मुलगा मुलगी विकणे आहे

लग्न आजचा व्यवहार झाला आहे. त्यात चिरडले जात आहेत अनेक परिवार मान सन्मानाच्या नावाखाली खोट्या प्रतिष्ठेसाठी.

मुलगा मुलगी विकणे आहे

किती गमतीशीर व्यवहार चालू आहे. हा व्यवहार समाजमान्य असतो. त्यात मानही आणि कळत असूनही पचवावा लागणारा अपमान तो फक्त वर वधूच्या वडिलांना त्याच्या खानदानाचा मुळात मान आणि अपमान या संकल्पनेने आपुलकी कुठे दडून बसली आहे. तिचा पत्ता शोधणं ही लांबच त्यास कारण म्हणजे तुमचा आमचा समाज. मुळात समाज ही एक व्यवस्था आहे. आपणच आपल्यासाठी आखून ठेवलेली, पण त्या व्यवस्थेचा गैरवापर होतो आहे. व्यवस्थेची अवस्था झाली आहे. आपल्याच काही लोकांच्या विचारसरणीमुळे त्यात मुख्य म्हणजे लोक काय म्हणतील? 

मुला-मुलीचे लग्न करायचं तर मोठं करावं लागतं. आमच्यात असे म्हणतात मुलगा सुशिक्षित नोकरीवाला असेल तर तो विकला जातो, आणि तसं नसेल तर मुलगी विकत घेतली जाते. समाजात हा शब्द वापरणे गुन्हा आहे. म्हणून काही लोक त्याला घरात पैसे देणे म्हणतात. जर मुलगी विकत घ्यायची तर तुम्ही काही करू नका, आम्ही सर्व करून घेतो सर्व म्हणजे काय करता आत्तापर्यंत मुलीच्या वडिलांनी तिला जपलेलं असतं, तिचा सांभाळ केलेला असतो. आणि लग्नाच्या वेळेला मुलाकडचे म्हणतात, आम्ही सगळं करून घेतो त्या मुलीचे वडील ही खुश होतात, काही गरज नाही ते सगळं करून घेणार आहेत. यात मुलीचा बळी पडतो, चांगलं असेल तरी काही अंशी मुळीच नाही. कारण मुलगी बापाला जड नसते, तो तिला लग्न झाल्यावर ही सांभाळतो त्यामध्ये काही झालं तर आम्ही बघतो तुम्हाला काय करायचं ते सगळं करून घेतो, यावरून आपण काय अर्थ लावायचा? आई वडील मुलीचे लग्न करू शकत नाही की समाजाच्या अवस्थेमुळे स्वतःला लाचार समजता?

या उलट मुलाकडचे मुलगा जर शिकलेला असेल तेव्हा मुलगा शिकलाय, नोकरीला आहे. अमुक अमुक एवढा हुंडा द्यावा लागेल तर लग्न करू समाजात आम्हाला मान आहे असाच सर्रास व्यवहार चालू आहे समाजात मुला मुलींचा. या व्यवहाराला लग्न म्हणतात, फरक फक्त शब्दात बदलला. हीच समाजाची आजची अवस्था आहे, लग्न आजचा व्यवहार झाला आहे. त्यात चिरडले जात आहेत अनेक परिवार मान सन्मानाच्या नावाखाली खोट्या प्रतिष्ठेसाठी.

dr vaishanvi mangate          

डॉ. वैष्णवी गणेश मनगटे, कन्नड