कोटक महिंद्राच्या व्यवस्थापकीय संचालक बँकिंग क्षेत्रात नोकरी करून १८ वर्षे झाली होती. तरीही त्या समाधानी नव्हत्या. कारण त्यांनी स्वत:ला वेळेचे बंधन घालून घेतले होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंतच नोकरी करण्याचे ठरविले होते. स्वत:चे काही वेगळे करण्याची त्यांना इच्छा होती. बँकेची नोकरी सोडणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. कारण सर्व काही अचूक चालले होते. तरीही त्यांनी रॉनी स्क्रूवाला (यूटीव्ही) आणि अजय बिजली (पीव्हीआर) पासून प्रेरित होऊन एकदम नव्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे ठरवले. 'सेफोरा'चा केवळ एकच अनुभव त्यांच्यासोबत हाेता, जेव्हा त्यांनी हजारो रुपयांची सौंदर्यप्रसाधने खरेदी केलेली होती.
आई-वडिलांना बिझनेस करताना पाहिले होते. त्यांना 'नाइका' सुरू करण्यात काहीही अडचण नव्हती. २०१२ मध्ये सौंदर्य प्रसाधनांची ऑनलाइन मल्टिब्रँड सेवा सुरू केली. अन्य ई-कॉमर्स सेवा देणाऱ्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्याच अडचणी नाइका कंपनीलाही आल्या. छायाचित्रांवर आधरित साइट असल्याने अनेक तांत्रिक मुद्दे आड आले. वेबसाइट नवीन असताना फाल्गुनी ग्राहकांच्या प्रतिक्रिया तासन््तास वाचत असे. ही सवय आजही कायम आहे. खरेदी करण्याचा ट्रेंड आणि मानवी व्यवहार समजण्याची ही पद्धत यामुळे प्रगतीच्या पायऱ्या वेगाने चढण्यास मदतच झाली. सुरुवातीला दहा ऑर्डर्स असत. ऑगस्ट २०१३ पर्यंत रोज ६० ऑर्डरी मिळू लागल्या. त्यावेळी प्रत्येक ऑर्डर ३०० ते ४०० रूपयांची होती. २०१७ साली कंपनीला रोज दहा हजार डाॅलर्सची ऑर्डर रोज मिळू लागली. अनेक शहरांमध्ये कंपनीची स्टोअर्स आहेत आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दरमहा १.४० कोटी ग्राहक भेटी देतात.
अन्य दुसऱ्या कंपन्याचे ब्रँड विकणाऱ्या या कंपनीने २०१५ मध्ये स्वत:चे उत्पादन बाजारात आणले. २०१६ मध्ये गुंतवणूकदारांकडून कंपनीला १०४ कोटी मिळाले. आता ८५० ब्रँड्सची ३५ हजार उत्पादने कंपनी विकते. आता कंपनीची ऑफलाइन स्टोअर्स आहेत आणि त्यांच्यात वेगाने वाढ होत आहे.
हेही जाणून घेऊया...
२५ ऑक्टाेबर २०१२ रोजी कंपनीला पहिली अॉर्डर मिळाली.
पहिले रिटेल स्टोअर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वर २०१५ मध्ये उघडले हाेते.
सर्वात जास्त ऑर्डर्स २२ ते ३५ वयाच्या युवकांकडून मिळतात.
मेबलीनचे 'द कोलोसेल' काजळ हे सर्वात जास्त विकले जाणारे उत्पादन होय. २१२५२ पिनकोडवर कंपनी सर्व्हिस देते.