परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका श्रीमती. जयश्री औताडे यांनी शाळेच्या आवारात पन्नास तुळशीचे रोपे लावून शिक्षण क्षेत्रात एक नवीन आदर्श उभा केला आहे.
याआधी ही त्यांनी विविध प्रकारचे जीवनोपयोगी उपयोगी झाडांची शाळेच्या आवारात लागवड केलेली आहे. पूर्ण उन्हाळ्यात त्यांनी स्वतः झाडांना पाणी देऊन, झाडे वाढविली. तसेच विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी सदैव उपलब्ध असणारी शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.
हिंदूधर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळस घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर बऱ्याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच तुळशीचे आयुर्वेदामध्येही गुणकारी म्हणून मोठे योगदान आहे. आळस, इन्फेक्शन, हदयरोग, ॲलर्जी, लठ्ठपणा, खोकला, त्वचारोग, दंतदुखी अशा अनेक त्रासांवर तुळस अत्यंत उपयुक्त मानली जात असून त्याचा वापर रक्त शुद्धीकरणासाठीही होतो. तुळस घरात असल्याने ऑक्सिजनची कमतरता कधीच जाणवत नाही. म्हणजेच शुद्ध हवा खेळती राहण्यास मदत होते. म्हणून आदर्श शिक्षिका जयश्री औताडे यांनी गंगाखेड येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या आवारात पन्नास तुळशीचे रोपे लावले. त्यामुळे कोरोनाच्या येत्या तिसऱ्या लाटेत देखील विद्यार्थ्याचे आरोग्य चांगले राहील, गावातील न्हवेन्हवे संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व लहान थोर व्यक्तींनी याचे अनुकरण करायला हवे.
एकाच दिवशी तुळशीची पन्नास रोपे लावून जयश्री औताडे यांनी समाजापुढे एक नविन आदर्श ठेवला आहे. लहान मुले ही नेहेमीच मोठ्यांचा आदर्श घेत असतात. गुरु हे ज्ञानाचे भांडार मानले जाते, ज्ञानदान करण्यासोबत असे अनेक उपक्रम राबविले गेले तर भविष्यातील प्रत्येक पिढी ही जबाबदार निर्माण होईल यात शंका नाही.
बाबा चन्ने, औरंगाबाद