जगून घ्या आयुष्य जोपर्यंत पूर्णविराम येत नाही....

जीवन हे उन सावलीचा खेळ असतो, दु:ख झाले की सुखाची हजेरी लागणारच असते. आयुष्य आपले आहे आपण मनसोक्त जगले पाहिजे.

जगून घ्या आयुष्य जोपर्यंत पूर्णविराम येत नाही....

डोंगरासमान संकटाचा सामना करून रोज नव्या आशेच्या किरणाची वाट पाहणे म्हणजे आयुष्य! जगण्याला नव्या दिशा देऊन संकटांवर पाय देऊन उभे राहणे म्हणजे आयुष्य!  रोज संकटाची झळ सोसावी लागत असताना  सावलीची अपेक्षा करणे, येवढेच नव्हे तर जिवन जगता-जगता मरणाची वाट बघते म्हणजे आयुष्य! जीवनाचा प्रवास हा इंद्रधनू सारखा आहे वेगवेगळ्या रंगानी एकत्र रंगणारा, तसे तर आहे आपल्याही जिवणाचे  रोज नवी आशा असते, कधी सुख तर कधी दु:ख असते, जीवन हे उन सावलीचा खेळ असतो, दु:ख झाले की सुखाची हजेरी लागणारच असते. आयुष्य आपले आहे आपण मनसोक्त जगले पाहिजे. गरज असते तिथे जपलेही पाहिजे स्वताला, भान ठेवले पाहिजे कर्तव्याचे, पण क्षणात तोडल्या पाहिजे फक्त आतील जीवन दाखवणा-या भिंता, जगले पाहिजे बेधुंद कधी-कधी, काळजी करून कुठे थांबणार असतो आयुष्याचा गुंता! आजपर्यंत असंख्य उदाहरणे आपण पाहत आलो ज्यांनी ओसळून वाहणाऱ्या संकटप्रवाहाचा सामना केला आणि विजय  मिळवून अनेकांसाठी ते आदर्श उदाहरण बनले. ज्यांना हात पाय नसतात ते देखील आनंदी जीवन जगत असतात मग त्यांना नसतात का अडचणी, त्यांना नाही का मिळत अपयश. आयुष्य एक लढा आहे जिथे शेवट होतो ना तिथूनच खरी सुरुवात झाली पाहिजे. आयुष्य कसे असावे यावर मला वाटते रंगीबेरंगी त्या फुलपाखरासारखे असावे, जीवनकाळ कमी असला तरी या फुलावरून त्या फुलावर धाव घेणारे असावे. खरंच त्या कोमल फुलपाखरासारखे आनंदी असणारे, अलगद फुलणारे आयुष्य असावे. जिवनातील स्वप्नांचा नेहमी उदय झाला पाहिजे शेवटी आयुष्याचा अस्त होणारच असतो. 

कदाचित सर्वाना माहितच असेल चातक नावाचा पक्षी आतुरतेने आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत असतो, त्यालाही अनेक अडचणी असतीलच ना.... पण त्याचा निर्धार असतो, तो फक्त आकाशातून पडणारे पाण्यावर जीवन जगत असतो. आपलेही विचार येवढे कणखर असायला हवे की चारी बाजूंनी लागलेली कुलुप स्वप्नाच्या चावीने उघडता आले पाहिजे. प्रत्येकाचे आयुष्य सारखे नसते म्हणून तर म्हणतात ना तुझा माझा जीवनप्रवास वेगळा! याला माझा आक्षेप मुळीच नाही कारण अळूच्या पानावर पडणाऱ्या पाण्याचे काही थेंब क्षणात जमीनीवर कोसळतात तर काही मोत्यासारखे किती सुदंर दिसतात ना! म्हणून काय खाली पडणाऱ्या थेंबाना पाहून पाण्याने पानावर पडणे थांबायचे असते का? 

रोज नाहीच जमले तर कधी-कधी
आपण आपल्या नुसार जगायचे असते, 
अडकवणारे जाळे दूर सारून उभे रहायचे असते, 
इथे प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे असते... 

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपली प्रचंड धडपड चालू असते पण जेव्हा विरोधक पाय ओढत असताना आपण लढण्यासाठी तयार असतो आणि प्रचंड विरोधाला सामोरे जाऊन विजय मिळवतो तेव्हाच तर जिंकण्याचा खरा आनंद असतो. हे सर्व खरं असले ना तरी मी हे नाही म्हणत बरं! कुणाला हरवण्यासाठी जिंकायचे, आपणच जिंकण्यासाठी डाव खेळायचा मग हारलो तरी अनुभव येतो आणि जिंकलो तर नवी पायरी खुली होते. आनंद हा मागून मिळत नसतो म्हणून आपण करत असलेल्या कामात आनंद शोधा मग आनंद आणखी आनंद देऊन जातो. म्हणूनच येणाऱ्या जिवनाचा आनंदाने सामना करत रोजचा दिवस मनसोक्त जगा! घेत जा मोकळा श्वास, फुलवत जा आनंदाची बाग आणि जगा आयुष्य जोपर्यंत येत नाही पूर्णविराम. 

writer-kaveri-gayake

कावेरी आबासाहेब गायके
भिवगाव, ता. वैजापूर, 
जि. औरंगाबाद