मनुष्यजन्माचे सार्थक

मानवी देहाचा समाजासाठी काहीतरी उपयोग करून मनुष्यजन्माचे सार्थक करूयात आपल्याला शक्य होईल तसे इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करूयात

मनुष्यजन्माचे सार्थक

माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा एक आपल्या सर्वांना मिळालेला पिढी जात संस्कार आहे आपण किती भाग्यवान आहोत ना माणूस म्हणून जन्माला आलो या परमेश्वराने आपल्याला एक विशिष्ट भूमिका दिली आहे. ती म्हणजे एक परिपूर्ण माणूस होय, खर तर आजच्या  विश्वात असंख्य मनुष्यप्राणी की ज्यांना परिपूर्ण शरीर देखील नसत तरीही ही मंडळी जिद्दीने सातत्यपूर्ण संघर्ष करून आपला जीवन नावाचा प्रवास अखंडपणे सुरू ठेवतात कारण त्यानी आपलं नेमक आयुष्य समजून उमजून घेतल गेलेलं असते.

यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक स्वतःला ओळखायला हवं सुसंवाद करायला हवा अंतर्मनातुन स्वयशोध घेतला की सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी अचूक मिळतात खऱ्या अर्थाने आपला जीवन प्रवास सुखकारक आणि आत्मिक समाधानाने होत असतो नसण्यामध्ये असणं पाहण्याची मानसिकता झाली की, आपल्या जीवनाचा आनंद सोहळा होत असतो जे आहे त्याचा जाणीवपूर्वक विचार करून जे नाही त्याचा विचार मनातुन काढून टाकणे यालाच तर आपण समाधान संबोधत असतो.

आज प्रत्येकाला पद,पैसा,प्रतिष्ठा,भौतिकसुख या चारीही गोष्टीमध्ये जास्तीचा रस आहे हे सर्व क्षणिक सुख आहे प्रत्येकजण धावतोय पळतोय फक्त आणि फक्त स्वतःला मोठं करण्यासाठीची जणू काही स्पर्धा सुरू आहे अस कोणतं क्षेत्र नाहीं जिथे स्पर्धा नाही मित्रानो एक क्षेत्र आहे माणुसकीचं अजून तरी जास्तीचे स्पर्धक वाढले नाहीत कारण आज प्रत्येक जण मी माझं यातच गुंतून नव्हे तर त्याच विश्वात आहे म्हणून कुठेतरी स्वतःच आयुष्य जगताना इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न करूयात

माणूस म्हणून प्रत्येकाला समजून उमजून घेऊयात हिथे कोण लांबचा परका असा भेद नाही मुळीच हिथे प्रत्येकजण आपला  आहे  हीच भावना कारण भारतमाता ही एक  कुटूंबव्यवस्था आहे म्हणूनच सर्वजण एकाच कुटूंबातील आहोत मानवी देहाचा समाजासाठी काहीतरी उपयोग करून मनुष्यजन्माचे सार्थक करूयात आपल्याला शक्य होईल तसे इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करूयात कारण आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमच्या जगण्याचे मूळ कारण आहे साधं सरळ अपेक्षा उपेक्षा रहित उच्च विचार आचरण करून एक अर्थपूर्ण समृद्ध आयुष्य जगण्यासाठी  प्रयत्नशील राहुयात आयुष्य खूप सुंदर आहे ते भरभरून जगण्याचा इतरांना आनंदी ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहुयात.

atul-vishnu-gaikwad

अतुल विष्णू गायकवाड