आलो होतो तुला भेटायला पण.. मराठी कविता - Marathi Prem Kavita

कु. स्नेहा बावनकर लिखित प्रेमाचे वर्णन करणारी कविता आलो होतो तुला भेटायला पण...

आलो होतो तुला भेटायला पण.. मराठी कविता - Marathi Prem Kavita

आलो    होतो    तुला   भेटायला
पण  तू निवांत  होती  तुझ्या घरी
जाणवला नाही का भास  माझा?
आलो नाही काय  मी तुझ्या उरी?

त्या   प्रवासात   मी   फक्त   प्रिये
तुझी   आठवण     करत     होतो
तू   माझ्या   काळजाला   भिणली
तुझ्या भेटीसाठी  मी  तळमळत होतो

सागराला  ही   उधाण  आले   तरी
विध्वंस    त्याने     कमीच    केला
पण माझ्या तू  हृदयात झाक सखे
प्रेमात माझ्या हृदयाचा नाश झाला

म्हणत   होते    सारे    मित्र   माझे 
का  तू  प्रेमात  त्रास  करून  घेतो?
मी  म्हटले  त्यांना,  अरे   वेड्यांनो
तिच्यासाठी   सर्व    सहन   करतो

काय    माहित    होते    मला   की
तूच     मला सोडून जाशील
आलो  होतो  तुझ्या  भेटीला पण तू 
आता माझ्या जीवनात नाही ना येशील

काळजी   नको   करू गं  माझी
आता   मी   नेहमी   हसत  राहील 
पण   खंत   जीवनात   एकच  की
तुझ्या   प्रेमात  मी  हरून   जाईल

विचारधारा ( कु. स्नेहा बावनकर )
  कोराडी ( नागपूर )