शिक्षण आणि जीवनाची अपरिहार्यता - श्री.गजानन कासार

हा लेख प्रामुख्याने त्यांच्या साठी आहे जे पहिला नंबर आला नाही किंवा नापास झाले म्हणून आत्महत्या करतात, भय हेच अपयशाचे कारण असत त्यामुळे भय कसे संपवता येईल याबद्दल शाळेमध्ये मी कार्यशाळा घेत असतो. 

शिक्षण आणि जीवनाची अपरिहार्यता - श्री.गजानन कासार

प्रश्न कुठलाही असो त्याचं प्रयोजन एकच असत ते हे पाहणं की तुम्ही एखाद्या परिस्थितीत कसे सकारात्मक उपाय सुचवत असता आणि ते  कमी शब्दा मध्ये तुमच्या उत्तरातून अधिक चांगल्या प्रकारे कसे स्पष्ट करताय,तसेच जेव्हा तांत्रिक विषय असतो तेव्हा त्या बाबतीत तुमच्या कृतीतून (Skill Test) द्वारे ते किती चांगल्या प्रकारे सिद्ध करताय...या गोष्टीचं मूल्यमापन म्हणजेच स्वतः शी असलेली स्पर्धा आणि त्या कामातून समाजाला असलेल्या गरजेचे समाधान शोधणे व देणे हीच खरी परीक्षा.

आज आपल्या देशात परीक्षा ही व्यवहारिक कमी आणि स्पर्धात्मक,वर्णनात्मक, विश्लेषणात्मकच जास्त आहे, जे केवळ ज्ञान देते पण त्याचा वापर कसा करायचा हे शिकवत नाही. 
उदा. "गाय कशी दिसते ह्याचा अभ्यास जेवढा महत्वाचा तसे तीच संगोपन कसं करावं..... तीच दूध कसं काढावं.....अन्य बाबी" हे पण तितकच महत्वाचं यामुळे व्यवहारिक/ प्रात्यक्षिक बाबींना चालना मिळेल आणि product devlopment technique विकसित होतील.

आज आपला अभ्यासक्रमही प्रात्यक्षिक मुद्यावर आधारलेला नाही त्यामुळे पारंपरिक १० वी १२ वी शिक्षण घेऊन कुठलेही प्रात्यक्षिक काम व्यक्ती हातात घेऊ शकत नाहीत मग पर्याय उरतो तो कारकुनी काम अथवा मजुरी,त्यात वाईट असं काही नाही पण जास्त हाथ जर तेच काम करणारे निर्माण होतील तर उद्या तांत्रिक विकासामुळे भविष्यात यंत्र त्यांचे काम हिरावून घेऊ शकतात आणि पारंपरिक शिक्षण व्यवस्था येणाऱ्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी कुचकामी ठरेल.

अन्य देशा मध्ये skill development related  प्रात्यक्षिक कार्यातून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते,त्यामुळे वयाची १८ वर्ष पूर्ण होताच त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण प्रात्यक्षिक असतो.  कलेला मरण नसत कला जीवनाचा अविभाज्य घटक आहे पण कलेचा अर्थ हा केवळ रंगमंचावर च सिद्ध करण्या पुरत कला क्षेत्र मर्यादित नाही हे Sir J.J.School of Art अशा जागतिक दर्जाचा शिक्षण  संस्था नी दाखवून दिले आहे अशा संस्था ची गरज आज आपल्या देशात प्रामुख्याने जाणवत आहे. विकसित देशात सामाजिक समस्या कमी असतील पण जेव्हा प्रगती आणि आव्हाने यासाठी काही पावले उचलावी लागत असतात तेव्हा त्या देशातील प्रश्न ही त्या अनुषंगानेच विचारले जात असतात.

