प्रेमाचा अंत अन् अफेयरकिंगचा उन्माद

प्रेम करणे म्हणजे गळ्यात गळे घालून फिरणे नसून एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती म्हणजे प्रेम. तसेच प्रेम हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. ते योग्य पध्दतीने जोपासले गेले पाहिजे.

प्रेमाचा अंत अन् अफेयरकिंगचा उन्माद

हल्लीच्या काळात 'प्रेम' संपुष्टात आलेले असून 'अफेयर'चा उदय झालेला आपलेला चोहीकडे दिसून येत आहे. सहजच मित्र मित्रांना बोलतात किंवा मैत्रीणी मैत्रीणींना बोलतात. याचे हिच्याशी अफेयर आहे किंवा हिचे याच्याशी अफेयर आहे. परंतु याचे हिच्यावर जीवापाड प्रेम आहे. किंवा तिचे त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. असे बोलतांना कोणीच दिसत नाही. यातूनच आपल्याला असे लक्षात येते की, 'प्रेमा'चा अंत झाला असून 'अफेयर'चा उदय झालेला आहे. हे स्पष्ट होत जाते.
       
अफेयर हे दुःखदायी वास्तव असून प्रेम ही सुखदायी संकल्पना आहे. हे सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे. प्रेमाला रंग नसतो, बंधन नसते, जात नसते, सौंदर्य नसते, नात्याची सीमा नसते. असे म्हटले जाते. परंतु सध्या परिस्थिती पाहता प्रेमाचे रूपांतर आता अफेयरमध्ये होताना दिसून येत आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच प्रेम असा समज निर्माण झालेला दिसून येत आहे. तरूण मुलामुलींपासून ते विवाहित स्त्री पुरूषापर्यंत अफेरचा रोग पसरलेला आपलेला दिसून येत आहे. अफेयरमध्ये सुख अजिबात नसते. तसेच अफेयरमुळे अनेकांचे जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. विवाहित स्त्रीने परपुरूषासोबत प्रेम संबंध ठेवणे गुन्हा नसल्याचा स्पष्ट निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तसेच आय.पी.सी.चे (कलम ४९७) रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही विवाहित पुरूष किंवा स्त्री एकमेकांशी प्रेमसंबंध ठेवू शकतात. तो गुन्हा ठरत नाही. वरील कायद्याचा आधार घेऊन अनेक जण प्रेमाच्या नावाखाली अफेयरला खतपाणी घालत आहे. परंतु अफेयरचे रूपांतर कधीच प्रेमात होऊ शकत नाही. अफेयरमध्ये धोका मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला सर्वच समाज चुकीचा वाटू लागतो. कारण अफेयर करणाऱ्याला प्रेमाची किंमत कधीच कळत नाही. त्याला फक्त सौंदर्य आणि शारीरिक सुख हवं असतं. आणि शारीरिक सुखात मन भरल्यानंतर द्वेषाची भावना मनात निर्माण होते. आणि द्वेष म्हणजे मानवी दुःखाचे मुळ कारण असतो.
      
त्याचप्रमाणे प्रेम ही सुखदायी संकल्पना आहे. कारण प्रेमामध्ये दोन्ही बाजूने जर प्रेम एकसारखे असेल तर त्याच्याइतका आनंद कशातच नसतो. परंतु दोघांमधून एकाच्या मनात जरी अनैतिक भावना निर्माण झाली तरी दुःख हे निश्चित आहे. त्यामुळे 'प्रेम एक तत्व आहे'. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तरच आपणास सुखाची प्राप्ती होऊ शकते. खरं तर माणसाला प्रेमाची व्याप्तीच कळालेली नाही. अनेक तत्वज्ञ व लेखक नेहमीच म्हणतात. ज्याला प्रेम कळालं, त्याला साक्षात ईश्वर कळाला. परंतू ते विचार कोणीच लक्षात घेत नाही.
     
प्रेम करणे म्हणजे गळ्यात गळे घालून फिरणे नसून एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती म्हणजे प्रेम. तसेच प्रेम हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. ते योग्य पध्दतीने जोपासले गेले पाहिजे. परंतु सध्या समाजात 'अफेयरकिंग'चा उन्माद माजलेला आपलेला दिसत आहे. हे अफेयरकिंग अनेकांचे जीवनात भुकंप घडवून आणतात, आणि अनेकांचे जीवन उध्वस्त करतात. अशा लोकांच्या संपर्कामुळे अनेकांच्या जीवनात नैराश्य निर्माण होते. काहीना तर धोका मिळाल्यानंतर आता आपल्या जीवनात काहीच उरले नाही म्हणून जीवन संपवावा वाटतं. परंतु अशा परिस्थिती एखाद्याचे नैराश्य दूर करणे, त्याला मदत करणे, त्याला समजून घेणे, आत्महत्येच्या विचारापासून दूर करणे यालाच सत्य प्रेम म्हणतात. एखाद्याच्या जीवनातून नैराश्याचा अंधकार दूर करून आशाचा किरण निर्माण करणे यालाही प्रेमच म्हणतात. एखाद्याचे दुःख दूर करून त्याच्या जीवनात सुखासाठी प्रयत्न करणे म्हणजे एक 'यज्ञ' केल्यासारखे आहे. असे आध्यात्म देखील सांगते. त्यामुळे दुःखदायी 'अफेयर'ला नकार देऊन सुखदायी 'प्रेमा'चा स्विकार केला पाहिजे. असे मला तरी वाटते. 

Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर
९६६५६३६३०३.