प्रेमात असावा आदर
प्रेमात नसावा अनादर
प्रेमात असावी काळजी
प्रेम नसावे निष्काळजी
प्रेम असावे अथांग
प्रेम नसावे वरवर
प्रेम असावे थेट मनातून उगवलेले
प्रेम असावे मनापर्यंत पोहचलेले
प्रेम असावे आंतरिक आणि भावनिक
प्रेम नसावे वरकरणी आणि शारीरिक
प्रेमात नसावा कसलाही स्वार्थ
प्रेमात असावा आंतरिक परमार्थ
प्रेम असावे भावपूर्ण
प्रेम असावे अर्थपूर्ण
प्रेम नसावे एकतर्फी
प्रेम असावे दूतर्फी
प्रेम असेल तर स्तुती होईल
प्रेम नसेल तर बदनामी होईल
असेल जर प्रेमाची लागलेली झळ
नाव ठेवल्यास नक्कीच येणार कळ
प्रेमात व्हावे वेडे पिसे
प्रेमात होऊ नये रिकामे खिसे
प्रेमात असावी ओढ आणि आपुलकी
प्रेमात नसावी तेढ आणि टवाळकी
प्रेमात असावी आतुरता आणि एकरूपता
प्रेमात नसावी कामुकता आणि बहुरूपता
प्रेम असावे पुढे नेणारे
प्रेम नसावे मागे खेचणारे
प्रेम असावे परिसासमान लोहाचे सोने करणारे
प्रेम नसावे लोहासमान गंजणारे
प्रेम असावे अतूट आणि अभंग
प्रेम नसावे कटू आणि दुभंग
प्रेम असावे पवित्र
प्रेम नसावे अपवित्र
प्रेमात असावा आधार
हल्ली प्रेमात दिसतोय पोरकेपणा फार
प्रेम असावे अबोल आणि अव्यक्त
प्रेम नसावे बदफैली असे सांगते शास्त्र
प्रेम करणं सोप असतं
ते टिकवणं मात्र अवघड
प्रेमात असते रिस्क फार
जिंकलो तर पार जाते नाव
हरलो तर होतो बेबनाव
प्रेम असावे टिकाऊ
प्रेम नसावे टाकाऊ
प्रेम असावे निस्सीम भक्ती
प्रेम नसावे बोलायची उक्ती
प्रेम म्हणजे लागता ठेस मला
पाणी येई तुझ्या डोळा
प्रेमात असावी माणुसकी आणि नीती
प्रेमात नसावी अमानवता आणि अनिती
प्रेमात असावी मनमोहक प्रीती
प्रेमात नसावी हिंसक वृत्ती
प्रेमात असावा त्याग
तो असावा जीवनाचा भाग
प्रेम असावे परोपकारी
त्याने सुख येई ह्रदयमंदिरी
प्रेमात नसावे हेवेदावे आणि वासना
प्रेमात असावे पुढे नेण्याची मनोकामना
प्रेमात असावी नाविन्यता आणि रसिकता
प्रेमात नसावी रटाळता आणि अरसिकता
प्रेमाने येतो जीवनी आनंद आणि उत्साह
प्रेमाने जग जिंकू प्रत्येकाचे मन ओळखू
प्रेमात असावा मनाचा मनाशी संवाद
प्रेमात नको सततचा वाद आणि विवाद
प्रेम असते मनाचे मनाशी मिलन
नका होऊ अकमेकांचे विल्लन
प्रेमात असावे रुसवे लटके लटके
त्यामुळे उडू देवू नका सारखे खटके
प्रेम असावे मनातील स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी
प्रेम असावे सकारात्मक ऊर्जा अंगात येण्यासाठी
प्रेमात असावी जिवलग नाती
अन्यथा होते जीवनाची माती
प्रेमाने येतात जीवनी इंद्रधनुष्याचे रंग
प्रेमा विना बनते आयुष्य बेरंग
प्रेमात असते जीवनाची कसोटी
म्हणून सोडू नका जिद्द आणि चिकाटी
प्रेमात बहरते अंतरंग
प्रेमात उमलते प्रीतरंग
जीवनात उधळतात सप्तरंग
पडता पाऊल वाकडे चावतात खेकडे
प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावा
सन्मानाने जगण्याचा हेतू धरावा
प्रेम नसावे चंचल फुलपाखराप्रमाणे
प्रेम असावे अचल स्थिर दगडाप्रमाणे
सौ. जयश्री अर्जुन मुंडे,
जि.प. उच्च प्राथमिक शाळा,