परीक्षेत पहिला नंबर आला की नाही?
हे गौण असत शेवटी तुमचा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास हा महत्वाचा ठरत असतो,कारण तो दृष्टिकोन आणि विश्वास घेऊनच तुम्ही जीवन जगत आलेला असतात आणि त्या पद्धतीनेच तुम्ही आलेल्या समस्येला तोंड देत असतात तेव्हा यश -अपयश हे तुमच्या समस्या सोडविण्याच्या मार्गातील अपरिहार्य दुवे आहेत हे समजावं. तुम्ही  जगाचा सखोल अभ्यास जरी केला असेल आणि स्वतः चा जर अभ्यास केला नसेल तर तुमचा दृष्टिकोन कदापि बदलणार नाही,तोच दृष्टिकोन जो  जगाने(अवती भोवती च्या परिस्थितीमुळे,कौटुंबिक पार्श्वभूमी तसेच पूर्वाग्रह यांच्या मुळे तुम्हाला मिळाला तो दृष्टिकोन घेऊन त्यानुसार तुमच्या आयुष्याचा आराखडा तुम्ही तयार केलेला असतो)

जर अनपेक्षित घटना वा परीस्थिती अशा पूर्वानुभवा मुळे कोणत्याही कार्यात आत्मसंशय(भीती)घेऊन तुम्ही जीवन जगत असाल तर  तुमचा भविष्यकाळ सदैव तुमच्या भूतकाळा मुळे प्रभावित होत असतो,शैक्षणिक अभ्यासक्रमात आत्मविश्वास हा विषय नसतो तो जीवन जगत असताना अनुभवातूनच मिळत असतो. उदा. सायकल चालवताना सायकल कशी चालते हा अभ्यास महत्त्वाचा नसतो तर त्याचं बॅलन्स कसं ठेवायचं हा अनुभवाचा भाग असतो. तुम्ही योग्य वयात तुमच्या आवडीचा विषय काय हे जर नीट समजून घेतले तर तुम्ही तो विषय समजून घ्यायला आणि त्यावर काम करायला तुम्हाला अधिक सोपे होईल. आणि त्या क्षेत्रात तुम्ही उत्कृष्ट   कामगिरी निभावू शकाल.

एखाद्या वस्तू स्थिती बदल च पूर्ण ज्ञान आपल्यात आत्मविश्वास निर्माण करत आणि अपुरे ज्ञान आत्मसंशय(भीती) निर्माण  करत,त्यामुळे कुठलाही विषय पूर्ण समजून घ्या अन्यथा त्या गोष्टीच्या मागे लागून वेळ वाया घालवू नका.

हा लेख प्रामुख्याने त्यांच्या साठी आहे जे पहिला नंबर आला नाही किंवा नापास झाले म्हणून आत्महत्या करतात, भय हेच अपयशाचे कारण असत त्यामुळे भय कसे संपवता येईल याबद्दल शाळेमध्ये मी कार्यशाळा घेत असतो. 

जेव्हा यश मिळत आणि एखाद्या आवडीच्या क्षेत्रात अधिकारी बनत असता अथवा अन्य क्षेत्रात त्याबद्दल अभिमान असावा पण अहंकार कदापि नसावा, विद्या विनयेन शोभते|| 

बऱ्याच वेळेस नावडीचे क्षेत्र काम करायला भेटले म्हणून काही लोक उगाच त्रास करून घेत असतात हे कितपत योग्य आहे?कारण काही वेळा परिस्थिती किंवा इतर लोकांचे सल्ले घेऊन आपण एखादे क्षेत्र निवडलेले असते त्यात स्वतः ची आवड आपण बाजूला ठेऊन पुढची दिशा निर्धारित केलेली असते तेव्हा त्या नावडीच्या  क्षेत्रात जे काही आहे त्यात अधिक मी काय चांगल करू शकतो हा विचारच प्रासंगिक ठरत असतो कारण आयुष्याला Replay नसतो हे लक्ष्यात ठेवाव. 

