पूर्वग्रह व दृष्टिकोन

कला ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते ,असे आपण ऐकत आलो. त्याचप्रमाणे व्यक्ती कशी आहे हे आता शक्यतो समोरच्याच्या दृष्टिकोनावरच असते

पूर्वग्रह व दृष्टिकोन

कला ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते ,असे आपण ऐकत आलो. त्याचप्रमाणे व्यक्ती कशी आहे हे आता शक्यतो समोरच्याच्या दृष्टिकोनावरच असते .असे जाणवायला लागले आहे. समोरची व्यक्ती आपल्याला कोणत्या नजरेतून बघते यावर ते अवलंबून असते म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार आपण वागत आलो की आपण चांगले बोलतो. व तेच वागणे आपण आपल्या नुसार वागलो तर लगेच समोरच्या नजरेतून आपण उतरतो. कोणाला त्याच्यापेक्षा  वरचढ झालेले चालत नाही. दोन विचार त्याच्यापेक्षा जास्त मांडले की लगेच दीड शहाणे होतो  समोरच्याच्या हो.. शी .. हो . . केले म्हणजे (नंदीबैलासारखे गुबू गुबू केले तर) तर आपण चांगले. आणि त्याच्या म्हणण्यानुसार जर वागलो नाही तर( मारकुंडा बैल) अशी स्थिती बनते. माणसाची माणुसकी आता त्याच्या कार्यावर नाही तर समोरच्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून झालेली आहे. कोणी कितीही चांगले वागले याचा फायदा आता या काळात नाही. त्या चांगले पणाचा चांगुलपणा हा समोरच्याच्या नजरेत बसला आहे. स्वतःच्या गरजेनुसार व्यक्तीचा स्वभाव ठरवत आहोत ही परिस्थिती आत्ताची आहे.


आणखी एक समस्या म्हणजे दुसऱ्या बद्दल पूर्वग्रह निर्माण करणे होय. एखादी व्यक्ती दुसरा बद्दल विचार करत नसेल तरी ती व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह निर्माण करत असते. उदा - निशा आणि रमा यांच्या छोट्याशा कारणावरून वाद झाला. लगेच रमा विचार करायला लागते, निशा नक्कीच मला शिव्या देत असणार, मला शहाणी समजत असणार, तिच्या नजरेतून मी नक्कीच उतरणार ,किंवा मी फोन केला नाही तर ती काय म्हणेल .अशा प्रकारे असंख्य पूर्वग्रह ती स्वतःच्या मनात तयार करते. वास्तविक निशा इकडे कामात व्यस्त असेल पण रमा तिच्याबद्दल असे पूर्वग्रह मनात तयार करते.
अशा या पूर्वग्रहामुळे मनाची स्थिती खराब होते. अस्तित्वात नसलेल्या विचारावर विचार करत बसतो आणि त्या विचारानुसार त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवत असतो. अशाप्रकारे काही जण कोणा ना कोणाबद्दल पूर्वग्रह तयार करतात व पूर्वग्रहाद्वारेच ती व्यक्ती कशी आहे हे स्वतःच ठरवतात. म्हणूनच विचार येतो या पूर्वग्रहावर व दृष्टिकोनावर काय उपाय असावा...?

Smita Sambhaji Raut

सौ. स्मिता संभाजी राऊत
शिवना, सिल्लोड.