जग खरंच सुंदर आहे

सकारात्मक विचारांची लोकांची साथ मिळाली की खरोखरच जग खूप सुंदर भासायला लागते म्हणूनच सांगावेसे वाटते की जगाला जर सुंदर पाहायचं असेल तर सर्वप्रथम आपण आपला दृष्टीकोन सुंदर बनवला पाहिजे.

जग खरंच सुंदर आहे

तुमच्याकडे जगाला पाहण्याचा 
एक सुंदर दृष्टीकोन असेल तरच 
तुम्ही जगातली सुंदरतेचा शोध
 घेऊन जगण्याचा आनंद घेऊ शकाल

आज पासून कित्येक वर्षापूर्वी न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. कोणतीही वस्तू हवेत फेकली की, ती हवेत तरंगत न राहता जमिनीवर येते याचे कारण म्हणजे जमिनीमध्ये असलेले गुरुत्वआकर्षण शक्ती. सगळ्यांना सहज आणि सोप्या भाषेत समजणारी गुरुत्वाकर्षणाची ही सुंदर व्याख्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गुरुत्वाकर्षणाच्या या व्याख्येवरून हे सिद्ध होते की, पृथ्वी मध्ये प्रचंड प्रमाणात गुरुत्वाकर्षण आहे. याचा अर्थ आपल्या वेदाचार्यांनी वेद मध्ये सांगितलेल्या प्रमाणे आपले शरीर देखील पंचतत्त्वांनी बनलेला आहे. पृथ्वी,जल, अग्नी,वायु आणि प्रकाश यामध्ये या पंचमहा तत्त्वांपैकी पृथ्वी हेदेखील एक विषेश तत्व आपल्या शरीरामध्ये असल्याचे वेदातील वर्णन आपल्याला पहायला मिळते याचा अर्थ न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे आपल्या शरीरात देखील एक विशिष्ट गुरुत्वाकर्षणाची शक्ती असल्याचे सिद्ध होते. हो आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये एक विशिष्ट अशी शक्ती असते ती म्हणजे ज्याप्रमाणे एखादी वस्तू पृथ्वीवरून आपण आकाशाकडे फेकतो तीच वस्तू तेवढ्याच वेगाने पृथ्वीकडे परत आकर्षिली जाते.

अगदी त्याचप्रमाणे आपण जर एखादा नकारात्मक विचार आपल्या मनात आणला आणि त्या पद्धतीने जगाकडे पाहायला लागलो तर संपूर्ण जगाकडून आपल्याकडे नकारात्मक विचारांचीच लोके आकर्षित होतात आणि आपला पूर्ण सर्कल हा नकारात्मक होत जातो आपल्याला मिळत जाणारी लोक देखील त्याच पद्धतीने मिळत जातात. जर आपण एखादा नकारात्मक विचार करून आपल्या अवतीभवतीचा वातावरण नकरात्मक करण्यास कारणीभूत ठरत असू तर त्यापेक्षा का नाही आपण एक सुंदर सकारात्मक विचार करायचा ज्यामुळे आपल्याकडे सुंदर सकारात्मक विचाराची लोक आकर्षित होत जातील आणि एकदा का सकारात्मक विचारांची लोकांची साथ मिळाली की खरोखरच जग खूप सुंदर भासायला लागते म्हणूनच सांगावेसे वाटते की जगाला जर सुंदर पाहायचं असेल तर सर्वप्रथम आपण आपला दृष्टीकोन सुंदर बनवला पाहिजे.

उमलणारी फुले, वाहणारे झरे, अथांग सागर, अचल पर्वत, सुंदर हिरवीगार झाडेझुडपे, विविध रंगाचे विविध पक्षी, फुलपाखरे, अखंड वाहत जाणाऱ्या नद्या, जगाच्या अनेक भागात घनदाट वनांमध्ये अनेक प्रकारचे प्राणी हे सर्व कोणी कितीही श्रीमंत असला तरीही याचा आनंद कोणत्याही बाजारात विकत घेऊ शकत नाही. निसर्गाचा हा आनंद घेण्याकरिता गरज आहे ती एका सुंदर दृष्टिकोनाची जो निसर्गाशी एकरूप होऊ शकतो आणि जगातील सकारात्मक बाजू पाहू शकतो असा सुंदर दृष्टिकोण ज्याच्याकडे असेल त्याच्यासाठी खरोखरच जग खूप सुंदर आहे.

Poonam Sulane

पुनम सुलाने, जालना