व्यावसायिक जीवनात तुमच्या कल्पनेच मॉडेल तुम्ही जगासमोर मांडायला हवं त्यात पारंपरिक शिक्षणापेक्षा ही your skill (तुमचे कौशल्य) त्यात तुमचा Role ठरवत असतो तुम्हाला योग्य तो प्रतिसाद जगाकडून मिळतोच जर ते जगाच्या फायद्याचे असेल तर उदा. Ola,uber,Amazon, flipkart यांचं नेटवर्क हे उपयोगीतेच्या सिद्धांतावर च उभे आहे यात सुरवातीला काहीही आर्थिक भांडवल नव्हते,होती ती केवळ एक भन्नाट कल्पना म्हणजेच भावनिक भांडवल...."आवश्यकता आविष्कार की जननी है"

प्रत्येक जीव हा जन्मतः श्रेष्ठ च असतो परिस्थिती पुढे हतबल होऊन काही जण स्वतः ची स्वप्न पूर्ण करू शकत नसतात पण त्यात दुःख मानावयाचे काहीच कारण नाही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी हाताला काम मिळणं आणि ते मिळालेले काम किती सचोटी आणि प्रामाणिकपणा ठेऊन आपण पूर्ण करत असतो हे शेवटी महत्वाचं ठरत.
प्रत्येक कामाचा मोबदला हा तुम्ही पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून चहा घेऊ शकाल एवढा बहुधा असेल/ नसेल काही अपवाद वगळता (कारण काही ठिकाणी कामाचा मोबदला योग्य मिळत असतो तर काही ठिकाणी मिळत नसतो, कर्मचारी वर्गावर बऱ्याच ठिकाणी भांडवलदार आणि व्यवस्थापन यांनी केलेला अन्याय हा कायद्याच्या कक्षेत जेव्हा येतो तेव्हा तो शोषण ठरत असतो आणि हा प्रश्न समाजात कित्येक ठिकाणी पाहायला मिळतो,पण त्यावर सहसा कुणी बोलत नाही, शेवटी कायदा हाच न्याय मिळवून देऊ शकतो.) 

संतांनी सगितल्या प्रमाणे जीवनात समाधान हाच उपाय आहे पण वरील अपवादात्मक अन्याय परिस्थिती वगळता अन्यायचा प्रतिकार केलाच पाहिजे,हक्काचा मोबदला मिळवायलाच हवा.

आधुनिकतेच्या नावाखाली कुणीही पंचतारांकित (culture) हॉटेल मधील चहामुळे घरच्या चहाची किंमत कमी समजू नये,शेवटी दूध हे गाईचे किंवा म्हैशीचेच असनार...... पण या समाधानी वृत्ति मुळे तुम्ही महत्वाकांक्षी असू नये असे कदापि नाही यशाची शिखर गाठा पण जमिनीवर पाय ठेऊन,म्हणजेच तुमच्या महत्वाकांक्षा तुम्ही काय किंमत मोजून पूर्ण करत असता हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तितकेच महत्वाचे असते. आई च आई पण कधी असत जेव्हा ती बाळा ला जन्म देते त्याचं संगोपन ती स्वतः करते तेव्हा किंवा एखाद्या अनाथा लयातून मूल दत्तक घेऊन त्याचं संगोपन केलं जात तेव्हा,वडील हे वडील केव्हा ठरतात ते तेव्हाच जेव्हा कौटुंबिक पार्श्वभूमी हलाखीची असेल किंवा नसेल पण ह्या दोन्ही परिस्थितीत ते कुटुंबाचं यथा योग्य पालन पोषण करतात,कर्तव्य म्हणजे काय तर ती तुमची करिअर नाते,मित्र,समाज या संबंधी असलेली commitment असते,तुम्ही ती निवड केलेली असते जी तुमच्या आवडीच्या पलीकडे असते,"you have to adjust in every situation with everyone concerning to you & give what you can & what you have.... without expecting anything from anyone that's your commitment".

"विद्यार्थी ध्येयवेडेपणा,पालकांची स्वप्न  आणि अभ्यासक्रम व परीक्षा यामधील कल्पना आणि वास्तव"यावर प्रकाश टाकणारा हा लेख माझे पुस्तक.....
"बल आणि आशा हेच जीवन निराशा आणि दुर्बलता हाच मृत्यू" यामधून  आहे.

लेखक -श्री.गजानन कासार
मो.७६६६६३१२५१.
व्हॉट्सअँप:९०७५३३३४७७.