ज्ञान व प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे गुरू

बाबा एक शिक्षक नसूनदेखील युवकांना प्रेरणा देऊन आपल्या कलेच्या जोरावर उंच आकाशात झेप घेण्यासाठी प्रवृत्त करत असतात. खरं तर काहीजण पगार मिळत आहे. या अनुषंगाने काम/नोकरी करत असतात. पण आपला काही फायदा नसतांना इतरांचा फायदा कसा होईल या दृष्टीने ते प्रयत्न

ज्ञान व प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे गुरू

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रति आदर, सन्मान प्रकट करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक होते. ज्याप्रमाणे म्हणटले जाते गुरु हे आयुष्यरुपी पतंगाची दोरी असतात ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचा पतंग उंच आकाशात जातो. आईनंतर संस्कारांची शिदोरी ही मुलांना शिक्षकांकडून मिळत असते त्याच्याच बळावर आयुष्यातील अंधकार दूर सारून तेजस्वी सूर्याप्रमाणे चमकण्याची संधी मिळत असते. देशाचे भवितव्य हे शिक्षकांच्या हातात असते त्यांच्या हातून भविष्यातील डॉक्टर, शास्त्रज्ञ, शिक्षक, इंजिनियर यांसारखे विद्यार्थी घडत असतात. शिक्षक आपल्या हातून कुभांरासारखे मातीच्या गोळ्याला आकार देऊन नवसमाज निर्माण करतात. ज्ञानरूपी अमृत पाजून संकटाचा भवसागर पार करण्यासाठी शक्तिशाली बनवतात. आपण नेहमी बघतो डॉक्टर आपल्यासारखा डॉक्टर घडवू शकत नाही, इंजिनियर देखील इंजिनियर घडवू शकत नाही, पण एका शिक्षकात ती ताकद आहे. तो आपल्यासारखाच नाही तर एक आदर्श शिक्षक बनवू शकतो. पण हे देखील खरे असले तरी पण मी माझ्या आयुष्यात अशा व्यक्तीला पाहिले आहे जे शिक्षक नसून देखील एक शिक्षक असल्याची भूमिका पार पाडत असतात ते नेहमीच नवयुवकांना प्रेरणा देऊन स्वता:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मदत करत असतात. ज्या व्यक्तीजवळ पैसा असतो ती व्यक्ती श्रीमंत असते असे नाही कारण जेव्हा बाबांना ज्यावेळी मी भेटले तेव्हा मनाची श्रीमंती किती मोठी असते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. मी आज पर्यंत अनेक लोकांना भेटले त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यातून असे लक्षात आले की प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी स्वार्थ असतो त्यामुळे तो समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असतो पण बाबा कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता इतरांना मोठे करण्याचे स्वप्न पाहत असतात. एक शिक्षक नसूनही आपल्यासारखे असंख्य व्यक्ती घडवावे त्यासाठी ते अविरतपणे न थकता प्रयत्न करत असतात. खरंतर ही व्यक्ती खूप श्रीमंत किंवा शहरी भागात राहणारी नाही. तर ते अत्यंत छोट्या व शेतकरी कुटुंबातील आहे. सामान्य, साधारण राहणीमान मात्र उच्च विचारसरणी असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. संस्कार काय असतात हे शेतकरी कुटुंबात जन्म घेणाऱ्या मुलांना सांगायची गरज पडत नाही. त्यांना मातीशी असलेली नाळ मातीला विसरू देत नाही. हे अनेकजण म्हणतात पण मी अनेकजण असेही पाहिले आहेत की, मोठ-मोठ्या लोकांसोबत राहत असताना माणसात अहंकार नावाचे वायरस जन्म घेते पण मी नेहमीच म्हणत असते याला बाबा अपवाद आहेत कारण मोठ्या लोकांमध्ये राहून ते नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणारे तसेच, स्त्री सन्मान करणारे व्यक्तिमत्त्व आहे. 

ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने

बाबा एक शिक्षक नसूनदेखील युवकांना प्रेरणा देऊन आपल्या कलेच्या जोरावर उंच आकाशात झेप घेण्यासाठी प्रवृत्त करत असतात. खरं तर काहीजण पगार मिळत आहे. या अनुषंगाने काम/नोकरी करत असतात. पण आपला काही फायदा नसतांना इतरांचा फायदा कसा होईल या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात ते अगदी निस्वार्थ        वृत्तीने काम करत आहे. राग, द्वेष हे शब्द तर त्यांच्या शब्दकोशात नाहीच असेच म्हणावे लागेल आणि ते म्हणतात देखील मी माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत वीस ते पंचवीस असे माणसे घडवील कि त्यांचा पूर्ण देशाला हेवा वाटेल आपल्या देशाप्रती, समाजाप्रती काही कर्तव्य असतात हा ते इतरांना देखील आपल्या कार्यातून संदेश देतात यात तिळमात्र शंका नाही. 
          
खरोखर एका निस्वार्थी वृत्तीने लोकांसाठी प्रयत्न करणारी मी माझ्या आयुष्यात एकमेव व्यक्ती पाहिली. ज्ञान व प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे गुरु म्हणता येईल. एक शिक्षक नसून देखील एका शिक्षकाचे सर्व रूप ज्यांच्यात सामावलेले आहेत ते म्हणजे बाबा चन्ने सर नेहमी काहीही मदत लागली तर निसंकोचपणे सांगा असे मोठे मनाचे प्रतिभासंपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ते आहेत आपल्या ज्ञानाच्या बळावर अनेकांना न्याय मिळवून देऊन त्यांनी अनेकांना माणसातील देवाचे दर्शन घडवून दिले आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल चांगले उद्गार सहसा निघत नाही पण बाबांवर अनेकांनी लिखाण केलेले आहे मग या व्यक्तीला साधारण कसे म्हणता येईल अनेकांनी त्यांच्यासाठी आपल्या लिखाणातून देव माणूस असा उद्गार देखील काढलेला आहे. आज पर्यंत आपल्या यशामध्ये ज्यांचा वाटा असतो ज्यांच्या सहकार्यामुळे व ते आपल्यामध्ये रुजवत असलेल्या ज्ञानामुळे आपण प्रगतीची वाट धरत असतो म्हणजेच साधारण व्यक्तीला मौल्यवान बनवणारे हे शिक्षक असतात. म्हणूनच ०५ सप्टेबरला सर्व शाळेत तसेच कॉलेजमध्ये दरवर्षी शिक्षकांची भूमिका घेऊन शिक्षक दिन साजरा केला जातो. बाबा नेहमीच एका शिक्षकाच्या भूमिकेत असतात. याचा अनेकांना अनूभव देखील आलेला आहे. ते रोजच आपल्या कार्यातून सिद्ध देखील करत असतात. 

कावेरी आबासाहेब गायके,
भिवगाव, ता. वैजापूर,
औरंगाबाद
(लेखिका प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने यांची मानसकन्या आहे.)