निळेशार पाणी अन्
पाणीदार डोळे तुझे
जशी गवताची पाती
लांब लांब केस तुझे
हिरव्यागार निसर्गात
एक सोज्वळ परी
अवतरावी जशी
तू माझ्या मनमंदिरी
स्मितहास्य गं तुझे
सुमधूर आहे जसे
पाहताच क्षणी तुला
तू अंतरी माझ्या वसे
मृदू निर्मळ गं स्वभाव तुझा
साद घालतो माझ्या मनाला
पाहताच क्षणी डोळ्यात तुझ्या
प्रीत कळते माझ्या मनाला
पाहता पाहता गं तुला
पाहतच बसावं वाटतं
कित्येक क्षणानंतरही
तुलाच पाहवं वाटतं
बाबा चन्ने