एका कंपनीमध्ये दोन कर्मचार्यांची भरती करण्यात आली, दोघेही सारखेच सक्षम आणि हुशार होते, पण दोघांची पार्श्वभूमी वेगवेगळी होती. एक कर्मचारी जरा आधुनिकतेचा स्पर्श झालेला, छानछोकीत राहणारा, आत्मविश्वासपूर्ण आणि देशातल्या एका गाजलेल्या संस्थेमध्ये शिकलेला असा होता, तर दुसरा हा त्यापेक्षा जरा कमी वाटणारा पन जरा मुत्सदी, पहिल्याच्या तुलनेमध्ये फार चांगलं शिक्षण घेतलेला असा नाही, पण काही वर्षांचा अनुभव घेतलेला असा होता. तथापि, त्या दोघांमध्ये दुसरा कर्मचारी व पहिला हा नेहमीच 'जरा जास्त शहाणपण आहे' असं मानला गेलेला आणि चांगल्या संधी कायम ज्याला दिल्या जातात असा होता. तेव्हा पहिला हा कर्मचारी जरा नाराज झाला आणि आपण दुसरा कर्मचारी पेक्षा एवढे चांगले शिक्षण घेतलेले असतानाही आपल्याजवळ त्याच्यापेक्षा शहाणपणा कमी आहे, असं का वाटते हे विचारायला कंपनीच्या अध्यक्षांकडे गेला. अध्यक्षांच्या उत्तराने पहिल्या कर्मचाऱ्याला जीवन म्हणजे काय, याचे यथार्थ दर्शन झाले.
अध्यक्ष म्हणाले ,"शिक्षण हे पुस्तक वाचून या वर्गातील व्याख्याने ऐकून मिळवता येते. पण शहाणपण हे फक्त 'तुम्ही स्वतः' हे एकमेव पुस्तक वाचून मिळते."
ज्ञान मिळवणे ही प्रक्रिया पुस्तकं वाचणे आणि वर्गात शिकवले जाणारे ऐकणे, अशी क्रियाशून्य आणि फार वरवरची अशी आहे. हे म्हणजे केवळ उसन्या गोष्टी आणून कोंबून भरणं आहे. 'तुम्ही स्वत:ला पुस्तकासारखं वाचणं या प्रक्रियेमध्ये विचार, कल्पना, भविष्यवेध , निर्णय वगैरे सारं काही आहे. ही प्रक्रिया सक्रिय आणि आंतरिक आहे. त्या मुलभूत आणि सर्जनात्मक आहे. हे जग वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती करू शकले ते अशाच लोकांच्या परिश्रमाने जे कल्पना करू शकले आणि भविष्याचा वेध घेऊ शकलेले आहेत. कल्पना करणे हे नुसत्या साऱ्या कोरड्या ज्ञानापेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे. शहाणपण हे 'स्व'च्या ज्ञानातून प्रकट होते. 'स्वत:ला असं पुस्तकासारखं वाचणं', हे काही सरतेशेवटी सोपे काम नाही, दिवसाच्या प्रत्येक क्षणाला या पुस्तकाची नवी आवृत्ती निघत असते.