अनावश्यक शॉपिंग आणि Creadit Card खरेदीवर ठेवा नियंत्रण

वारंवार क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करणे चांगली सवय नाही. तुमच्यावर किती कर्ज वाढत जातेय, याचा तुम्हाला अंदाज येत नाही.

अनावश्यक शॉपिंग आणि Creadit Card खरेदीवर ठेवा नियंत्रण

जुन्या सवयी सोडणे आणि नवीन सवयी लावून घेणे दोन्ही अवघड आहे. दोन्हीसाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो- मग त्या सवयी चांगल्या असो वा वाईट. जर तुम्हाला वाईट सवय असेल तर ती सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात काय? जर तुमची एखादी सवय आर्थिक प्रकरणाशी संबंधित असेल तर त्याकडे दुर्लक्ष कधीच करू नका. कार किंवा घर यांसारख्या मोठ्या खरेदीसाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत काय, हे निश्चित करा. या कागदपत्रांना सांभाळून ठेवा, कारण कर भरताना या कागदपत्रांची गरज भासते. नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच आपण अशा काही वाईट सवयी सोडण्याबाबत आणि नवीन सवयी लावून घेण्याबाबत चर्चा करणार आहोत. 

झगमगाट पाहून खरेदी करू नका : काहीही खरेदी (Purchase) करण्याची तुमची इच्छा नसली तरी फिरण्यासाठी तुम्ही मॉलमध्ये गेलात तर मॉलमधील सेल पाहून तुम्ही एक-दोन वस्तूंची खरेदी करतातच. अशा खरेदीपासून स्वत:ला पूर्णपणे दूर ठेवता आले पाहिजे. अशा प्रकारे खरेदी करण्याचा निर्णय चुकीचा असतो. नंतर पश्चात्ताप झाल्यापेक्षा तुम्ही अशा कोणत्याही नुकसानीपासून आधीच दूर राहिलेले बरे असते. 

बिल भरणा ऑटोमॅटिक करा : युटिलिटी बिल साचवत राहणे योग्य नसते. तुमचे जितकी बिले आहेत, त्यांना बँक अकाउंट, ई-वॉलेट किंवा कोणत्याही डिजिटल पद्धतीने ऑटोमॅटिक भरण्याची व्यवस्था निश्चित करा. यामुळे वेळेवर देणे देण्याची सवय लागते. 

क्रेडिट कार्डला नाही म्हणा : वारंवार क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करणे चांगली सवय नाही. तुमच्यावर किती कर्ज वाढत जातेय, याचा तुम्हाला अंदाज येत नाही. बिल आल्यानंतर मोठी रक्कम देणे बाकी असल्याचे तुमच्या लक्षात येते. छोटी-मोठी खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करू नका. अशी खरेदी नगदी पैसे देऊन करून घ्या. जर क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल भरण्यास उशीर झाल्यास लेट फी आणि त्यावर मोठे व्याज लागू शकते. 

बँक स्टेटमेंटवर लक्ष ठेवा : बँक खात्यात पगार आल्यानंतर पैसे कोठे खर्च होत आहे, याकडे आपण लक्ष देत नाही. जेव्हा खात्यात अत्यंत कमी पैसे शिल्लक राहतात, त्या वेळी पहिले खर्चाचे नियोजन का केले नाही, याचा पश्चात्ताप होतो. बँक व्यवहारावर लक्ष ठेवणे आणि खर्चाचे नियोजन करणे चांगली सवय आहे. यामुळे बचतीमध्ये मदत मिळेल आणि महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे कमी पैसा राहणार नाही. 

अनावश्यक खर्च करू नका : तुम्हाला काय खरेदी करायचे आहे, ते निश्चित करून तुम्ही पैसे ट्रॅक करू शकता. मग तुम्हाला दुधाची पिशवी खरेदी करायची असेल किंवा टीव्ही. पैसा कोठे खर्च होतोय, हे तुम्हाला माहिती असायला हवे. जर तुम्ही शॉपिंगची (Shopping) यादी तयार केली तर तुम्हाला खर्च कमी करण्यास मदत मिळेल. 

इमर्जन्सी फंड : आपत्कालीन स्थिती येण्याची प्रतीक्षा करू नका. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा पैशाची व्यवस्था करू, असा विचार करू नका. आरोग्याबाबत इमर्जन्सी कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे थोडी-थोडी रक्कमच का होईना, इमर्जन्सी फंडात जमा करत राहा. सावध राहणे नेहमीच उपचारापेक्षा चांगले असते.