आता एक होऊ दे..... 

सौ . जयश्री अविनाश जगताप लिखित मराठी कविता आता एक होऊ दे.....

आता एक होऊ दे..... 

आता एक होऊ दे..... 
गीत तुझे, शब्द माझे 
आता एक होऊ दे.... 
शब्दांना आता एकत्र 
गीतात बद्ध होऊ दे.... 

आकाश तू, धरणी मी 
भेट क्षितिजी होऊ दे... 
क्षितिजावर भेटताना 
सप्तरंगी इंद्रधनु उमटू दे.. 

सागर तू,बेभान  लाट मी 
फेसाळून बिनधास्त उसळू दे 
परतताना हळूवार किनारी 
नीरव शांतता मिळू दे.....

फूल तू, गंध मी 
आसमंती  सुगंध पसरू दे.... 
श्वासात गंध मिसळताना
उरी चैत्यन्य पसरू दे...

नयन तू, अश्रू मी 
नयनात भरुन राहू दे 
गाली मोती सांडताना 
आनंदाश्रू होऊ दे......

कृष्ण तू, राधा मी 
गोकुळी रास जमू  दे 
मुरलीत आता त्या तूझ्या 
तरल गीत वाजू दे..... 

आता एक होऊ दे..... 
गीत तुझे, शब्द माझे 
आता एक होऊ दे.... 
शब्दांना आता एकत्र 
गीतात बद्ध होऊ दे.... 

आकाश तू, धरणी मी 
भेट क्षितिजी होऊ दे... 
क्षितिजावर भेटताना 
सप्तरंगी इंद्रधनु उमटू दे.. 

सागर तू,बेभान  लाट मी 
फेसाळून बिनधास्त उसळू दे 
परतताना हळूवार किनारी 
नीरव शांतता मिळू दे.....

फूल तू, गंध मी 
आसमंती  सुगंध पसरू दे.... 
श्वासात गंध मिसळताना
उरी चैत्यन्य पसरू दे...

नयन तू, अश्रू मी 
नयनात भरुन राहू दे 
गाली मोती सांडताना 
आनंदाश्रू होऊ दे......

कृष्ण तू, राधा मी 
गोकुळी रास जमू  दे 
मुरलीत आता त्या तूझ्या 
तरल गीत वाजू दे..... 

jayashri-avinash-jagtap

सौ . जयश्री अविनाश जगताप 
@ सातारा