प्रिय व्यक्तीच्या सहवासात मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्यच

सुलोचना आणि सागर दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले. सुलोचनाला काही दुःख झाले तर वेदना सागरला होत. अन् सागरला काही दुःख झाले तर वेदना सुलोचनाला होत.

प्रिय व्यक्तीच्या सहवासात मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्यच

माझा बालपणीच्या मित्र सागर याचा फोन आला. सागरचा फोन आल्यामुळे मलाही खुप आनंद झाला. मनातील सर्व गोष्टी व्यक्त करणारा सागर माझा एकमेव मित्र होय. सागर तसा खुप हुशार आणि जबाबदार मुलगा. त्याची मागील काही दिवसापूर्वी सुलोचना नावाच्या मुलीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघंही सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगू लागले. सुलोचना छान स्वभावाची आणि प्रामाणिक मुलगी असून ती मनात कुठलाच विषय लपवत नव्हती. तिचा प्रामाणिक स्वभाव सागरला खुप भावला. त्यामुळे सागर सुलोचनासोबत तासनतास फोनवर बोलत असे. तसेच सकाळी साडेपाच वाजता सुलोचनाचा सागर पहिला फोन येत असे. सागरच्या दिवसाची सुरुवात सुलोचनाचा आवाज ऐकून होत असे. यावरून आपल्या लक्षात येईल की, दोघांचे मने किती एकरूप झालेले असावेत. त्यामुळे सागरने एके दिवशी सुलोचनाला प्रेमाची मागणी घातली. आणि दोन दिवस विचार करून तीने ही होकार दिला. तिच्या एका होकारामुळे सागरच्या जीवनात नंदनवनच फुलले. 
      
सुलोचना आणि सागर दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले. सुलोचनाला काही दुःख झाले तर वेदना सागरला होत. अन् सागरला काही दुःख झाले तर वेदना सुलोचनाला होत. एक-एक दिवस पुढे सरकत होता. तसेच दोघांमधील प्रेम ही वाढत होते. सागरने आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केले होते. आणि ते ही एका प्रामाणिक मुलीवर याचा सागरला खुप आनंद होता. ज्या दिवशी सागरला होकार मिळाला तो दिवस सोमवारचा होता. दोघांनी भेटावं बोलावं यासाठी भेटावं असं वाटलं. आणि सोमवारी भेटायचे ठरले. सोमवार हा होकार दिल्यानंतरचा आठवा दिवस होता. दोघंही भेटले, बोलले. आणि सुलोचनाच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडले. "सागर मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही". मला माफ कर. सुलोचनाच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर जसा भुकंप व्हावा, भयान किंचाळ्या ऐकायला याव्यात. जमीनीतून 'लाव्हारस' बाहेर पडून जमीन उध्वस्त व्हावी. अशी अवस्था सागरची झाली जसा सुलोचनाचा तोंडून शब्दरूपी तप्त लाव्हारस सागरच्या कानात पडला आणि सागर कायमचाच शांत झाल्यासारखा झाला. त्याला काय बोलावे सुचेना. कारण सागरने सुलोचनावर मनापासून जीवापाड प्रेम केलेले होते.
      
सुलोचना सागरला बोलली. सागर मी तुझ्यावर जेवढे प्रेम एक प्रियकर म्हणून करत होते. तेवढेच प्रेम मी तुझ्यावर एक चांगला मित्र म्हणून करेल. सागरच्या तोंडून फक्त हो शब्द बाहेर पडला. कारण खऱ्या प्रेमात माणूस जेव्हा हारतो, तेव्हा तो पूर्ण उध्वस्त झालेल्या असतो. अशीच अवस्था सागरची झालेली होती.
       
त्यानंतर सकाळी साडेपाचला फोन करणारी सुलोचना हळूहळू सागरला टाळू लागली. तीने हळूहळू फोन करणे बंद केले. मेसेज करणे पण टाळू लागली. ती बोलली नाही की सागर व्याकुळ व्हायचा. सुलोचना कशी असेल, ती सुखी असेल ना, ती दुःखी तर नसेल ना. असे विचार सागरच्या मनात येत. सुलोचनाचा नकार येऊन आता जवळपास चार महिने झाले होते. मित्र म्हणून देखील सुलोचनाने सागरला मनातून काढले होते. परंतु सागरच्या मनात तिच्याविषयी प्रेम कमी होण्याऐवजी वाढतच होते. आणि सुलोचनाने तर सागरसोबत बोलणं आता जवळपास बंदच केलेले होते. सागरची आता फक्त एकच अपेक्षा होती. ती म्हणजे तीने माझ्याशी बोलावं. पण ती बोलत नाही. याचेच दुःख नेहमीच सागरला बोचत होते. तिचा नुसता आवाज कानी पडला तर सागर सुखावतो. ती जर समोर दिसली तर सागरच्या आनंदाला पारावारच राहत नाही.
      
