तुमच्या निर्णयाबद्दल ठाम राहा

सत्यासाठी जो माणूस स्वत:च्या हिताचा ही त्याग करू शकतो, तोच एक प्रामाणिक, विश्वासार्ह हिशेबनीस बनू शकतो.

तुमच्या निर्णयाबद्दल ठाम राहा

एके शनिवारी, श्रीयुत गिरार्ड, जे फिलाडेल्फिया मधील एक करोडपती आणि नास्तिकही होते त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सगळ्या कारकुनांना बोलावून घेतले आणि दुसऱ्या दिवशी येऊन नवं काम पूर्ण करण्याबद्दल आज्ञा केली.

एक तरुण कारकून मात्र हळूवारपणे म्हणाला, “श्रीयुत गिरार्ड, मी रविवारी काम करू शकत नाही"

"तुला आपल्याकडचा नियम माहिती आहे ना?" श्रीयुत गिरार्ड यांनी विचारलं.

"होय, मला माहिती आहे, पण मी रविवारी काम करू शकत नाही."

"ठिक आहे, मग जा आणि हिशेबनीसाकडून आपला हिशेब करून घे, ते पैसे तुला भावी काळासाठी उपयोगी ठरतील."

एके दिवशी, कोणी एक स्वत:ची बँक असलेला गिरार्डकडे आला आणि त्याच्या बँकेमध्ये नव्या हिशेबनीसाच्या पदासाठी कोणी चांगला माणूस असल्यास सांगण्याची विनंती करू लागला.

गिराड यांनी त्या पदासाठी त्यांनी तडकाफडकी काढून टाकलेल्या तरुणाचं नाव सुचवलं.

गिरार्ड यांनी जरी त्या तरुणाला कामावरून काढून टाकलेलं असलं. तरीही त्यांनी त्या माणसाचं अस्सल चारित्र्य ओळखलं होतं. सत्यासाठी जो माणूस स्वत:च्या हिताचा ही त्याग करू शकतो, तोच एक प्रामाणिक, विश्वासार्ह हिशेबनीस बनू शकतो.