रोजच्या रोजच आपल्याला
वेळ झाली की भूक लागते
कितीही जेवण केलं ना
पाणी मात्र प्यावेच लागते
अडचणीच्या काळात जेव्हा
सगळे दरवाजे बंद होतात
माणसाचे रूप घेऊन मग
कुणीतरी आयुष्यात येतात
जवळची माणसं आपल्याला
प्रमाणापेक्षा जास्त दुःख देतात
नकळतपणे कधीतरी मग तेव्हा
आयुष्यातले निर्णय चुकतात
दूर असूनही आपल्यापासून
काही माणसं जवळ वाटतात
आयुष्याच्या वाटेवर चालताना
अनेक चांगली माणसं भेटतात
विचार करून खचून जातो आपण
वाईट विचार मनात जागा करतात
सख्या नात्यापेक्षा कुणीतरी मग
आपल्याला खूप जवळचे मानतात
आयुष्य नाहीस झालं असं वाटलं
जवळचे माणसंच आधार देतात
कोण कुठून अचानकपणे
आशेचा किरण होऊन येतात
देव कुठे आहे तो खरा
कुणीच नाही पाहिला
शोधूनी दमलास माणसा
तुझ्या अंतरी तो वसला
सौ. प्रिती भालेराव, पुणे