आयुष्यात चमत्कार घडवा

सर्वसाधारण माणूस हा भित्रा असू शकतो, पण जेव्हा त्याला मोठ्या उद्दिष्टाची प्रेरणा मिळते

आयुष्यात चमत्कार घडवा

व्ही. बेकमन हा त्याच्या कुटुंबासोबत एकदा कुठेतरी सहलीला गेला होता. त्याची कार जरा उतारावरच लावली गेली होती. त्याचा चार वर्षांचा मुलगा त्या कारजवळच खेळत होता. कुणास ठाऊक कसे, पण अचानक कार जागेवरून सरकली आणि त्याचा मुलगा अगदी गाडीच्या चाकाखालीच येण्याच्या बेतात होता. ते पाहून बेकमनने त्या अवजड कारची बाजू अचानक धरली आणि त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी ती उचलून धरण्याचा प्रयत्न केला.

मुलगा चाकाखाली सापडून काही दुर्घटना घडू नये म्हणून बेकमनने खरोखरच चमत्कार करीत ती कार पुरेशी उंच उचलून धरली. 

या घटनेच्या संदर्भामध्ये मला एक गोष्ट, जी स्वामी चिन्मयानंदांनी त्यांच्या 'लाईफ अँड मेडिटेशन' या पुस्तकांत सांगितली आहे. ती सांगण्याचा मोह होतोय.

"आता असा क्षणभर विचार करा की तुमच्या घराला आग लागली आहे. अशी बातमी तुमच्या कानावर पडली आहे. तुम्ही धावतच तिथे पोहचता आणि तुमच घर आगीने वेढलेले आहे, हे तुमच्या दृष्टीस पडते. अग्नीशामक दल अगदी असहाय आहे. अशा क्षणी तुमच्या दृष्टीस असं पडतंय की तुमची बायको तुमच्या मुलाला हातावर घेऊन बाहेर पडते आहे. तुम्ही चौकशी करता तेव्हा तुम्हाला एक चित्तथरारक बातमी कानावर पडते की तुमचा मुलगा वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये शांतपणे झोपला होता. अचानक झालेल्या घटनेमुळे सगळ्यांची धावपळ चालू असताना, आईला मात्र आपल्या मुलाची आठवण येते. तो अग्नीशमन दलाचा जवान, चाळीस वर्षांचा त्याचा अनुभव असूनही म्हणतोय की, "आई , आता कोणताही माणूस जाऊ शकत नाही, कारण सगळे काही आगीने वेढलेलं आहे." ती आई एका क्षणामध्ये सारं काही विसरते आणि वेड्यासारखी ओरडत त्या आगीतून धावत जाते. प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की ती पार भाकरीसारखी करपून बाहेर पडणार. पण त्याऐवजी, त्यांच्या लक्षात असं येतं की तिची साडीही पेटलेली नाहीये. ती धावत त्या खोलीमध्ये गेली, त्या मुलाला उचललं आणि धावत बाहेर आली. या घटनेनंतर तिला फक्त पेटलेल्या शेकोटीजवळ जायला सांगा, ती घाबरते, तिची क्षमता पार संपलेली असते. पण मुलाच्या आत्यंतिक प्रेमाखातर, ती तो चमत्कार करू शकली. जर ही शक्ती माणसाच्या मनामध्ये आहे तर तो चोवीस तास ही तशीच एखाद्या वीरांगनेसारखी राहू शकणार नाही का? अजिबात नाही, कारण प्रेरणादायक असं कुठलंच उद्दिष्ट तिच्याजवळ नसते. म्हणून असं म्हणता येते की सर्वसाधारण माणूस हा भित्रा असू शकतो, पण जेव्हा त्याला मोठ्या उद्दिष्टाची प्रेरणा मिळते, तुम्हालाही तशी मिळू शकते, तेव्हा तो त्याच्या अंतरंगातून ऊर्जा आणि चेतनेचा एक प्रवाह उत्सर्जित करतो.