भावना मनातील माझ्या,
समजून घेशील ना?
एकदा सांग सख्या
तू माझा होशील ना...?
रोज स्वप्नांत येऊन
माझी प्रीत होशील ना?
खोटं खोटं का असेना
माझ्यावर प्रेम करशील ना...?
तुझ्या भेटीसाठी आतुर मी
माझीच वाट पाहशील ना?
डोळ्यात माझ्या हरवून जाऊन
तू माझा होशील ना...?
कितीही आली संकटं तरी
तुला माझीच आस राहील ना?
कितीही घोंगवली वादळे तरी
साथ माझी देशील ना...?
आयुष्यातला प्रत्येक क्षण
तू मलाच देशील ना?
अन् माझ्यासवे त्या क्षणांत
तू सुद्धा रमशील ना...?
उधाणलेल्या समुद्राच्या किनारी
हात हातात देशील ना?
रेतीच्या मखमली स्पर्शासोबत
मखमली साथ देशील ना...?
सांग ना सख्या,
प्रेम माझ्यावर करशील ना...?
सौ. प्रियंका अमृतकर, कल्याण