ऋतू फुलांचा मराठी कविता Marathi Kavita, Poem

पूनम सुलाने लिखित मराठी कविता ऋतू फुलांचा

ऋतू फुलांचा मराठी कविता Marathi Kavita, Poem

दरवळून सुगंध 
दिशा दिशांत जातो
अंगणात माझ्या
जेव्हा मोगरा खुलतो

मन होऊन गुलाबी
बेधुंद होते
अंगणात गुलाबाची
कळी छोटीशी उमलते 

एक नव्या वेगळ्या
रंगात जीवन रंगते
विविध फुलांच्या रंगाने
बाग माझी बहरते

ऋतू फुलांचा जीवनात 
प्रत्येकांच्या येत राहो
आयुष्याच्या वळणावरती
गंध फुलांचा दरवळत राहो

पूनम सुलाने, हैदराबाद