चिकाटीला आपला जीवलग मित्र बनवा

ते ऐकून तिच्या त्या खऱ्या प्रेमामुळे त्याच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्याने तिच्याशी लग्न केलं

चिकाटीला आपला जीवलग मित्र बनवा

गिलबर्ट बेकर हा देवावर विश्वास ठेवणारा एक सैनिक होता ज्याने एका पवित्र भूमीची यात्रा केली होती. केवळ दुर्दैव म्हणा, त्याला एका भटक्या अरबाने कैदी म्हणून पकडून नेले होते, आणि त्याला जवळपास शेवटपर्यंत लपवूनच ठेवले होते. त्या अरबाला एक सुंदर मुलगी होती आणि तिच्याच मदतीने तो लंडनला पळून आला. पण ती काही गिलबर्टला विसरू शकली नाही. एके रात्री, आपले हरवलेले प्रेम शोधण्यासाठी तिने वडिलांचे घर सोडले आणि ती लंडनला आली. लंडन तिला पूर्णपणे अनोळखी होतं आणि मुख्य म्हणजे तिला इंग्रजीचा एक शब्दही येत नव्हता. यावर कडी म्हणजे तिला गिलबर्टच्या घराचा पताही ठाऊक नव्हता. हे सारं लक्षात येऊन ती रडली, पण गिलबर्ट.. गिलबर्ट.. गिलबर्ट... असा आवाज देत ती लंडनच्या रस्त्या रस्त्यांवर फिरू लागली. असे बरेच दिवस आणि महिने गेले, पण काही चांगले घडले नाही. पण तिने पहिल्यापेक्षा जास्त ठामपणे आपलं काम सुरू ठेवलं. हळूहळू, साऱ्या लंडनभर तिचा तो शब्द पसरला आणि गिलबर्टच्याही कानावर गेला. ते ऐकून गिलबर्टला  तिच्या त्या खऱ्या प्रेमामुळे त्याच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्याने तिच्याशी लग्न केलं

तिची चिकाटीच मोठी होती चिकाटीच्या साहायाने तुम्ही जवळपास सगळ्याच गोष्टी प्राप्त करू शकता सततच्या प्रयत्नाने तुम्ही आपले दुर्गुणही दूर सारू शकता आणि सद्गुणांचा विकास करू शकता जर तुम्ही सततच एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करीत असाल तर कुठलीही गोष्ट प्राप्त करणे तुमच्यासाठी अशक्य नाही जगामध्ये ज्यांनी बरंच काही मोठ प्राप्त केल आहे, त्यांच्यामध्ये चिकाटी हा मोठा सद्गुणच आहे. "जर तुम्हाला आयुष्यात यशच मिळवायचे असेल तर चिकाटीला आपला जिवलग मित्र बनवा अनुभवाला तुमचा सल्लागार बनवा सावधगिरीला तुमचा लहान भाऊ माना आणि आशेला तुमची पालनपोषण करणारी देवता माना