व्यवसायाच्या यशासाठी व्यवस्थापन कौशल्य गरजेचे

खरे तर व्यवस्थापन हि बाब खूप महत्वाची असते. मॅनजमेंट हि एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे, आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

व्यवसायाच्या यशासाठी व्यवस्थापन  कौशल्य गरजेचे

टिकली, सेफटी पिनपासून ते अवघड वस्तुंच्या उत्पादनाच्या उद्योगांत व्यवस्थापन  (Management) हा भाग महत्वाचा असतो. अगदी पापड, लोणची वगैरे घरगुती खाद्य पदार्थ करतानाही बचत गटांच्या महिलांनाही व्यवस्थापन  (Management) करणे आवश्यक ठरते. वास्तविक निसर्गाने दिलेल्या साधन संपत्तीचे व्यवस्थित उपयोग करून वस्तू उत्पादित करण्याची कला म्हणजे व्यवस्थापन  होय.

अर्थात त्यासाठी बुद्धी, कौशल्य (Skill) , क्षमता, तंत्रज्ञान, उत्पादन साधनांचे एकत्रीकरण आणि कामगार व तंत्रज्ञ यांची गरज असते. या सर्वाचा मेळ घालण्याची कला म्हणजे व्यवस्थापन  (Management) होय. अथात माणसाकडून काम करवून घेण्याची कला अथात योग्य मोबदला देवून करवून घेणेही महत्वाचे ठरते.हेनरी फायोल यांनी व्यवस्थापन  (Management) व मॅनजमेंटची केलेली व्याख्या, 'मॅनजमेंट'  अंदाज घेणे  त्यानुसार  करणे, त्यानुसार साधनसामुग्री  जुळविणे त्यावर वर्चस्व ठेवणे. त्या साधन सामग्रीचा ताळमेळ घालणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे.

मॅनजमेंट म्हणजे लोकांकडून  घेण्याची काळ, अर्थात जागर गट व कामगार समूहाकडून काम करून घेण्याच्या कलेसाठी बुद्धिमत्ता निर्णयशक्ती , तंत्र व यंत्र वापरावे ज्ञान,  लावून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे इत्यादी बाबी आवश्यक आहेत. अर्थात उद्धिष्ट व ध्येय निश्चित असते. त्यानुसार मनुष्यबळ आणि इतर  साधनसामुगीध उपयोग करून घेणे होय.

खरे तर व्यवस्थापन  (Management) हि बाब खूप महत्वाची असते. मॅनजमेंट  हि एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे, आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

Management skill for business

मॅनजमेंट  हे एक सामूहिक काम आहे. ते एक टीम वर्क आहे. लोकांकडून काम करून घेणे हा यामध्ये एक महत्वाचा भाग असतो. हाताखालच्या सहकाऱ्यांकडून काम करवून घेण्यासाठी पहिली महत्वाची बाब म्हणजे सहकाऱ्यांचे नेतरत्व करणे, हाताखालील लोकांना दिशा ठेवणे देणे, दुसरे म्हणजे प्रभावी संभाषण करून लोकांना जोडून ठेवणे. याचाच भाग म्हणजे संभाषण कौशल्य (Skill) ाच्या आधारे हाताखाली काम करणाऱ्यांमध्ये समन्व्य साधण्याचे काम करणे होय. तिसरे म्हणजे आपले सहकारी , विभाग प्रमुख, कामगार चतुर्थ श्रेणीसह सर्व कर्मचारी यांना प्रेरणा देणे.

