कृतीसाठी विचार सर्वश्रेष्ठच

मोजके काही लोकच विचार करतात. जे विचार करतात तेच काही तरी करून दाखवतात.

कृतीसाठी विचार सर्वश्रेष्ठच

फोर्ड मोटर्समधील क्षमता तपासणारा एक तज्ज्ञ हेनरी फोर्डला आपला अहवाल सादर करीत होता. "तुम्ही पाहालच सर, जो पुढे अहवाल येईल तो अत्यंत छान असेल, अपवाद असेल फक्त त्या माणसाचा जो कोपऱ्यात बसलेला आहे. केव्हाही मी त्याच्या जवळून जातो, तेव्हा तो टेबलावर पाय ठेवून निवांत बसलेलाच असतो. तुमचा पैसा तो निव्वळ वाया घालवत आहे."

हेनरी फोर्ड फक्त हसले आणि ते जे काय बोलले तो त्या तज्ज्ञाला मिळालेला एक नवा पाठ होता.

फोर्ड म्हणाले, "त्याच माणसाच्या डोक्यामध्ये एक कल्पना कघीकाळी आली होती जिने आपल्याला एवढी संपत्ती दिली आहे. त्यावेळीही, माझ्या आठवणीप्रमाणे त्या माणसाचे पाय तिथंच होते जिथं ते सध्या आहेत."

आपण या पृथ्वीवर आज जे काही पाहात आहोत, ती सर्व अशाच विचारांची निर्मिती आहे. विचार आणि कल्पनांनी जे काय बनवले आहे, तेच आजचे जग आहे. नवा आधुनिक सुविचार आहे, 'काम कौशल्याने करा, नुसते कठीण परिश्रम नकोत.' जर तुम्हाला कौशल्याने काम करायचे असेल, तर विचाराचा मार्ग धरा. मोजके काही लोकच विचार करतात. जे विचार करतात तेच काही तरी करून दाखवतात.