वाट पाहीन मी... Marathi Prem Kavita

सौ. जयश्री अविनाश जगताप लिखित मराठी कविता वाट पाहीन मी...

वाट पाहीन मी... Marathi Prem Kavita

आज  कातर सांजवेळी
येते आठवण सखे तुझी 
हृदयातील हुरहुरीने होते 
पापणी ओलीचिंब माझी...

काय आठवू काय विसरू? 
कळतच नाही मजला 
खरं सांग तू प्राणप्रिये 
आठवतो का मी तुजला? 

मोती आठवणीचे सांडती  
नयनांच्या शिंपल्यातून खाली 
लपवू कितीदा ते सांग आता 
नाही कोणीच त्यांना वाली...

सांजवेळी परतले  पशुपक्षी 
त्यांच्या छोट्याशा घरट्यात 
तू येशील का सखे परतून 
आयुष्याच्या सांजवेळी हृदयात?  

वाट पाहीन मी तुझी प्रिये 
अगदी माझ्या अंतापर्यँत 
मी जाताना पोचतील माझ्या 
आत्मलहरी तुझ्या मनापर्यँत.... 

Jayashri Avinash Jagtap

सौ. जयश्री अविनाश जगताप, सातारा