अपेक्षा -उपेक्षा, सुख -दुःख, आशा-निराशा, प्रीती-द्वेष, विश्वास-घृणा, काम-क्रोध, लोभ-मोह, मत्सर-अहंकार इत्यादी. हे शब्द जसे मराठी भाषेत आहेत तशा जगातल्या प्रत्येक भाषेत आहेत, केवळ लिपी वेगळी आहे पण त्यामागील समजण्याचा भाव हा सारखाच आहे. भाषा हे केवळ व्यक्त होण्याचे माध्यम आहे शब्दांनी जी माळ तयार होत असते तिला भाषा म्हणतात. भाषेतले काही शब्द ही केवळ मानवी भाव दर्शवत असतात, कुठलाही भाव हा काळाच्या प्रवाहात आलेला एक अनुभव ठरत असतो...जो व्यक्ती परत्वे घडलेल्या घटनेच्या अर्थानुसार चांगला किंवा वाईट असू शकतो. मानवी भाव हा काळाप्रमाणे सतत बदलत असतो तर काही भाव हे चिरस्थायी असतात उदा.जसे आपले स्वतः चे नाव, शाळा, नाती, देश, राज्य घटनेतील उद्दिष्टे इत्यादी.
आपण काय बी पेरले यावरून त्याचं झाड -फळ निर्धारित होत असत,त्या प्रमाणे आपल्या मनात एक विचार(शब्द+स्थिती+परिस्थिती+पदार्थ+वस्तू+गोष्ट) यांना धरून आपला एक मतप्रवाह(वृत्ति) संस्काराच्या रूपाने आपल्यात विकसित होत जात असतात.
आपण एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विषय किंवा घटने संदर्भात दिलेली आपली प्रतिक्रिया जी सकारात्मक अथवा नकारात्मक ठरत असते,कोणतीही प्रवृत्ती ही आपल्या पूर्वानुभवामुळे निर्माण झालेल्या वृत्तिनुसार आपल्या कार्यात जगासमोर येत असते,आणि त्या नुसार जी कृती प्रत्यक्षात घडत राहते त्या कृतीची शृंखला म्हणजेच आपला स्वभाव,आपला आत्मा हा आरसा आहे आपण जे काही असतो(वृत्ति - प्रवृत्ती) ते आपण त्या आरशात जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला स्व-अनुभव येत असतो यालाच आत्म-साक्षात्कार म्हणतात,आरसा स्थिर असेल आणि त्यावर धूळ(मनाचे विकार)नसेल तरच तो अनुभव येऊ शकतो.
समाजातील प्रत्येक घटकाच्या स्वभावातून एक समाज मन,एक संस्कृती जन्म घेते अथवा निर्माण होत असते.
जेव्हा ही संस्कृती मूळ मानवी प्रकृतीला(निसर्गाच्या नियमा अनुरूप) असते तेव्हा ती संस्कृती ही मानवी जीवनाला पोषक ठरत असते,जेव्हा ती संस्कृती(मनुवादी) निसर्ग नियमास बाधक असते तेव्हा खरे तर ती संस्कृती नसून ती विकृती असते. संस्कृती मध्ये प्रेमाचा आधार प्रेम असतो विकृती मध्ये प्रेम हे बळ आणि शक्ती द्वारे प्राप्त करण्याचा एक विकृत पूर्ण प्रयत्न असतो उदा. बलात्कार, चोरी यालाच अनिती, अन्याय म्हटले गेले आहे. संस्कृती ही सत्याची पोषक असावी तेव्हाच ती संस्कृती ठरते आणि जीवनाला अर्थ मिळतो.
मानवी समाजाला विषमतेच्या खाईत लोटणारी विसंगत प्रवृत्ती, विकृती जी मनुस्मृती (भाकड कथा) मुळे जन्मली होती ही विसंगती समाजात जन्म घेऊ नये यासाठी संविधानातील उदिष्टे,
मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना शाळेतून शिकविणे गरजेचे आहे.
भविष्यात शाळेत प्रवेश घेताना.....
जात - मनुष्य,
धर्म - भारतीय.
असा कॉलम दिसेल तेव्हा खरे राष्ट्रप्रेम,बंधुता.....
।।जय छत्रपती शिवराय जय हिंद जय भारत।।
लेखक -श्री.गजानन कासार
मो.७६६६६३१२५१.
व्हॉट्सअँप:९०७५३३३४७७.