तिरंगा घरात... जय हिंद मुखात...

१५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक व्यक्तींसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस आहे. कारण या दिवशी आपण इंग्रजाच्या अन्याय, अत्याचारतून मुक्त झालो होतो.

तिरंगा घरात... जय हिंद मुखात...

१५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक व्यक्तींसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस आहे. कारण या दिवशी आपण इंग्रजाच्या अन्याय, अत्याचारतून मुक्त झालो होतो. म्हणजेच आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला होता. आणि आपण  देशाचा कारभार आपल्या हाती घेऊन या भारत देशामध्ये लोकशाही व्यवस्था निर्माण केली होती. पण हे स्वतंत्र सहजासहजी मिळाले होते का? यासाठी कित्येक वीरांनी मातीसाठी रक्ताचे शिंतोडे उडवले जीवापेक्षाही मातीला, तिरंग्याला महत्त्व दिले म्हणूनच आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आणि सामान्य जनतेच्या घराघरात हा ध्वज अभिमानाने फडकत आहे. स्वतंत्र मिळविण्यासाठी आपल्या देशातील अनेक महान लोकांनी बलिदान दिले होते. यांचे स्मरण करून नारे देऊन या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जाऊन ध्वजारोहण करतात. यावर्षी तर प्रत्येक घरात देशप्रेमाचा, देशभक्तीचा तिरंगा लावून अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. एक भारतीय असल्याचा प्रत्येकाला अभिमान असतो अनेकजण आपले आयुष्य मातीसाठी पणाला लावतात ज्यांना इतिहास लक्षात ठेवतो पण सामान्य माणसाचे काय? आपल्या राज्यातील व देशातील बलिदान देणाऱ्या जवानांची माहिती आहे की नाही यासाठी गौवळीशिवरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वे घेण्यात आला होता त्यात तुरळक विद्यार्थ्यांना प्राणाची आहूती देणाऱ्या विरांची माहिती आहे हे समजले. देश हितासाठी झटणाऱ्या या वीरांचे नाव आजही आमच्या लक्षात नाहीत हिच मोठी शोकांतिका आहे. मला वाटते बलिदान देणारे पाच विर जवान, शौर्यशाली धरती मातेचे सुपुत्र जरी नजरेसमोर राहिले तर चुकीचे मार्गावर जाणारी ही पिढी योग्य मार्गावर येईल. 

देशभक्तीचा, देशप्रेमाचा सर्वत्र ७५ वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यावरून माझ्या वाचनात आलेली सुभेदार जगदीश यज्ञेश्वरराव गौळीशिवरेकर (सेवानिवृत्त, भारतीय सशस्त्र सेना) रा. गवळीशिवरा ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथील आदरणीय गौळीशीवरेकर सरांची हिंदी मधील कविता आणखी देशभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करेल असे मला वाटते. सरांनी घराबरोबर मनातून देशभक्ती जागवण्याचा प्रयत्न केला आहे. सर म्हणतात.

जय हिंद मित्रों,
मना रहे हैं हम, 
आजादी का अमृत महोत्सव ! 
हर घर तिरंगा,
घर घर तिरंगा !
हर ओठो पर जय हिंद !
एक देश, एक ही नारा !
बोलो जय हिंद सबसे प्यारा !
सुबह बोलो जय हिंद !
दोपहर बोलो जय हिंद !
शाम को बोलो जय हिंद !
सोते बोलो जय हिंद !
उठते ही बोलो जय हिंद !
हम भी बोले जय हिंद !
तुम भी बोलो जय हिंद ! 
घर में बोलो जय हिंद !
दफ्तर मे बोलो जय हिंद ! 
सभी बोलो जय हिंद !
प्यार से बोलो जय हिंद !
एक देश, एक ही नारा, 
बोलो जय हिंद सबसे प्यारा !
जय हिंद 

ज्याप्रमाणे कविता आहे तसे झाले तर, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग हे बोलण्यापेक्षा जय हिंद बोलले तर नक्कीच देश बदलेल. फक्त एक दिवस नारे देण्यापेक्षा ३६५ दिवस जय हिंद बोला! देशप्रेम जागे होईल. सर केवळ कवितेमध्ये न राहता विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन मार्गदर्शन करताना सांगतात..."एक देश एक ही नारा, जय हिंद बोलो सबसे प्यारा." जय हिंद बोलल्याने खूप अभिमान वाटतो. देशासाठी लढणारे विर जवान देखील अभिमानाने व आदाराने बोलतात आणि देशासाठी जीव हातात घेऊन लढतात. म्हणूनच या अमृत महोत्सवानिमित्ताने तिरंगा घराबरोबरच जय हिंद देखील प्रत्येक मनात जायला हवे! मला वाटते प्रत्येक घरात तिरंगा त्याचप्रमाणे प्रत्येक घरातील व्यक्तीच्या तोंडातून 'जय हिंद' बाहेर पडले तर देशप्रेम कायम मनात जिवंत राहिल.

जय हिंद...

Kaveri Gayake

कावेरी आबासाहेब गायके
भिवगाव, ता. वैजापूर,
जि. संभाजीनगर