संघर्ष भाकरीचा

संघर्ष किती मोठा असला तरी तो भाकरीचा नसावा देवाकडे हात जोडून प्रार्थना कोणाचं पोट उपाशी राहू नये कारण पोट खूप काही शिकवत असतं पण पोटाचा संघर्ष भयानक असतो

संघर्ष भाकरीचा

चार भावंडे, दोन बहिणी, आई वडील असे कुटुंब खायचं तोंड मोठ आणि काम करणारे कुणीच नाही परिस्थितीचा कानोसा जर घेतला तर अंग थरारून जाईल."सुखके सब साथी दुख मे ना कोई"म्हणतात ना त्याप्रमाणे माणसाचे जनजीवन असते एवढे मात्र खरे. त्यात कुटुंबप्रमुख कोसळलेला; कारण उद्योगधंद्यामध्ये घाटा झाला. आणि पाटीदारी दगा मिळाला मग काय? विचार करायला वेळ नाही काम करायला साधन नाही अशी परिस्थिती उभी झाली काळाचा घाला झाल्यावर खूप कमी लोक आहे स्वतःला सावरून खंबीरपणे उभे राहून परिस्थितीशी दोन हात करतात. मात्र काही जण मोडून पडतात आणि व्यसनाच्या आधीन जातात अगदी असाच प्रसंग ओढवलेलं एक कुटुंब मी पाहिलं.

मोठा मुलगा तेरा वर्षाचा बाकी त्याच्या खालचे. लाडात वाढलेला कारण साखर गोळ्या बनवणाऱ्या कारखानदाराचा मुलगा. कोण जाणे त्या मालाचे गोळ्या बनवत असताना विष तयार झाले वीज कोसळल्यासारखे ते मालक कोसळून पडले कारण अमापन नुकसान झाले होते. तो पाक काही कामासाठी घेऊन जाणार म्हणून स्टोअर करून ठेवला. खेळत खेळत गेली आणि मालकाच्या मुलाने पाक चाटून पाहिला. त्याला विषबाधा झाली तो मुलगा बघता बघता तडफडू लागला मुलाने प्राण सोडले. पालक हतबल झाले होते रागाच्या भरात त्यांनी त्या पाकाच्या टाक्या लाथा मारून सांडून दिल्या आणि मग काय सगळ्या गावाला लोंडा गेला कुत्रे, मांजर फिरणाऱ्या गाईने पाक चाटला गाय तडफडू लागली गावातील लोक जमा झाले मग काय चर्चेला विषय झाला आणि कुठला शाप काय माहित त्या कुटुंबाचा खरतड प्रवास संपता संपेल गावातील लोकांनी पोलीस बोलावले पोलिसांच्या ताब्यात कारखाना मालकाला दिल ते लहान पोर सार काही डोळ्यांनी पहात होतं. काय करावं कळत नव्हतं डोळ्यात अश्रू आणि पोटात आग सुरू झाली होती. भयानक परिस्थितीत हे कुटुंब आभाळाखाली एकट उभं होतं हात देणारे कोणी नव्हते. सगळं गमावलेल्या माणसाला सहानुभूती मिळत असते मदत मिळणं कठीण असतं हे मात्र तितकच खरं त्या लेकरावर संकट कोसळलं लोकांच्या गर्दीत एकट पडलं वडिलांना सोडवणे, सगळ्यांना सांभाळणे चित्र भयानक होतो त्यात बहिणीला चक्कर आली आणि शेजारी लोकांनी तोंडावर दार बंद केलं खडतर प्रवासाची सुरुवात झाली जग काय आणि जगणं किती अवघड हे समजलं.

दुसऱ्या दिवशी शाळेत न जाता कामाचा शोध सुरू झाला. तळ्याचे खोदकाम सुरू होते त्या ठिकाणी जाऊन तो मुलगा काम मागू लागला या एवढ्याशा जीवाला काय काम द्यायचा हा प्रश्न त्या मुकदमला पडला पण डोळ्यातील अश्रू, थकलेला चेहरा, आशेच्या पोटी केविलवाणी ते पोर मुकदमाच्या नजरेत भरले. सुकडी वाटण्याचे काम त्याला मिळाले सुकडी वाटून झाली आणि काजू बदाम खाणार ते पोर उरलेली सुकडी घेऊन घराकडे पळू लागले. सुकडी आई आणि बहिणीला देऊन तीन भावंडासाठी हॉटेलवर आलं आणि काही न बोलता काम करू लागलं मालक रागावू लागला मी पैसे देणार नाही माझ्याकडे कामाला माणसे आहेत त्यावर ते बाळ बोललं मालक काही नाही यांना फक्त उरलेलं खायला द्या मी तुमचे ऋण कधीच विसरणार नाही.

संघर्ष किती मोठा असला तरी तो भाकरीचा नसावा देवाकडे हात जोडून प्रार्थना कोणाचं पोट उपाशी राहू नये कारण पोट खूप काही शिकवत असतं पण पोटाचा संघर्ष भयानक असतो हे मात्र तितकच खरं पाच वर्ष त्या पोराचा संघर्ष सतत सुरू होता हे सारं करत बाई तर कधी सायकलवर जाऊन शिक्षण पूर्ण करत आर्मी भरती चा ट्रेनिंग घ्यायची मनाशी गाठ बांधून तो मुलगा हिऱ्यासारखा रोज नव्याने सगळ्यांच्या समोर चमकत होता कौतुकाची थाप पाटीवर पडत होती पण त्यानं मात्र पोट भरत नव्हतं त्यासाठी संघर्ष हा करावा लागतो कारण पोटासाठी भाकर महत्त्वाची असते भाकरीसाठी संघर्ष करावा लागतो.

Jyoti Sanjay Shinde

सौ. ज्योती संजय शिंदे
ता. चाकूर. जि. लातूर