मोटिव्हेट करणे.. त्यांची इच्छाशक्ती, धारणा शक्ती वाढत ठेवणे इत्यादीबाबत व्यवस्थापन  (Management) वैशिट्याबाबत मोडतात,चौथी महत्वाची बाब म्हणजे मॅनजमेंट हि रिस्ल्ट ओरिएण्टेड हवी, याचाच अर्थ प्रपत्ती, उत्पन्न याचा विसर पडू ना देता त्याच उद्धिष्टाने व्यवस्थापकीय कौशल्य (Skill)  वापरले जाते. नफा हा भाग महत्वाचा आहे. उत्पन्न व  उत्पन्न प्राप्ती यावर जास्तीत जास्त भर द्याला हवा व त्याच दिशेने काम करून तेच उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत साध्य करण्यासाठीचे प्रयत्न केले जावेत हि पद्धती म्हणजे व्यवस्थापनाचे वैशिटय होय. केवळ भाषण देण्यापेक्षा व बोलण्यापेक्षा पर्यट्कष काम काय करतो यावर भर देणारी प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन  (Management) होय. मॅनजमेंटचा जणू   भाग म्हणजे हा सूर्य आणि हा  इथे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाला असा असतो.

मॅनजमेंट ची उद्दिष्टे निर्धारित केलेली असतात. ती प्राप्त करून घेण्याचे काय काम असते? तर रिझल्ट देण्यासाठी काय केले पाहिजे. तर एक म्हणजे साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग आणि दुसरे म्हणजे उच्च सक्षमीकरण व आपल्या बुद्धिमतेचा चांगल्यात चांगला उपयोग करून उत्तम उत्तम निकाल देणं होय. रिझल्ट म्हणजे निकाल आणि मॅनजमेंट अशी कि नफ्याची प्राप्ती जास्तीत जास्त मिळवून देणायच्या उद्दिष्टाने झपाटलेली असावी.

Buisness Success Management

मॅनजमेंट हि एक कला आहे. पण तेवढेच नाही तर ते एक शास्त्र आहे. मॅनजमेंट करताना केलेले किंवा अस्तित्वात असलेले संस्थेचे संघट्नेचे नियम कानून पाळावे लागतात. यामध्ये कामाची विभागणी अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल ठेवणे, तसेच अधिकाऱ्याला जेवढा मोठा अधिकार , तेवढाच मोठ्या प्रमाणात जबाबदार  .अंधकार छोटा व कमी दिला असेल तर जबाबदारीही छोटी असते. अंधकार  व जबाबदारी यांचा समतोल साधला जावा.

उदाहरण साधंसं एकत्र कुटूंबात सासूच्या हातात अधिकाराची सूत्रे व लगाम असतो. अशा वेळी पाहुण्यांसाठी खास बेत असो व समारंभाप्रसंगी प्रेझेंट देणं असो अथवा एखाद्या कौटूंबिक सहलीचा निर्णय असो याबद्दल जबाबदार धरलं जात सासूलाच सून फार तर आपले मत नोंदवू शकते पण अंतिम निर्णय सासूचा . तो अधिकार त्यांचा म्हणजे जबाबदारीसुद्धा अधिक त्यांच्यवरच आली. कौटूंबिक व्यवस्थापन  (Management) हि सुद्धा कला आहे आणि ते सुद्धा एक शास्त्र आहे. ज्यात तत्व आहे व तयाहून अधिक व्यवहारिक शहाणपण आहे व असायला हवे.

व्यवस्थापन  (Management)ात आदेश काढण्याची घाई व तो मागे घेणायचीही नामुष्की येणे टाळायला हवे. मॅनजमेंट यशस्वी करायची असेल तर   आदेशाची एकवाक्यता असणे अंत्यत महत्वाची आहे.एका निर्णयावर ठाम राहावे आणि निश्चित निर्णय घेवून त्याची निर्धाराने कार्यवाही करणे महत्वाचे ठरते. आदेश सारखे सारखे बदलेले तर आदेश पाळणाऱ्यांचा गोंधळ उडतो. कामात हलगर्जीपणा होऊ शकतो व मोठा अनर्थ सुद्धा घडवू शकतो. शिवाय यांच्या एकमुखी निर्णयातून तो जाहीर व्हावा व दिला जावा. तसे नसेल तर आडसहत एक वाक्यात राहत नाही. आदेश नेमका.

