगण्याची परिभाषा वेगळी असते पंखात बळ, आकाशात मारलेली एक भरारी जो आनंद देते तो कशातच नाही.

मनातील अंतरंग

गोष्ट श्वास कोंडून जगणारा एका व्यक्तिमत्त्वाची शिक्षणाची आवड; पण परिस्थिती अभावी ते अपूर्ण,... मग पायात बंधनाच्या असंख्य बेड्या संस्काराच्या नावाखाली लादलेली नात्यागोत्याची ओझी. या साऱ्यात भरडून निघणाऱ्या निष्पाप जीवाची! माणसाला स्वातंत्र्य हे नावापुरतेच असते; कारण जिथे आपली रोजनिशी सुरू असते तो रंगमंच इतका मुखवटे बदलणाऱ्या लोकांची जणू एक झुंड आहे. त्यात सामान्य घरकाम करणाऱ्या स्त्रियांना जणू कुणी वालीच नसतो.

शिका, पायावर उभ्या रहा या एका संकल्पनेला सुद्धा सगळे वैऱ्यासारखे आडवे येतात. मुलगी आहे शिकून काय करणार, नोकरी कुठे मिळणारी या असंख्य विवंचनेमध्ये समाज जखडलेला अजूनही आहे मुलगी म्हटलं की जबाबदारीचे ओझं. लग्न करून मोकळे व्हा! यात कोणाचा दोष काय माहित लग्न करून सगळं मिळतं का? माहित नाही; कारण अजून तरी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे प्रत्येकाची परिभाषा वेगळी असते. लग्न करून जर त्रास होत असता तर कोणी लग्न केलं नसतं; पण म्हणून जगण्याचा दुसरा अर्थ लग्न किंवा स्वतःच अस्तित्व निर्माण करणे हा होतो का?

माझ्या डोळ्यातील जगणं हे खूप वेगळं आहे प्रत्येकाची जीवन जगण्याची परिभाषा वेगळी असते पंखात बळ, आकाशात मारलेली एक भरारी जो आनंद देते तो कशातच नाही. गरजा आणि मूलभूत हक्क यात अडकून पडलेल्या लोकांना जगण्याचा अर्थ कधी कळणार कोण जाणे! भावना विभोर असलेला लोकांना भावना शून्य असलेल्या लोकांचा खूप त्रास होत असतो. स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या ही एक भावना सगळ्यांनी उराशी बाळगावी; कारण प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार असतो आणि निसर्गाने ही एकमेव देणगी सगळ्यांना समान दिली आहे तरीपण काही लोकांवर अन्याय हा होतच असतो आणि त्या अन्यायाला वाचा कधी फुटणार कोण जाणे. स्वतःचा शोध सुरू होतो

स्वतःचा शोध सुरू होतो तो मनाला काहीतरी खटकले तेव्हा आणि मग या साऱ्या गर्दीत आपल्याला आपली ओळखच नसते. मन कानोसा घेत वेड्या हरवलेल्या पाडसा सारखं सैरभैर होऊन फिरू लागतं. आपण कुठे उभे आहात ह्याच सुद्धा आपल्याला भान राहत नाही. मग अस्तित्वाचं काहूर मनात पेटून उठतो आणि भावनांचा युद्ध स्वतःशी सुरू होतं तेव्हा अस्तित्वाच कोवळे देठ मोडून पडतं आणि मग यात मात्र घायाळ झालेलं मन कोमेजून गेलेल्या पानाप्रमाणे खाली गळून पडलेलं असतं म्हणून मनाला जपलं पाहिजे त्याचं संगोपन केलं पाहिजे आठवणीचा ठेवा जसा जपतो तसं मनही जपलं पाहिजे कारण आपल्या मनाला आपणच जपायचं असतं मन मोडणारे इथे पावला पावलावर उभे असतात त्यांचा विचार न करता मनाला तरुण ठेवलं पाहिजे तरच उठलेले अंतरंग शोभून दिसतील आणि त्याचा इंद्रधनुष्य रंगीबेरंगी होऊन आकाशात भरारी मारणाऱ्या त्या पक्षांना दिसेल

Jyoti Sanjay Shinde

सौ ज्योती संजय शिंदे
रा. चाकूर .जि. लातूर