सुचोलनाच्या घरचे सागरच्या ओळखीचे असल्यामुळे गुरुवारी सागर तीच्या घरी गेला. तेव्हा तीही घरीच होती. तीला बघितल्यानंतर सागरला खुप आनंद झाला. सुलोचनाला काही सरकारी कामे असल्यामुळे ती घरी थांबलेली होती. अशी तिच्या आईकडून माहिती मिळाली. आणि ते काम करायला सरकारी कार्यालयात जाण्यासाठी तिचा नातेवाईक येणार होता. परंतु त्या नातेवाईकांना अचानक काही काम निघाल्यामुळे ते येवू शकले नाही. तेव्हा तीची आई सुलोचनाला  म्हणाली तू जाते का सागरसोबत तेव्हा सुलोचना काहीच बोलली नाही. परत तीची आई म्हणाली अगं जा सागरसोबत आणि करून ये काम तुझं. तीही मग हो म्हणाली. 
      
सागर व सुलोचना दोघंही दुचाकीवर कार्यालयात निघाले. कार्यालयात जातांना सुलोचना सागरसोबत काहीच बोलली नाही. सागरने फक्त रस्ता कोणता आहे. हेच वाक्य विचारले. त्यानंतर दोघंही शांतच कोणीच कोणाशी बोलेना. सरकारी कार्यालयात काम झाले. आणि सुलोचनाला तीची मैत्रीण भेटली दोघी बोलत उभ्या राहिल्या. सागरही बाजूला जावून थांबला.
         
दोघी मैत्रीणींचे बोलणे झाल्यानंतर सागर व सुलोचना परत येण्यासाठी निघाले. येत्यावेळी पण बोलणं झालं नाही. शांतच होते दोघेही. सागर बोलू शकत होता. त्याला खुप काही बोलावसं वाटत होतं. पण आपण बोलल्यानंतर सुचोलना दुखावली तर योग्य होणार नाही. त्यामुळे तो शांतच होता. त्याच्यासाठी फक्त तिचा 'सहवास' महत्त्वाचा होता. त्या एका तासाच्या सहवासाने सागर मागील चार महिन्याचे दुःख विसरला. तीच्या सहवासामुळे तो खुप आनंदी झाला. 'सहवास' क्षणाचा असो किंवा तासाचा तो सहवास असतो. अन् तो 'सहवास' जर प्रिय व्यक्तीचा असेल तर त्या सहवासातील आनंद शब्दांत व्यक्त मांडणे अशक्यच. 
      
सुलोचनाच्या नुसत्या अबोल सहवासामुळे सागरला जर इतका मोठा आनंद होत असेल. तर ती सागरच्या आयुष्यात आली तर तो आनंद कसा असेल. तो आनंद माझ्यासारख्या अभ्यासकाला पण शब्दांत व्यक्त करणे अशक्यच असेल. सागर मला नेहमीच विचारतो, बाबा मी सुलोचनावर जीवापाड प्रेम केले हो. परंतु तीने मला नकार का दिला असेल? सागरचे असे केविलवाणे बोलणे ऐकून माझेही डोळे भरून येतात. 
      
माझे सागरला फक्त एकच सांगणे असते. अरे 'प्रेम' हे ईश्वर भक्तीसारखे असते. भक्तीमुळे ईश्वर पण भेटतो. याचे अनेक उदाहरणं आपलेल्या माहीत आहे. तुझे 'प्रेम' ही ईश्वर भक्तीसारखे आहे. एकदिवस सुलोचना नक्कीच तुझ्या आयुष्यात परत येईल. त्यादिवशी तू विश्वातील सर्वात सुखी आणि आनंदी माणूस असेल. अशी माझी माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आणि परमेश्वर खुप दयाळू आहे. तो तुझ्या सुलोचनाला तुझ्या आयुष्यात नक्कीच पाठवेल. सागरचे पवित्र प्रेम बघून मला चार ओळी नेहमीच आठवतात. त्या अशा...

मन वळू नये, अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी
सामर्थ्यं संपू नये, अशी शक्ती हवी
कधी विसरु नये, अशी प्रीत हवी

Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव, ता. वैजापूर
९६६५६३६३०३.