एकतर्फी प्रेमात भाऊ माझा झुरतो,
मनापासून तिच्यावर खरं प्रेम करतो...
नजरेत सदाच स्वप्न रंगवतो,
आसवातून मग चित्र सजवतो...
आठवणीत तिच्या डोळे ओले होतात,
हळव्या मनास कितीतरी छळतात...
एकतर्फी प्रेमातली ही जादूची परी,
डोळे मिटले की सतवते खरोखरी...
होकारासाठी तिच्या मनोमनी झुरतो,
आवाज कानी येताच खुद्कन हसतो...
त्याची ही अवस्था बघवेना आता,
देवा तूच त्याचा निवाडा कर स्वतः
दे आणून त्याला स्वप्नातील परी,
जगेल तो जिंदगी खरीखुरी...
जया घुगे-मुंडे, परळी, जि. बीड