होळी हा एक महत्त्वाचा सण आहे. होळीला 'शिमगा' असेही म्हणतात. होळीच्या दिवशी ठरलेल्या जागी एक मोठा खड्डा खणतात. मध्यभागी झाडाची फांदी उभी करतात. भोवती लाकडे रचतात. हीच होळी होय. संध्याकाली होळीची पूजा करतात. तिला पुरण पोळीचा नेवैद्य देतात मग होळी पेटवतात तिच्याभोवती सर्वजण नाचतात असा प्रकारे होली आनंदाने साजरी करतात. होळी हा उत्सव अशाप्रकारे साजरा करतात हे सगळ्यांना माहित आहे
अग्नीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे होळी. काम, क्रोध, मद, मोह. लोभ, मत्सर या षड्रिपूंचे दहन करा म्हणून होळी सांगते. पर्यावरणाच्या स्वच्छतेचा संदेश देते. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी विविध वृक्षांच्या नावे उत्सव साजरे केले जाते. नृत्य, संगीत, नाटक असे कार्यक्रम केले जात. केशर, हळद यापासून बनलेला रंग एकमेकांना लावला जाई. आज रासायनिक रंगाचा वापर करून आक्षेपार्ह वर्तन केले जाते. रंगपंचमीचा विकृत अर्थ लोक लावत आहेत. हे बंद झाले पाहिजे.
आपल्या इतिहासात एक कथा आहे आपण होळी का साजरा करतो ती पुढील प्रमाणे
एकेकाळी पृथ्वीवर विजय मिळवणारा हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता. तो इतका अहंकारी होता की त्याने आपल्या राज्यातील प्रत्येकाला फक्त त्याचीच उपासना करण्याची आज्ञा दिली. पण त्यांचा मुलगा प्रल्हाद भगवान नरायणाचा कट्टर भक्त बनला आणि त्याने आपल्या वडिलांची उपासना करण्यास नकार दिला.
हिरण्यकश्यपने आपला मुलगा प्रल्हादला ठार मारण्याचा अनेक मार्ग प्रयत्न केला , पण भगवान विष्णूंनी त्याला प्रत्येक वेळी वाचवले. शेवटी त्याने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला घेऊन अग्नीत बसायला सांगितले . कारण होलिकाला वरदान आहे हे हिरण्यकश्यपला माहीत होतं, ज्यामुळे ती आगीत प्रवेश करू शकत होती.
विश्वासघातकरून होलिकाने तरुण प्रल्हादला मांडीवर बसायला लावलं आणि ती स्वत: आगीत बसली. होलिकाला तिच्या आयुष्यात तिच्या भयंकर इच्छेची किंमत मोजावी लागली, अशी आख्यायिका आहे. ती एकटीच आगीत शिरली तेव्हाच वरदान चालतं हे होलिकाला माहीत नव्हतं. त्या अग्नी मध्ये होलिकाचा अंत झाला आणि भक्त प्रल्हाद हा आपल्या भक्ती मुळे त्या अग्नी मधून सुरक्षितपणे बाहेर आला .
काही ठिकाणी असेही म्हणतात होलिका जवळ एक कापड होते ते अंगावर घेऊन ती सहजपणे अग्निमध्ये प्रवेश करू शकत होती आणि एक दिवस ती राजा हिरण्यकश्प च्या सांगण्यावरून भक्त प्रल्हाद ला घेऊन अग्नीत बसली त्यावेळी सुसाट वारा सुटला आणि तिच्या अंगावर असलेले कापड प्रल्हाद च्या अंगावर पडले त्यामुळे प्रल्हाद वाचला आणि होलिकाचा नाश झाला.
त्यामुळे होळीचे नाव होलिकापासून मिळते. आणि वाईटावर चांगल्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. होळी हा भक्ताचा विजय म्हणूनही साजरा केला जातो. दंतकथेत सांगितल्या प्रमाणे , कोणीही खऱ्या भक्ताचे नुकसान करू शकत नाही.