उद्योग छोटा , फायदा मोठा !

ग्रामीण भागात चालणारे पारंपरिक उद्योग असतात.

उद्योग छोटा , फायदा मोठा !

उद्योगधंदा ,स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उदीम या सर्व संकल्पना नियोजनबद्ध जीवन जगण्यासाठी आणि स्वतःमधील असलेले विविध कौशल्य क्षमता याचा वापर करून उद्योगधंदा, व्यवसाय केला जातो. ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारे उद्योगधंद्याचे भाग आपणास पडता येतील. ग्रामीण भागात चालणारे पारंपरिक उद्योग असतात. शहरातील उद्योगधंदे वेगवेगळे असतात.

लघु उद्योगांच्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसाय करणारे केले जातात. मधुमक्षिका पालन, वनौषधी लागवड. फळबाग अशा प्रकारे ग्रामीण भागातील उद्योग असले तरी या उत्पादनाला बाजारपेठ व ग्राहकार्य हा शहरातील  मिळतो. शेतीसाठी लागणारे उद्योग व्यवसाय खेड्यात ग्रामीण भागात असतात. लाहोर, सुतार, वेल्डर,इ इलेक्ट्रीशयन, अशा प्रकारचे उद्योगधंदे करणारे, खेड्यातील लोकांच्या गरज पुरविण्याचे   असतात.

मोसमी उद्योग धने देखील आपणास माहित आहेत. जेव्हा गहू, ज्वारी काढणीला येते तेव्हा हरियाणा, पंजाब येथील लोक भारतभर त्याचे मशीन यंत्र घेवून फिरतात. त्या माध्यमातून तांदूळ, गहू, ज्वारी, तूर, भुईमूग, अशा प्रकारची टरफले असलेली धान्ये, ते मलनियंत्रणातून काढून देतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या राज्यातील बँकेमार्फत आर्थिक साहाय्य घेवून स्वतःचे मलनियंत्र विशिष्ट प्रकारची मशिनरी खरेदी करता येते.

खरं तर विणिज्य शाखा हि शास्त्रोक्त पद्धतीने उद्योग व्यवसाय कसा करावा या विषयी मार्गदर्शन करीत असते. वाणिज्य याचे कार्य मालाचे व्यवस्थापन वस्तू व सेवा ग्राहकांना पुरविण्याचे काम केले  जाते.त्यामधील संकल्पना, योग्य स्थळे, योग्य वेळी,योग्य स्थिती,योग्य प्रमाणात,योग्य किमतीला विक्री केली जाते. वस्तू व सेवा याचे उत्पादन वितरण सेवा उपयोग हि अस्थव्यवस्थेची मूलभूत अंगे आहेत.

प्रामुख्याने वाणिज्य या संकल्पनेचा व्यापार म्हणजे  संबंध, फेरीवाले, व्यक्तिगत, मालकीची दुकाने, बहुविध दुकाने, विभागीय भांडारे सहकारी भंडारे, सहकारी विक्री केंद्रे यामध्ये अंतर्भूत होतात. व्यापारात घाऊक व्यापारी मालक, अबिकर्ते,दलाल हे येतात. व्यपारासाठी साहाय्य करणाऱ्या काही बाबी घटक आहेत. त्यामध्ये बँक अर्थ सहाय्य  संस्था साठवण व गोदाम, वेअर हाऊस, वाहतूक, दळणवलन, विमा याबाबी उद्योग, व्यपारात महत्वाच्या भूमिका वठवतात. वस्तू यांची विक्री व्यवस्थापन यासाठी विक्री कला, जाहिरात, कला, आणि व्यवस्थापन महत्वाचे ठरते.

तेव्हा उद्योगधंद्यासाठी मग तो छोटा-मोठा असेल त्यासाठी यासोबत व्यक्तीची आवश्यकता असते.
उद्योगधंद्यामध्ये विविध गरजांनुसार निर्माण केले जातात.

