संयमाच्या सद्गुणांची जोपासना करा

संयम आणि सहनशीलता हीच यशाची गुरुकिल्ली होय. जो माणूस भावनेने संतापतो, तो माणूस योग्य दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीकडे बघू शकत नाही

संयमाच्या सद्गुणांची जोपासना करा

सर आयझॅक न्यूटन यांच्याकडे एक अतिशय छान पण बरा खोडकर असा कुत्रा होता, ज्याचं नाव होतं डायमंड, एक दिवस न्यूटन जेव्हा घरी नव्हते. त्या कुत्र्याने मेणबत्तीवर एक फटका मारला. ज्यामुळे तिथे टेबलावर ठेवलेल्या हस्तलिखित पुस्तकाला आग लागली आणि काही क्षणातच ते पुस्तक अर्धवट जळालेलं असं राहिले. ते लिहित असलेलं हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आठ वर्षांच्या कठीण संशोधनाचं आणि परिश्रमाचं फलित होतं. पण जेव्हा न्यूटन परतले आणि त्यांनी ती दुर्घटना पाहिली, त्यांची त्याबद्दल प्रतिक्रिया अशी होती..

सर आयझॅक न्यूटन यांनी त्या कुत्र्याला जवळ बोलावले आणि म्हटले, "डायमंड, तू तुझ्या मालकाला कोणत्या संकटात आणि कामात ढकलले. याची तुला थोडी तरी जाणीव आहे का?" मग त्यांनी आता हे नष्ट झाले आहे. तर काय करायचे, असा विचार बहुसंख्य लोकांप्रमाणे केला नाही ते शांतपणे टेबलाजवळ बसले आणि त्यांनी पुन्हा लिहून काढायला सुरुवात केली.

संयम आणि सहनशीलता हीच यशाची गुरुकिल्ली होय. जो माणूस भावनेने संतापतो, तो माणूस योग्य दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीकडे बघू शकत नाही दुसऱ्या बाजूने विचार करता, जी व्यक्ती तो किंवा ती आपल्या भावनिक आयुष्यावर नियंत्रण ठेवते, तीच व्यक्ती आपल्या बुद्धीमत्तेचा पूर्णपणे वापर करू शकते. अशा व्यक्ती कठीण परिस्थितीतही स्थिर बुद्धीने विचार करतात आणि सहजासहजी संतापत नाही त्यामुळेच तो किंवा ती त्याच्या आदर्शांशी अगदी वास्तववादी सुसंगती ठेवू शकतात.