हृदयातील एक कप्पा मराठी कविता , Marathi Prem Kavita, Poem

प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता "पहिली नजर का पहला प्यार" कवितेतून दिसून येतो.

हृदयातील एक कप्पा मराठी कविता , Marathi Prem Kavita, Poem

तुझ्या एका नजरेतून
सगळं मला समजलं
न सांगता अचूकपणे
माझ्यावरच प्रेम दाखवलं

माझ्यापासून दूर असूनही
सख्या तूच मला दिसतो
मनामध्ये मी डोकावलं
तिथेही फक्त तूच असतो

अनेकदा मला प्रश्न पडतो 
आपल्या नात्याला नाव काय द्यावं
कृष्णाने जस केलं राधेवर प्रेम
अगदी तसच तूही माझ्यावर करावं

राधेला पाहण्यासाठी जसा
कृष्णाचा जीव व्याकूळ झाला
अगदी तसाच आटापिटा
माझ्यासाठी तुझ्या जीवाने केला

प्राण कंठाशी आणून मी
तुझीच वाट बघतेय
भेटशील मला नव्याने
माझ्या मनाला सांगतेय

जीव आणि शिव हे दोन्ही
कधीच वेगवेगळे नसतात
तुझ्या मनातील शुध्द भाव
मला नेहेमीच दिसतात

चेहरा तुझा तेजस्वी असा
स्वर्गाहून सुंदर भासतो
मन माझं घेऊन गेलास तू
बंद डोळ्यांनाही तूच दिसतो

माझ्या हृदयातील एक कप्पा
काढतोय फक्त तुझीच आठवण
तुझ्या माझ्या त्या कोमल भेटीची
केली मी मनामध्ये साठवण

Preeti Bhalerao

सौ. प्रिती भालेराव, पुणे