वस्त्रकला : अशमयुगीन संस्कृती, लोकांचे राहणीमान, इजिप्त व पेरू यांच्यात कापडतंतूंचा मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणावर साथ करून ठवलायचे लक्षात आलेले आहे. रोमन साम्राज्याच्या काळात, हान साम्राज्याच्या काळात ए.स. पूर्व २०० वस्त्र कलेचे विविध नमुने आढळून आलेले आहेत. आज आधुनिक काळात विविध नमुने आढळून आलेले आहेत. आज आधुनिक काळात विविध प्रकारच्या मिल्स, भारतातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून कापड उद्योगाची भरभराट सुरु आहे.

लोकर : लोकरीचा वापर कौटिल्याने अर्थशास्त्रात इ.स.  शतकात लोक तलम वस्त्र, मोगल काळात पर्शियातील (इराण)  कारागीर भारतात आले. त्याच्या माध्यमातून भारतीय गालिचा  ज्ञान भारतीय कारागिरांनी आत्मसात केले व हळूहळू हा उद्योग वाढीस लागला. आज प्रत्येक घरातील बैठकीत गालिचाच उपयोग केला जातो. आपण काही उद्योगधंद्याची माहिती घेवून जे सहजपणे करता येतील.

चर्मउदयोग : कातडी कमावणे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू-पादत्राणे बनविणे . हि प्राचीन कला आहे ३,३०० वर्षांपूर्वी कातडी वस्तू संशोधनातून सापडल्या. आजदेखील त्या सुस्थितीत आहेत. पर्स, बॅग, विविध वस्तू कातड्यापासून तयार केल्या जातात. आज 'बट सारखे विविध कारखाने आहेत. त्यामध्ये चामडी वस्तू प्रक्रिया करून इंडस्ट्रीज विविध वस्तू बनविते.त्यांनी तयार केले. रेडिमेड मालाची तुम्हाला विक्री करता येईल. किंवा लेदर टेक्नोलोंजि या अभ्यासक्रमाद्वारे देखील स्वतःची इंडस्ट्री सुरु करता येईल

फोटोग्राफी : रोजगार स्वयंरोजगारामध्ये फोटोग्राफ हा व्यवसाय उत्तम छाया चित्रण याची संकल्पना पूर्व अठराव्या शतकात कॅमेरा 'ऑब्स्क्यूस, कॅमेरा ल्युसिरा यानावाचे साधन पूर्वी प्रचलित होते. १८२९ मध्ये 'दातोवर' यांनी प्रकाशचित्रणाचा शोध लावला. १८३९  पॅरिसमधील वर्तमानपत्रांतून त्याची बातमी प्रसिद्ध झाली.

नंतर कॅमेरा फोटोग्राफीसाठी व्हर-घरात उपयुक्त म्हणून वापरण्यात येवू लागला.  फोटो स्टुडिओमध्ये पारंपरिक पद्धतीचे कॅमेरे होते. ते अमरे बाहेर घेवून जाणे अशक्य होते.नंतर सुधारणा होऊन छोटे छोटे कॅमेरे तयार केले गेले. १) मिनिएचर कॅमेरा २) एक भिंगी रिप्लेक्स कॅमेरा ३) प्रेस कॅमेरा ४) स्टुडं किंवा व्ह्यू कॅमेरा ५) त्रिमितीय कॅमेरा ६) पोलरॉईड लँड कॅमेरा ७) हवाई एरियल कॅमेरा ८) पाण्याखालील कॅमेरा ९) दूरचित्रवाणी कॅमेरा १०) दुतगती कॅमेरा अशा प्रकारच्या विविध कॅमेरे फोटोग्राफीसाठी वापरण्यात येत असते. आता मात्र मोबाईलमध्ये कॅमेरा आला. परंतु आजदेखील निकॉन,  पंतेंक्स,कॅनॉन, हंस कितीतरी नामांकित कंपन्या कॅमेरा तयार करणाऱ्या कंपन्या आहेत.

सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचे महाविद्यालयीन सेक्शन पूर्ण करताना आउटडोअर फोटोग्राफीमधून स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असेल तर स्थयिक फोटो स्टुडिओ टाकून देखील एन-डोअर, आउट-डोअर फोतोग्रजि, इंडस्ट्रिअल फोटोग्राफी, लग्न, वाढदिवस विविध समारंभ, छोट्या मोठ्या मालिका, ङ्कयमेन्टरी यासाठी विशिष्ट प्रकारचे १२विनंतर प्रशिक्षण घेवून 'फक्शनल ' फोटोग्राफी अभ्यासक्रम ललित कला महाविद्यलियन आणि खासगी संस्थेतून करता येतील. आणि अशा प्रकारे व्यवसाय करता येईल.

फर्निचर : लघुउद्योगामधे विविध उद्योगांपैकी फर्निचर उद्योग हा होय. फर्निचर डिझाईन हा भाग कौशल्याचा आहे. विविध लाकडांपासून फर्निचर तयार केले जाते. प्रामुख्याने 'साग' 'शिसम' हि लाकडे फर्निचर डिझाइनसाठी चांगली असतात. तेव्हा टिकवूड आफ्रिका , युरोप, भारतातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारची झाडे कामांच्या वर्गवारीनुसार वापरली जातात. इमारतींसाठी लिबांचे झाड, दारे, चौकट, पारंपरिक वखर नांगर यासाठी वापरात येणारे झाड बाभूळ, जांभूळ, आंबा, लिंब, असे मोठे मोठे वृक्ष , इमारत व इतर लाकडी वस्तू बनविण्यासाठी वापरल्या जातात.

रामायण, महाभारतात राजे महाराजे यांच्या काळातील वापरात येणारे फर्निचर डिझाईन मेकर्स, जुन्या डिझाइन्स या आताच्या फर्निचर निर्यात करून विकतात. तेव्हा ग्रामीण भागापासून तर शहरी भंगापर्यंत प्रत्येक घराघरांत फर्निचर वापरले जाते. टेबल, खुर्ची कपात, अलमारी, स्टूल, दिवाण, प्लंग अशा कितीतरी गरजेच्या वस्तू तयार करण्याचे काम सुतार करतात. तेव्हा हा व्यवसाय देखील उत्तम प्रकारे चालतो.

इलेक्रॉनिक्स : इलेक्ट्रॉनिक्स हा व्यवसाय तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील पदवी, पदविका अशा प्रकारचे प्रशिक्षण डिग्री असेल तर तुम्ही समाजातील गरजेनुसार लोकांच्या घरगुती उपयोगाच्या विविध वस्तू फोर व्हीलर, टू व्हीलरसाठी लागणारे विविध पार्टस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुट्या भागांचे उत्पादन तुम्ही करू शकता. जर आपणास याप्रकारचे उत्पादन करायचे नसेल तर तुम्ही रेडी मटेरियल विक्री करू शकता.

विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या उत्पादन करून विविध वस्तू दोन प्रकारे विकतात. किंवा डिलर्समार्फत विकतात. त्यापूर्वी त्या उत्पादित वस्तूची जाहिरात केली जाते. तेव्हा काही एजेंट विक्री करणारे देखील असा माळ त्यांच्या विक्री कौशल्यानुसार विक्री करून आर्थिक गरज भागवीत असतात. आज मनुष्याचे जीवनच इलेक्ट्रॉनिक्स व ग्रहोऊपयोगी वस्तूवर अवलंबून आहे. तेव्हा आवड असणाऱ्या युवक-युवतींना इलेक्टॉनिक्स क्षेत्रातील व्यवसाय करता येईल. ऑन लाईन व्यवसाय देखील करता येईल.

अन्नधान्य विक्री व्यवसाय : अन्न धान्य प्रत्येक घरत कुटूंबाला लागत असते. प्रामुख्याने डाळी, तूर डाळी, मूग डाळ, उडीद डाळ, धान्यांमार्फत ज्वारी, गहू, बाजरीही, मुबलक प्रमाणात वापरली जातात. तांदूळ, गरजेनुसार लागतो. तेव्हा सुशिक्षित बेरोजगारांची संशोधनात्मक विचार केल्यास तुम्हला लक्षात येईल. एका घरात चार ते पाच व्यक्ती असतील तर त्यांना वर्षाला १० ते १५ किलो डाळी, वेगवेगळ्या लागतात.

