डॉ. रघुनाथ माशेलकर एकदा म्हणाले, "दुर्बिनीतून सूर्याची किरण एकत्रित करून ती एका कागदावर आणली तर तो कागद जळतो. म्हणजे एकाच उद्देशावर आपली ऊर्जा केंद्रित केली तर तिचे बळ वाढते आणि ते उद्दिष्ट सहजगत्या साध्य होते. हे साधं वैज्ञानिक तत्त्वच माझ्या जीवन प्रवासाचा मूलाधार आहे. तेच मला यापुढची वाट दाखविणार आहे.
या विचारावरुन डॉ. रघुनाथ माशेलकर हे कोणाला माहीत नाहीत असे होणार नाही. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत, आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत.
निसर्गातील लहानबाबीही एकाग्रतेबद्दल लक्षं खेचून घेतात. मांजार तिच्या भक्षाला (उंदराला) पकडताना खूपच मन एकाग्र करते. त्याच्याकडे कोणतीच हालचाल न करता एक टक पाहते. व ते लक्ष केंद्रित झाले की उडी मारते व पकडते. याच्यासारखेच दुसरे उदाहरण बहिरी ससाण्याचे आहे. व घारीचेही आहे.
आपल्या मनातील असंख्य विचाराला शांत केले की आपोआप थोड्यावेळाने ते मन शांत होते. विचाराला व्यापकता दिली की त्यामधील दाहकता नाहीशी होती आणि शांत शांत वाटत जाते, तेव्हा एकाग्रता साधते, मग मन एकाच गोष्टीवर केंद्रीत होते. ते म्हणजे दुर्बिीतील एक बिंदू तयार होतो. तो कोठेही पडेल तेथेच मनातील इच्छा साध्य करण्याचा प्रयत्न करतो.
जे काम हातात घेतले आहे. त्यावरच विचार केला तर असंख्य विचाराच वादळच मनात तयार होत नाही. मग त्या कामावरच एकाग्रता लागते. जेथे एकाग्रता तयार होते तेथेच तेथेच नवनिर्मिती तयार होते. एका बेटावरील एका रहिवाशांच्या हातात भाला होता. भाल्याच्या टोकाला छिद्र पाडलेले होते ते दृश्य एका निर्मात्याने पाहिले तो एकाग्र झाला. आणि लगेच त्याला शिवणयंत्राची कल्पना सुचली. शिवनयंत्राची कल्पना ही नवनिर्मितीच झाली.
एकदा का तुम्ही एकाग्रता साधली तर मात्र तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किंवा जीवनप्रवासात अत्युच्च शिखरावर पोहचू शकता एवढेच नव्हे तर एक अती व समाधान तुम्हाला प्राप्त होऊ शकते. मग प्रत्येकाला हेच अपेक्षित असतं ना?
मग तुम्हाला प्रश्न पडेल की मन एकाग्र कसे करायचे? यावर एकच उपाय,
'मनातील असंख्य विचारांचे
वादळ कमी करा.
शांत, शांत आणि शांतच
यातूनच एकाग्रता साधते!'