अचूक असावा, अस्ताव्स्त ,हळपघळ असल्यास त्याचे योग्य प्रकारे पालन होण्यात  व करण्यात अडचणी येतात व आदेशाची वाताहत लागते.मॅनजमेंट करण्यासाठी ओनरच असला पाहिजे असे नाही. मोठ मोठया कंपन्यांचे मालक वेगळे आणि मॅनजमेंट धुरा सांभाळणारे सीईओ व मुख्य कार्यकारी अधिकारी वेगळे असतात. म्हणजे तज्ञ, उच्चशिक्षित, अनुभवी, व्यक्ती ज्याच्याकडे प्रभावी संवाद कौशल्य (Skill) , सर्वागीण, ज्ञान, तंत्र, माहिती आणि निर्णयक्षमता असेल आशाची नेमणूक समिती सदस्यांच्या एकमताने, सेर्व्हीसहमतीने सीईओ व मॅनजमेंट अधीकारी नेमला जातो.

मॅनजमेंटला आधुनिक उद्योजकता, जागतिक बदलते प्रवाह तंत्रज्ञान व ग्राहकाच्या बाबतचे अंदाज वगैरे बाबतीत  जागरूकता पाळावी लागते. तीव्र स्पर्धा तर आहेच उद्योग जगतामध्ये शिवाय तेजी-मंदी आणि चढ उत्तर यास सामोरे जावे लागते. त्यामुळे मॅनजमेंट हि एक गतिशील प्रक्रिया आहे. क्रियाशीलता आणि नावीन्यपूर्णता असणे जरुरीचे आहे. नवीन कल्पना मांडणे त्या अमलात आणताना प्रॉफिट लॉसचा विचार करणे, प्रशिक्षण देवून सेवक वर्ग व कर्मचारी याना अपडेट ठेवणे, भांडवल अधिक असणे गरजेचे असल्यास त्यादृष्टीने तरतूद करणे, मार्केटिंग विभाग कार्यक्षम करणे वगैरे बाबींवर कटाक्ष ठेवून मॅनजमेंट गतिशील, क्रियाशील ठेवावी लागते.

व्यवस्थापन  (Management) हि एक सामूहिक जबाबदारी असते. म्हणजे वरिष्टापासून ते खालपर्यंत प्रशिक्षित सेवकवर्ग तंत्रज्ञ, कर्मचारी तज्ञ व्यक्ती यांची साखळी असावी लागते. तर उत्पादनांची क्षमता गती, गुणवत्ता, ग्राहकांचा संतोष वगैरे बाबी साध्य करता येतात. सहकारी असो व कोणत्याही विभागाचा प्रमुख असतो. प्रोजेक्ट ऑफिसर असो व प्रत्यक्ष विभागाचा इनचार्ज असो हि सर्व मंडळी प्रशिक्षित, योग्य ती अहर्ता असलेली असायला हवीत.

मॅनजमेंट सश्रम, यशस्वी व रिझल्ट ओरीनटेड होण्यासाठी आधुनिक तंत्र, संगणक प्रणाली, यंत्रसामुग्री आणि आजच्या फास्ट युगातील सर्व क्षेत्रांतील तंत्रसाधने याचा उपयोग करणे गरजेचे आहे. आता मानवी श्रमापेक्षा त्याच्या मदतीला यंत्रसामुग्री व तंत्र वापर करणे हे तर अत्यावश्यक आहे. म्हणून तीच श्रमशक्ती व मनुष्यबळ हवे.

मॅनजमेंट सर्वस्पर्षी आहे. ती बौद्धिक संकल्पनासुद्धा आहे. सर्व स्तरांवर व्यवस्थापन  (Management) करणे आवश्यक असते.  वस्तू व सेवा संस्था, संघटना, आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील टप्यावर मॅनजमेंट गरजेची व तितकीच महत्वपूर्ण बाब आहे.