गहू ४ ते ५ क्विंटल लागतो. बाजरी ज्वारी, हि गरजेनुसार कमी प्रमाणात लागते. या सर्व प्रकारची धान्ये सीझनमध्ये मिळतात. तेव्हा तुम्ही सर्वक्षण करून शहरातील कुटूंबाला उत्तम प्रकारची दर्जेदार धान्ये पुरविली सर्व मॅटडोर किंवा ट्रकमध्ये माळ आणून घरोघर पोहोचवला लसूण, बटाटे कांदे, साखर हेदेखील तुम्हाला पुरविता येईल. शेंगदाणा, करडईचे तेल, ग्रामीण भागातील तेल मशिनमधून काढून महिन्याला पांच  ते सात  लिटर या प्रमाणे पुरवठा करता येईल.
इलेक्रॉनिक्स : इलेक्ट्रॉनिक्स हा व्यवसाय तुम्ही करू शकता.

त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील पदवी, पदविका अशा प्रकारचे प्रशिक्षण डिग्री असेल तर तुम्ही समाजातील गरजेनुसार लोकांच्या घरगुती उपयोगाच्या विविध वस्तू फोर व्हीलर, टू व्हीलरसाठी लागणारे विविध पार्टस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुट्या भागांचे उत्पादन तुम्ही करू शकता. जर आपणास याप्रकारचे उत्पादन करायचे नसेल तर तुम्ही रेडी मटेरियल विक्री करू शकता. विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या उत्पादन करून विविध वस्तू दोन प्रकारे विकतात.

किंवा डिलर्समार्फत विकतात. त्यापूर्वी त्या उत्पादित वस्तूची जाहिरात केली जाते. तेव्हा काही एजेंट विक्री करणारे देखील असा माळ त्यांच्या विक्री कौशल्यानुसार विक्री करून आर्थिक गरज भागवीत असतात. आज मनुष्याचे जीवनच इलेक्ट्रॉनिक्स व ग्रहोऊपयोगी वस्तूवर अवलंबून आहे. तेव्हा आवड असणाऱ्या युवक-युवतींना इलेक्टॉनिक्स क्षेत्रातील व्यवसाय करता येईल. ऑन लाईन व्यवसाय देखील करता येईल.

अन्नधान्य विक्री व्यवसाय : अन्न धान्य प्रत्येक घरत कुटूंबाला लागत असते. प्रामुख्याने डाळी, तूर डाळी, मूग डाळ, उडीद डाळ, धान्यांमार्फत ज्वारी, गहू, बाजरीही, मुबलक प्रमाणात वापरली जातात. तांदूळ, गरजेनुसार लागतो. तेव्हा सुशिक्षित बेरोजगारांची संशोधनात्मक विचार केल्यास तुम्हला लक्षात येईल. एका घरात चार ते पाच व्यक्ती असतील तर त्यांना वर्षाला १० ते १५ किलो डाळी, वेगवेगळ्या लागतात.

गहू ४ ते ५ क्विंटल लागतो. बाजरी ज्वारी, हि गरजेनुसार कमी प्रमाणात लागते. या सर्व प्रकारची धान्ये सीझनमध्ये मिळतात. तेव्हा तुम्ही सर्वक्षण करून शहरातील कुटूंबाला उत्तम प्रकारची दर्जेदार धान्ये पुरविली सर्व मॅटडोर किंवा ट्रकमध्ये माळ आणून घरोघर पोहोचवला लसूण, बटाटे कांदे, साखर हेदेखील तुम्हाला पुरविता येईल. शेंगदाणा, करडईचे तेल, ग्रामीण भागातील तेल मशिनमधून काढून महिन्याला पांच  ते सात  लिटर या प्रमाणे पुरवठा करता येईल.