प्रीत बावरी राधा

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता प्रीत बावरी राधा

प्रीत बावरी राधा

राधा कृष्ण प्रीत खरी
प्रीती पवित्र्यतेची सरी

राधा कृष्ण प्रीत आंतरिक
नव्हते मुळीच ते शृंगारिक

माया, लळा, जिव्हाळा 
होता अतोनात रे बाळा

ममता, काळजी ओसंडून वाहे
राधा कृष्ण मनातच राहून पाहे

ठेस लागता एकास 
नयनी पाणी दुसऱ्यास

गूज मनीचे न सांगताच कळे  
आपसूकच पाऊल प्रितीकडे वळे

मन मनास बांधते अदृश्य धागा
नसते संशय तिरस्कार  जागा

जुळता नाते हे मना मना चे
होते अतूट नाते जीवन भराचे

राधा कृष्ण विरह येता समीप
होई तीव्र वेदना हृदय समीप

राधा लोचनी गंगा, यमुना वाहे
वसुंधरा व त्रिलोक स्तब्ध जाहे

स्वर्ग लोक ही झाला दुखी
पाहुनी अश्रू राधाच्या मुखी

झाला विरह तो सत्य प्रेमाचा
राधा कृष्ण अजरामर प्रीतीचा

Jayashree Arjun Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे 
अंबाजोगाई